जनमत पाहता सरकार लॉकडाऊन तूर्तास लावणारही नाही, पण...

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. सरकार याविषयी गंभीर दिसत असले तरी जनतेचा रोष ओढून घ्यायला तयार नाही. 2020 मध्ये कोरोना विरुद्ध सर्व पक्षांनी जे एकमत दाखवले तेही आज दिसत नाही. राज्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस ने ही लॉकडाऊन नको ही भूमिका घेतलीय. सरकार म्हणून कर्तव्य बजावत असताना काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून नाईट कर्फ्यु कधीपासून सुरू करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे कोरोना थांबवण्यात कितपत यश येतंय हा मोठा प्रश्न. मागील वर्षी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कित्येकांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी परवड झाली. लोकांच्या व्यथा ऐकायला गेलं की मन हेलावून जातं. परंतु तरीही काहीजण जाणीवपूर्वक कोरोनाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे कोरोना खरच आहे की नाही? अश्या चर्चा जागोजागी सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा संभ्रम आराजकतेकडे नेऊ शकतो याची पुसटशी कल्पनाही या लोकांना नाही. कोरोना हा आजार आहेच... हे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांनी म...