जनमत पाहता सरकार लॉकडाऊन तूर्तास लावणारही नाही, पण...

    राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. सरकार याविषयी गंभीर दिसत असले तरी जनतेचा रोष ओढून घ्यायला तयार नाही. 2020 मध्ये कोरोना विरुद्ध सर्व पक्षांनी जे एकमत दाखवले तेही आज दिसत नाही. राज्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस ने ही लॉकडाऊन नको ही भूमिका घेतलीय. सरकार म्हणून कर्तव्य बजावत असताना काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून नाईट कर्फ्यु कधीपासून सुरू करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे कोरोना थांबवण्यात कितपत यश येतंय हा मोठा प्रश्न. 

     मागील वर्षी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कित्येकांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी परवड झाली. लोकांच्या व्यथा ऐकायला गेलं की मन हेलावून जातं. परंतु तरीही काहीजण जाणीवपूर्वक कोरोनाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे कोरोना खरच आहे की नाही? अश्या चर्चा जागोजागी सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा संभ्रम आराजकतेकडे नेऊ शकतो याची पुसटशी कल्पनाही या लोकांना नाही. 

    कोरोना हा आजार आहेच... हे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांनी मान्य केलं आहे. शिवाय प्रत्येक देशाच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा यावर पुनर्तपासणी केली आहे. त्या त्या देशातील सरकारने अश्या महत्वपूर्ण चौकशी नंतरच कोरोनवर शिक्कामोर्तब केले आहे. आपल्या देशाला आर्थिक, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व मानसिक खाईत ढकलून सरकारला तरी काय मिळणार आहे? शिवाय ही गोष्ट लपून राहणारी नाही. त्यामुळे कोरोनावर शंका घेणं म्हणजे मूर्खपणा केल्यासारखे आहे. जे कोणी समाजात कोरोना बद्दल संभ्रम निर्माण करतात. त्यांना समाजानेच रोखणे गरजेचे आहे. 

     महाराष्ट्रात आजच्या घडीला 54 हजार इतक्या लोकांनी जीव गमावला आहे. त्यात बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष करणे चालणार नाही. सत्तेत असलेल्या सरकारला कर्तव्य बजावले पाहिजे. लोक लॉक डाऊन ला विरोध करत असले तरी सरकारला लॉकडाऊन करावेच लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तरी लोक सरकारलाच दोषी ठरवतील. आज जे लॉकडाऊन ला विरोध करताहेत ते उद्या जी हानी होईल त्याची जबाबदारी स्वीकारतील काय? 

    लॉक डाऊन लावला तर आर्थिक फटका बसतो आणि नाही लावला तर कोरोनाला अटकाव करता येत नाही. अश्या स्थितीत योग्य विचार करून समाज सरकार सोबत उभा राहिला पाहिजे. राजकारण करणारे करत राहतील... जसे वारे वाहतात तशी राजकारण्यांची मते तयार होतात... पण सरकार जनतेशी बांधील असते. त्यामुळे सरकारसोबत समाज उभा राहिला तर कोणाचेच अहित न होता योग्य दिशा नक्की सापडू शकते. 

 Published by ©️lekhagni

टिप्पण्या

  1. लॉकडाऊन लावुन कोरोनाला अटकाव होतो हा आपला भ्रम चुकीचा आहे…मागील लॉकडाऊन काळात कोरोनावर मात करता आलं का…??? याउलट देशातील सर्वात जास्त कोरोना महाराष्ट्रात पसरला,लोकांचे तसेच सरकारचेही नुकसान झाले ते वेगळेच…कोरोनाला प्रतिबंध म्हणून लॉकडाऊन हा प्रभावी उपाय होऊ शकत नाही,लोकांमध्ये जागृती, प्रभावी शासन यंत्रणेचा वापर आणि योग्य व त्वरित आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे पण शासन आता खंडणी प्रकरणात व्यस्त आहे…मागील कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राकडून लोकांची झालेली लूट,जम्बो कोविड सेंटरचे घोटाळे आजही मनाचा थरकाप उडवतात म्हणूनच लोकांमध्ये या रोगासंबंधी गोंधळ निर्माण झाला आहे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे…गरीब व मध्यमवर्गीयांचे हातावर पोट असते,रोज जे कमवतात त्यावरच त्यांची गुजराण असते,घरभाडे,कर्जाचे हप्ते,लाईटबिल, गॅस,दुधबिल,आवश्यक अन्नधान्य या त्यांच्या मूलभूत गरजा लॉकडाऊन काळात कसे पूर्ण करणार…???

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान