विषय इथेच थांबत नाही!



#हलाल शब्द सरकारी दस्तावेज मधून भलेही काढला गेला असेल, पण त्यामुळे हलाल व्यवस्था भारतातून बंद होत नाही. डागडुजी करण्यासारखी क्षुल्लक गोष्ट आहे का ही? 

आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत असा संकल्प आपण करत असताना या स्वदेशी कंपन्यांना सुद्धा हलाल इकॉनॉमीमुळे त्यांच्यापुढे झुकावे लागत आहे, इतकी मोठी गोष्ट आहे ही. 

पतंजली प्रॉडक्ट्स, हल्दीराम, मॅक्डोनाल्ड, kitkat, आशीर्वाद अश्या बऱ्याच कंपन्या हलाल सर्टिफिकेट घेऊन व्यापार करू लागल्या आहेत. बाकीच्या कंपन्यांना ही हे हलाल सर्टिफिकेट घ्यावे लागेल नाहीतर मुसलमान त्यांचे उत्पादन घेणार नाहीत. 

काय करणार बोला??? 

आपल्याकडे लोकांना हलाल चा धोकाच अजून माहीत नाही. तिकडे श्रीलंकेत हलाल ला विरोध वाढू लागल्यावर तेथील सरकारने बंदी आणली. विशेष म्हणजे तिथल्या मुसलमानांनाच पुढाकार घ्यावा लागला. आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. हलाल इकॉनॉमी मध्ये गुंतवणूक करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. भारत ब्राझील नंतर मोठ्या प्रमाणात मांसाहार पदार्थ पुरवणारा देश आहे. 
तुमची वस्तू हलाल सर्टीफाईड असेल तरच आम्ही घेऊ असं मुसलमान म्हणू लागले आहेत म्हणून आपण जातो अश्या बऱ्याच हॉटेल्स मध्ये हलाल फूड उपलब्ध असते. आपणही तेच खात असतो, जे आपल्यासाठी हराम आहे. 
बरं... हा हलाल चा विषय फक्त मांसाहार पुरता मर्यादित असता तर वेगळी गोष्ट होती. परंतु हलाल अंतर्गत चॉकलेट, बिस्कीट पासून सर्व अन्नपदार्थ, सौंदर्य प्रसाधन, हॉटेल, दवाखाने, लॉज, डेटिंग वेबसाईटवर, फर्निचर असं सगळंच येऊ लागलं आहे. म्हणजेच काय तर सगळी बाजारपेठ हलालच्या कह्यात आणली जात आहे. यामागे मलेशिया सह अन्य इस्लामिक राष्ट्र जोडलेले आहेत. 

- कल्पेश जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान