पोस्ट्स

तिरपिटांग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मदरश्यातील बॉम्बस्फोट - एक सेक्युलर विवेचन

इमेज
#तिरपिटांग बिहार च्या बांका मध्ये नुकतीच एक घटना घडली. सगळीकडे याचं वृत्त आलं आहे. घटनास्थळी मौलाना बॉम्ब तयार करत असतानाच मदरश्यात हा स्फोट झाला असेही निष्पन्न होत आहे. नेहमीप्रमाणे लगेच सगळ्यानी (विशेषतः मनुवाद्यांनी) मौलाना आणि मदरश्याकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. पण भारतीय नागरिक म्हणून आपली दृष्टी आपण कधी बदलणार आहोत? जातीय चष्मे फेकून सेक्युलरिजमच्या चष्म्यातून या घटनेकडे पाहिले पाहिजे. मदरसा म्हणजे शिक्षण संस्थाच आहे. शिक्षणसंस्था म्हणून त्यांना सगळे सरकारी लाभ मिळत असतात. मग अश्या विद्या ग्रहण करण्याच्या ठिकाणी काही प्रयोग केले जाऊ शकत नाही का?  संशोधन  आणि अभ्यास करण्यासाठी आयआयटीतच गेलं पाहिजे का? मदरश्यात काही प्रयोग करून पाहिले जात असतील तर त्यात काही गैर आहे का? मदरश्यात धार्मिक शिक्षण दिले जाते म्हणून काय झालं? धार्मिक शिक्षणाबरोबर तिथे काही वैज्ञानिक प्रयोग ही केले जातात हे या घटनेतून लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजेच काय तर मदरश्यात केवळ धार्मिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर तिथे अत्याधुनिक शिक्षण देण्याचीच गरज निर्माण झाली आहे. हेही अधोरेखित होते....