💼 "दप्तर - आठवणींचं हलकं ओझं"💼

💼 "दप्तर - आठवणींचं हलकं ओझं" 💼 Kavesh37@yahoo.com सैरभैर वाहणारा भिरभिरणारा वारा... वा-यासोबत उष्ण उन्हात फेर धरु पाहणारे धाडसी ढग... पहिल्या पावसाने पसरलेली विरळ हिरवळ... जुन महिन्याची सुरुवात ही एकंदर अशीच! वसंत ऋतुचे रुपांतर वर्षारुतुत होणारा हा काळ... पण...या सर्व बदलांबरोबर...एक आठवणींची विशेषत: बालपणीची अल्हाददायी झुळूक दरवर्षी मनाला स्पर्श केल्यावाचुन राहत नाही. उन्हाळ्याच्या संपत आलेल्या सुट्ट्या आणि पुस्तक वह्यांच्या दुकानांवरील पोरासोरांची व त्यांच्या पालकांची गर्दी' पाहिली की आठवतो आपलाही भुतकाळ...भुतकाळातील आठवणी...आठवणीतला प्रेमबहार... आणि प्रेमबहारातील भिन्न भिन्न रंगीबेरंगी विविधांगी फुलांसारखे टवटवीत प्रसन्न नजारे... निखळ... निरागस बालपणाचे..!! वृक्ष म्हटला की हिरवळ आठवते्, पुष्प म्हटले की सुगंध आठवतो तसंच बालपण म्हटलं की आधी आठवतं ते शालेय जीवन... शाळेतील गमती जमती..!! शाळेत असतानाचं वर्षातलं सर्वात आव्हानात्मक काम कोणतं..? तर निकाल लागल्यानंतरच्या घरातल्या वातावरणाला सामोरे जाणं.! थोड्याच दिवसांपुर्वी निकाल लागुन गेलेला....