सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...?

🇨🇳 "सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन..?" 🇵🇰 नागपूर येथे झालेल्या 19 व्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात कविता सादर करताना... -------------- कधी पाक कधी सार्क कधी म्हणतो माझा इराक ट्रम्प मोदी वाईट तुला गोड होतो जुना बराक सरड्यासारखे रंग तुझे कितीदा बदलशीन सांग चीन सांग पाकीस्तानसोबत निकाह कधी करशिन?......१ कधी कधी तुला लागती ओबोरचे डव्हाळे पाकसोबत ग्वादारमधी करतो येडेचाळे जरा लपुन जरा छपुन जग सारं पाहतं पाकिस्तान अन् तुयं लफडं कुठी कुठी चालतं नकट्या नाकाचा तोरा तुह्या किती दावशिन सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशीन...? ........२ चीन तुह्या प्रेमिकेले भारतानं छेडलं मोदीच्या दौ-यानी तुला रे पछाडलं खरं कारण हेच तुला चिंतांनी वेढलं म्हणुनच तू सैन्याला डोकलाममधी धाडलं सांग रे सांग तू किती दिवस लपवशिन सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...? ..........३ प्रेमिका तुही भारी खरच मानलं तुला बुवा अल्ला फादर गाॅड सांग घेतल्या कुणाच्या दुवा बुरख्यामागची हसीना तिच तेवढी दिसत नाही हाफीज आहे? अझर आहे की लखवी काही कळत नाही सांग तुझ्या प्रेमीकेल...