पोस्ट्स

सत्तासंघर्ष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कसे झाले? कोणी केले?

इमेज
कसे झाले? कोणी केले? #अन्वयार्थ 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' हा नारा घेऊन भाजपाने २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली असताना राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शपथ घेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्याला न भूतो साक्षात सेनेचे रिमोट कंट्रोल मुख्यमंत्र्याच्या रुपात मिळाले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्या आहेत. आणि या सगळ्यात मिडिया व समाज माध्यमांचा वापार किती प्रभावी ठरावी ठरू शकतो हे या सर्व घडामोडीने सिद्ध केले आहे. पाच वर्ष निष्पक्षपणे व सचोटीने काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल वातावरण असताना अवकाळी पावसाबरोबरच अचानक राजकीय वारे काय बदलतात आणि नंतर नाट्यमय घडामोडी घडत विरोधी पक्षात भाजप तर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार काय स्थापन होते. हे सारे अजब वाटत असले तरी वास्तव आहे. वाटायला हे सारं एखाद्या गोष्टीप्रमाणे असले तरी या स्टोरीचा टर्निंग पॉईंट ठरला शरद पवारांचे पावसातील भाषण. शरद पवारांच्या पावसातील भाषणानंतर समाज माध्यमात पवारांना प्रचंड सहानुभूती मिळाली. सहानुभूती म्हणजे हतबल लढवय्याकडील शेवटचा पर्या...