तिरंग्याचा अवमान झालाच नाही..
#तिरपीटांग
वाचून आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. वरील वाक्य सध्या सर्वच पुरोगामी, लिबरल, डावे, काँग्रेसी, ब्रिगेडी, खलिस्तानी, नक्षली आणि एकूणच मोदी विरोधकांच्या तोंडात दिसून येतंय. मग ते असत्य खोटं कसं असेल?
ही सगळी मंडळी जे सत्य असतं ते बोलते असं नाही, तर ते जे बोलतात ते सत्य असतं.
तुम्ही मोदीभक्तांच काय ऐकता?
२६ जानेवारी रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर जे काही घडलं ते पण एक नाटक च होतं. जे लोक तुम्ही म्हणतात तिरंग्याचा अवमान केला.. ते हातात तिरंगा घेऊन आंदोलन करत होते. मग ते देशविरोधी असतील का, ते तर देशभक्त होते. नाहीतर त्यांनी हातात तिरंगाच घेतला नसता ना.
काही मोदीभक्त म्हणतात की घुमटावर चढलेल्या एका व्यक्तीने तिरंगा फेकला. अरे... फेकला असेल. त्या झेंड्याच्या काठीला काही काटे वगैरे असतील. काठी जड असेल वजनाला. नाहीतर त्या माणसाच्या हाताला कळ लागली असेल,, म्हणून फेकला त्यानी तो झेंडा. नाहीतर तो वरती कशाला घेऊन जाईल बरं.
आपल्या बारामती वाल्या सायबांनी तरी कुठं म्हंटलं की तिरंग्याचा अवमान झाला म्हणून. त्यामुळे तिरंग्याचा अवमान झालेला नाहीये. एका तिरंग्या शेजारी दुसरा झेंडा लावला तर तो काही तिरंग्याचा अवमान असतो का? उद्या इसिस ने जरी त्यांचा झेंडा फडकवला तरी त्यांना आपण देशविरोधी म्हणूच नाही शकणार. नाही का? आणि खालसा पंथाचा झेंडा लावला गेला होता. खलिस्तानी पिवळे झेंडे नव्हते... ते ना खालसाच्या भगव्या झेंड्याच्या रंग पुसट झाल्यामुळे तसे दिसत होते. खालसा झेंडा आला म्हणजे पूर्ण पंजाब आला होता तिथे हे लक्षात घ्या.
याच प्रकरणातील काही अजून काही धक्कादायक तथ्य म्हणजे facts
दुपारच्या कडक उन्हामुळे त्या आंदोलकांनी पायात बूट घालून झेंडे लावले!
शस्त्र हे शक्तीचं प्रतीक आहे, आणि शेतकरी शक्तिशाली असतो म्हणून ते तलवारी, बरच्या, लाठ्या, काठ्या वगैरे घेऊन गेले होते!
शीख पगडी घातल्याशिवाय अंगात धाडस येत नाही म्हणून काही शीख नसलेले लोक पगड्या घालून नमाज पडले.. आणि लढले!
दिल्लीचे रस्ते सरकारने इतके चिकने करून ठेवले आहे की ट्रॅक्टर चे ब्रेकच लागत नव्हते, म्हणून ते पोलिसांच्या अंगावर जात होते.
थंडी खूप असल्याने ब्रँडेड दारूची व्यवस्था करण्यात आली होती.. आंदोलक उत्तेजित होतील आणि हिंसाचार करतील असा काही त्याचा अर्थ होत नसतो.
दिल्ली पोलीस तर घाबरटच आहेत. CAA आंदोलनाच्या वेळी सुद्धा असेच पळत होते. आताही तसेच घाबरून पळाले. मोदी सरकारने त्यांना पळ काढायचा असं सांगितलं होतं. ज्या पोलिसांनी आंदोलकांना चोपून काढलं ते... ते बहुतेक सत्याच्या बाजूने लढणारे सच्चे लिबरल असतील.
खंदकात उड्या घेणारे पोलीस पॅराशूट लावून हेल्मेट घालून उड्या घेत होते.
आणि हो... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंदोलकांनी आपल्या हातातील तिरंगा फेकला तरी त्याचा अवमान होत नसतो... त्यांनी वरचा मोठा झेंडा काढलाय का. ? नाही. मग असा अपमान मानायचा नसतो. आपल्या उच्च विचारसरणीत ते बसत नाही.
--------
इतकी सत्य पचवायला जिगर लागतं जिगर. मोदीभक्तांना आवाक्यातलं काम नाही ते.
#तिरपीटांग 😆
©️कल्पेश जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा