पोस्ट्स

#Rss4bharat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुस्लीम समावेशक हिंदुत्व??

इमेज
मुस्लीम समावेशक हिंदुत्व?? सरसंघचालक हिंदुत्वाविषयी नेमकं काय बोलले? 》》 "हिंदुत्व या विषयावर (१८ सप्टेबर) बोलताना मोहनजी म्हणाले, की हिंदुत्व हा विचार संघाने शोधलेला विचार नाही. हिंदुत्व या विचाराचे उगमस्थान भारताच्या प्राचिन संस्कृतीपासुनच आहे. सर्व मानवाचे कल्याण, सर्वसमावेशकता, परस्परांबद्दल आदरभाव, वसुधैव कुटुंबकम व मानवता या विचारांना आत्मसात करणे म्हणजेच 'हिंदुत्व' आहे . तसेच देशभक्ती, संस्कृती व आपल्या पुर्वजांचा गौरव हे हिंदुत्वाचे तीन आधारस्तंभ असल्याचेही सरसंघचालकांनी सांगितले. दुष्टांबाबतही चांगला विचार करणे आपली संस्कृती शिकवते. हाच विचार संघाचाही आहे. याचे स्पष्टीकरण करताना मोहनजींनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानातील 'जे खळांची व्यंकटी सांडो' या ओवीचा आधार घेतला. आम्हाला दुष्ट व्यक्तीविषयी चीड नाही, तर त्याच्यातील दुष्ट विचारांची अडचण आहे. त्या व्यक्तीला दुर्गुणविरहित घडवुन आपलेसे करणे म्हणजे हिंदुत्व आहे. संघ याच विचारावर आजपर्यंत चालत आला आहे, असेही त्यांनी सांगितले. मोहनजींचे मुस्लीम समावेशक हिंदुत्वाचं विधान समजुन घेताना या गोष्टीचा विचा...

जरा दूरदृष्टी हवी...

इमेज
जरा दूरदृष्टी हवी... दिल्लीच्या विज्ञान भवनातील सरसंघचालकांच्या भाषणामुळे अनेक 'हिंदुप्रेमी' दुखावले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी मांडलेले 'सर्वसमावेशक हिंदुत्व'. पण संघावर लगेच टिका करण्यापेक्षा विचार करा. थोडे दिवस आधीच 'शिकागो' येथे 'विश्व हिंदु काँग्रेस'चा कार्यक्रम झाला. विश्व हिंदु काँग्रेस आता जगाच्या कानाकोप-यात राहणा-या हिंदुंच्या हितासाठी काम करणार आहे. या कार्यक्रमासाठी ६० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी व राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. जगातील सर्व महासत्तांनी या कार्यक्रमाची नोंद घेतली आहे. उद्या विश्व हिंदु काँग्रेसचे काम करत असताना मुस्लीमबहुल देशात किंवा ख्रिश्चनबहुल देशात कट्टर हिंदुवादीपेक्षा कट्टर मुस्लीमविरोधक किंवा कट्टर ख्रिश्चन विरोधक असलेल्या आरएसएसची संलग्न संघटना आपल्या देशात सक्रिय होतेय म्हंटल्यावर तेथिल कट्टरवादी मुस्लीम किंवा ख्रिश्चन वि.हिं.काँ. चे काम चालू देतील काय? तेथिल सरकार वि.हिं.काँ.ला मान्यता देईल काय? त्यासाठी संघाच्या अजेंड्याचा विचार केला जाईल. संघचालकांच्या विचारांचा विचार केला जाईल. आणि संघाचा मुस्लीम विरोधी ...