एक वाईट प्रथा संपली म्हणायची



पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केला असला तरी मुलीने धर्मांतर केल्याशिवाय हा विवाह वैध ठरणार नाही. विवाह वैध ठरवण्यासाठी मुलीला धर्मांतर करावे लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. मात्र, दोघेही सहमतीने एकत्र राहू शकतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे. 
पण या संदर्भांतील वार्तांकन थोडं चुकीच्या सुरात होताना दिसतंय. जणू काही कोर्टाने नवीन काही नियम लागू केला आणि हिंदूंवर अन्याय झाला असा भावार्थ उमटतोय. परंतु यात कोर्टाने नवीन काहीच सांगितलेलं नाहीये. मुस्लिम विवाह कायद्यात मुस्लिम स्त्रीला दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करता येणार नाही असं म्हंटलेलं आहे. त्याचाच कोर्टाने पूनरुच्चार केला आहे. पण यामुळे हिंदू समाजासाठी एक फायदा होऊ शकतो.

इस्लाम मध्ये लग्नाच्या बाबतीत स्त्रीला फक्त येण्याचा दरवाजा उघडा आहे पण जण्याचा बंद. म्हणजे मुस्लिम पुरुषासोबत अन्य धर्मीय स्त्री विवाह करू शकते पण मुस्लिम स्त्रीला अन्य धर्मीय व्यक्तीसोबत विवाहाची मान्यता मुस्लिम कायदा देत नाही. हिंदूंना सदर स्त्री कोणत्याही धर्माचे पालन करत संसार करू इच्छित असली तरी काही आक्षेप नसतो, ते पूर्णतः तिच्या इच्छेवर असते. परंतु हा हिंदू म्हणून एक चुकीचा पायंडाच होता असे म्हणायला हरकत नाही. 
जगातील कोणत्याही धर्मात लग्नानंतर असा मूर्खपणा केला जात नव्हता. लग्न झालं म्हणजे स्त्री ने नवऱ्याचा धर्म स्वीकारला पाहिजे असे सगळ्याच धर्मात रूढ आहे. फक्त अपवाद हिंदू धर्म होता. यामागे भ्रामक समजुती, धर्म बाटण्याची भीती आणि सद्गुण विकृती हे कारण असू शकतात. आज निदान कोर्टाच्या निर्णयानुसार का होईना पण एक वाईट पद्धत बंद होईल हे बरे झाले. फक्त हिंदू समाजाला तेवढे धाडस आणि औदार्य दाखवावे लागणार आहे.

- कल्पेश जोशी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान