पोस्ट्स

सावधान...हिंदुस्तानचे राष्ट्रांतर होत आहे... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मिशन किरीस्तान !

इमेज
        मिशन किरीस्तान ! ( भाग १)           आठ राज्यात हिंदूंना अल्पसंख्य घोषीत करण्याच्या बातम्या नुकत्याच चर्चेत आल्या आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या जुन महिन्यात होणा-या बैठकीत याचा विचार होणार आहे. मणिपुर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पंजाब व जम्मुकाश्मिर हीच ती आठ राज्ये आहेत. जिथे कधीकाळी बहुसंख्यक असणारा हिंदू आज अल्पसंख्यक झाला आहे. ही तर धोक्याची घंटा आहे! पण ती कुणाकुणास ऐकु येते, कोण कोण त्याने सतर्क होतो व कोण कोण दुर्लक्ष करुन कानात बोळे घालतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न.  मांजरीने डोळे मिटून दूध प्यायचे ठरविले, तरी तिच्यावर चालुन येणारे संकट काही टळत नसते हे प्रथम हिंदूंनी ध्यानी घ्यावे. पंजाब व मणिपुरमध्ये अनुक्रमे ३८% व ३१% इतक्या संख्येने हिंदू आहेत. तसा इतर आठ राज्यांच्या तुलनेने हा आकडा सर्वाधिक. बाकी राज्यात यापेक्षा दयनीय अवस्था आहे. लक्षद्वीपमध्ये २.५ टक्के, मिझोरममध्ये २.७५ टक्के तर नागालँडमध्ये ८.७५ टक्के इतकेच हिंदू शिल्लक राहिले आहेत. ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेतील असल्याम...