'म्हैसुरचा महिषासुर'

महाराष्ट्र साम्राज्याचा विस्तार होत होता. मराठ्यांनी दिल्लीची पातशाही हादरवुन सोडली होती. हिंदूंच्या राजसत्तेला डिवचण्याची हिंमत करेल असा हर एक शत्रु मराठेशाहीच्या चाबकाने सोलुन निघत होता. अख्या हिंदूस्तानात हिंदू राजसत्तेला परिणामकारक विरोध करु शकेल असा विरोधक शिल्लक राहिला नव्हता. परंतु, अश्या काळीही दक्षिण भारतात हैदरअल्ली नामक मुसलमान हिंदू राजाच्या हाताखाली अधिकारावर चढत होता. त्या हिंदू राजाच्या 'सर्वधर्मसमान' व 'उदारीपणा'च्या भोंगळसुत्रीपणामुळे हैदर सत्ता काबिज करुन बसला. हैदरने हिंदूराजास बाजु सारुन सर्व राजसत्ता स्वत:च्या हाती घेतली. त्याच्या अंगी क्षत्रियाकडे असावे ते मुत्सद्दीपणा, शूर, पराक्रमी, चतुर असे सारे गुण होते. हैदरच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र टिपू याच्याही अंगी तेच सर्व गुण होते. पण एक राजा किंवा शासक म्हणुन त्यांच्या अंगी प्रजेला समान न्याय देणारे गुण होते काय? ते प्रजाहितदक्ष होते काय? ज्या प्रमाणे हैदरपुर्वीच्या हिंदू राजा चिक्क कृष्णराजने आपल्या पदरी महत्वाच्या पदांवर मुसलमानांनाही मान दिला होता तसा हैदर किंवा टिपुने त्यांच्या पदरी हिंदू सरद...