पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कसे झाले? कोणी केले?

इमेज
कसे झाले? कोणी केले? #अन्वयार्थ 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' हा नारा घेऊन भाजपाने २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली असताना राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शपथ घेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्याला न भूतो साक्षात सेनेचे रिमोट कंट्रोल मुख्यमंत्र्याच्या रुपात मिळाले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्या आहेत. आणि या सगळ्यात मिडिया व समाज माध्यमांचा वापार किती प्रभावी ठरावी ठरू शकतो हे या सर्व घडामोडीने सिद्ध केले आहे. पाच वर्ष निष्पक्षपणे व सचोटीने काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल वातावरण असताना अवकाळी पावसाबरोबरच अचानक राजकीय वारे काय बदलतात आणि नंतर नाट्यमय घडामोडी घडत विरोधी पक्षात भाजप तर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार काय स्थापन होते. हे सारे अजब वाटत असले तरी वास्तव आहे. वाटायला हे सारं एखाद्या गोष्टीप्रमाणे असले तरी या स्टोरीचा टर्निंग पॉईंट ठरला शरद पवारांचे पावसातील भाषण. शरद पवारांच्या पावसातील भाषणानंतर समाज माध्यमात पवारांना प्रचंड सहानुभूती मिळाली. सहानुभूती म्हणजे हतबल लढवय्याकडील शेवटचा पर्या...

‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’

इमेज
‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’ स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा काल स्मृतिदिन होता. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त्य त्यांच्या स्मृतीस्थळावर अनेक राजकीय लोकांनी भाऊगर्दी केली आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब आयुष्यभर लढले ते सारे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमले  होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य होते. कसले आहे हे हास्य? कसला आहे हा आनंद? आम्ही बाळासाहेब यांना हयात असताना पराभूत करू शकलो नाही, पण केवळ एका वाघाच्या डोक्यात अहंकाराचे बीज तयार झाल्याने अख्ख्या शिवसेनेला सुरुंग लागत असल्याचे दिसत असल्यामुळे हा आनंद? त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे या विदृपतेने काळवंडलेले आहे. शिवसेना स्थापन होईपर्यंत राज्यात काँग्रेसचेच एकशाही राज्य होते. कानाकोपऱ्यात त्यांच्या मतपेढ्या तयार झाल्या होत्या. पण एका प्रस्थापित सत्तेविरुद्ध स्व. बाळासाहेबांच्या रूपाने मोठा लढा उभा राहिला. त्यात सर्वात आधी मुंबईतील मराठी माणसाचे शिवसेनेने मन जिंकले. मुंबई महानगरपालिका पासून सुरू झालेला शिवसेनेचा विजयरथ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि विधा...

डॉ. केशव बळीराम हेडगेवार

इमेज
डॉ. केशव बळीराम हेडगेवार "हिंदू समाजाचे सुख दुःख हेच माझे व माझ्या कुटुंबाचे सुख दुःख आहे. हिंदूंवरील संकट हे माझ्यावरील संकट आहे. हिंदूंचा अपमान हा माझा व माझ्या परिवाराचा अपमान आहे. अशी वृत्ती जेव्हा हिंदू समाजात निर्माण होणे हाच राष्ट्रधर्मचा मूलमंत्र आहे" हा विचार ज्यांनी रुजवला ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार; म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या अराजकीय संघटनेचे संस्थापक. 1925 आली ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे रोप लावले त्याचा वटवृक्ष आज झालेला असून जगभरात 53 देशात संघाचे अविरत कार्य सुरू आहे. त्यांचा जन्म 1889 मध्ये महाराष्ट्रातील कुंदकुर्ती गावात झाला. वैद्यक शास्त्राचे (MBBS) त्यांचे शिक्षण झाले असूनही संपूर्ण आयुष्य त्यांनी देश व समाज यासाठीच खर्ची घातले. भारतातील बहुसंख्य हिंदू समाज जर स्वसंरक्षणक्षम झाला तर देशावर पुन्हा परकीयांची सत्ताच येऊ शकणार नाही असा त्यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी देशातील समस्त हिंदूंना आपापसातील भेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. कलकत्त्यातील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले एमबीबीएसच...

नथुरामचे राजकारण

इमेज
नथुरामचे राजकारण नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतर देशातील पहिला आतंकवादी किंबहुना हिंदू आतंकवादी होता असे वक्तव्य करून मक्कल निधी अय्यपन पक्ष प्रमुख व सिनेअभिनेता कमल हसन ने स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात तो यशस्वी ठरला. कालपर्यंत ज्याला कोणी ओळखत नव्हते त्या कमल हसन ला नथुराम गोडसेने सुपरहिट केले. त्यासाठी गांधींना मात्र मरावं लागलं. कारण गांधींचा मृत्यू झाला नसता तर आज हसन प्रमाणे काँग्रेसवाल्या गांधी परिवारालाही आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेता आल्या नसत्या. त्यामुळे महात्मा गांधीं म्हणजे काँग्रेससाठी जणू अक्षय्य ऊर्जेचा स्रोत बनून राहिले आहेत. त्यात आज नथुराम गोडसे यांचाही वापर सुरू झाल्याचे दिसत आहे. भाषण ऐकण्यासाठी समोर जमलेल्या मुस्लिम जमावात 'हिंदू आतंकवाद' हा शब्द फेकणे हसनला आवश्यक होते. त्यासाठी त्याने नथुराम गोडसे चा योग्य तो वापर करून घेतला. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आज-काल राजकारणामध्ये खळबळ माजवणारे किंवा संवेदनशील वक्तव्य करणे म्हणजे राजकीय धारिष्ट्याचे काम समजले जाते. हसनने तेच केले आहे व त्यात तो यशस्वी ठरला आहे. आपण केलेले वक्तव्य...

त्यागसूर्य सावरकर...

इमेज
त्यागसूर्य सावरकर... घराची परिस्थिती इतकी वाईट नसतानाही इंग्रजांच्या राजवटीत देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी केली. ज्या वयात भविष्याची स्वप्ने रंगवली जातात व मौज मजा केली जाते, त्या वयात शत्रूला "मारता मारता मरे तो झुंजेन" अशी प्रतिज्ञा केली व ती सार्थकी ठरवली सुद्धा. नुकतंच लग्न झालेलं असताना नववधू पत्नीचा व घरातल्या सर्वच प्रेमीजनांचा निरोप घेऊन देशासाठी (नाव शिक्षणाचे, पण गेले होते क्रांतिकार्यासाठीच) इंग्लंडला रवाना झाले. पत्नीच्या एका पत्राला सावरकर उत्तर देतात, "आपल्या एकट्याच्या संसाराचं काय घेऊन बसलीस, आज भलेही आपल्याला आपल्या सुखावर पाणी सोडावं लागतंय; पण आपल्या त्यागामुळे उद्या देशातील लाखो कुटुंबे स्वतंत्र भारतात सुखाचा श्वास घेऊ शकतील. त्याचं काय?" असा उदात्त हेतू बाळगून केवळ देशासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या संसारावर या पती पत्नीने तुळशीपत्र ठेवलं. सावरकर विदेशात असतानाच त्यांचा मुलगा प्रभाकर याचा बालपणीच दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या क्षणी त्यांचा पत्नीला आधार हवा होता, त्या क्षणी ते फक्त पत्र लिहून तिचं सांत्वन कर...

सत्तेच्या झोपाळ्यात बसणार का राज?

इमेज
सत्तेच्या झोपाळ्यात बसणार का राज?       लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह, ममता बॅनर्जी, साध्वी प्रज्ञा, केजरीवाल व प्रियांका गांधीसह अजून काही नावे सदासर्वकाळ चर्चेत होती. राज्यात देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, अजित पवार, उद्धव ठाकरे अश्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. पण यासोबतच राज्यात एक नाव पुन्हा चर्चेत आलं ते म्हणजे 'राज ठाकरे'.        राज ठाकरे यांचे लोकसभेत अस्तित्व शून्य, तर विधानसभेतही शून्यच. अनेक पालिकांमध्ये असलेल्या त्यांच्या सदस्यांनीही पक्षांतर करून पक्षाला रामराम ठोकलेला आहे. २००९-१० मध्ये विधान सभा निवडणुकांत त्यांचे ११ आमदार निवडून आले होते आणि आता इथून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहील अशी मतं राजकीय ज्योतिष्यांनी वर्तवली होती. परंतु जन्मजात ज्योतिषीच चुकतो असे नाही, तर पुरोगामी व उच्च शिक्षित इंग्रजीत भविष्य वर्तवणारे तथाकथित राजकीय भविष्यकारही तोंडावर आपटले, जेव्हा २०१४ च्या विधानसभेत मनसेची पीछेहाट झाली. २००९ च्या आपल्या भविष्यवाणीस अनेकांनी संभाळण्याचा ...

अण्णाभाऊंचा रशिया प्रवास

इमेज
अण्णाभाऊंचा रशिया प्रवास माझा रशियाचा प्रवास या पुस्तकाच्या माडग्यामातून अण्णाभाऊंनी आपले रशियातील प्रवास वर्णन मांडले आहे. वाचकाला अण्णाभाऊ सहजगत्या रशियात त्यांच्या समवेत घेऊन जातात. मॉस्को, लेनिनग्राड, ताश्कंद या शहराची ओळख वाचताना होते. अण्णाभाऊंनी या पुस्तकात या सर्व शहरांची, तेथील पोकांची, तेथील राज्यव्यवस्थेची व समाजव्यवस्थेचा ममोकले पणाने स्तुती केलेली दिसून येते. साम्यवादाने अण्णाभाऊ प्रभावित झाले असल्याने व लेनिनसम साम्यवादी नेत्यांची चरित्रे वाचल्याने त्यांना लेनिनचा रशिया पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून होती हे ते पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगतात. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिव छत्रपती वाचल्यानंतर किंवा जाणता राजा वाचल्यानन्तर एखाद्या शिवभक्ताला जशी रायगडाची प्रचंड ओढ लागते तशी ओढ अण्णाभाऊंना रशियाची लागली होती. रशिया विषयी वाचन करताना अण्णाभाऊंनी आपल्या समरतीत जो रशिया निर्माण केला होता त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी ते उतावीळ झाले होते.  1961 मध्ये अण्णाभाऊंच्या फकिरा या कादंबरीला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. याच वेळी अण्णाभाऊंनी रशियाला जावं अ...

"ती सुई" हिंदूंना का टोचत नाही?

इमेज
"ती सुई" हिंदूंना का टोचत नाही? जगातल्या शांतताप्रिय असणाऱ्या धर्मांमध्ये सर्वोच्च स्थानी कोण असेल तर तो म्हणजे हिंदू धर्म. भारतासह जगातील कोणत्याही देशात हिंदूंनी आजवर हिंसाचार केला किंवा एखाद्या मुद्द्यावर देश पातळीवर आंदोलन केले असे शोधून सापडणार नाही. हिंदूंची अशीही काही ओळख. पण हिंदूंना १५ मिनिटात संपविण्याची भाषा वारंवार केली जात असतानाही त्याविरोधात एक अवाक्षर हिंदूंकडून निघत नाही, यास काय म्हणावे? "शांतताप्रिय" आणि "भित्रा" या दोन शब्दांचा अगदीच जवळचा संबंध आहे. शांतताप्रिय असणे वाईट नाही, पण आपल्यावर संकट येत असून, अन्याय होत असून आणि आपल्या सभ्यतेवर घणाघात होत असूनही निद्रिस्त असतो तेव्हा त्यास भित्रेपणाची किनार मिळालेली असते. यामागे कारणे बरीच असू शकतील, पण हिंदूंच्या हक्काचा देश म्हणून फक्त भारताच असताना आपल्या अस्तित्वाबद्दल कोणाला चिंता का वाटत नाही, असा एक अनुत्तरित प्रश्न निर्माण होतो. खरे तर बौद्ध धर्माची शांतताप्रिय म्हणून जगात ओळख. पण आपल्या अस्तित्वावर धोका निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर श्रीलंका आणि म्यानमार सारख्या बौद्...

असे झाले कलम ३७० चे विसर्जन...

इमेज
असे झाले कलम ३७० चे विसर्जन...                    ------------- कलम ३७० अचानक घेतलेला निर्णय नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी एक वर्ष अगोदरच या कारवाईला सुरुवात केली होती... हेच सांगणारा लेख:-                     --------------       26 जुलै रोजी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले तेव्हा कोणाच्या गावीही नव्हते, की पुढील एक आठवड्यात कलम 370 चे निर्वाण होणार आहे. अजित डोभाल यांचा हा दौरा ऐतिहासिक होता, फक्त जगाला त्याबाबत काही माहीत नव्हते. एका मोठ्या लढाईची, परिवर्तनाची व जे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न होतं त्या बहुचर्चित कलम 370 ला नष्ट करण्यासाथीचा हा दौरा होता. अजित डोभाल यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जम्मू काश्मीर मधील मशिदींची गणना करण्यात आली. यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, पण अजूनही कोणाला कसलाच सुगावा नव्हता. पण, भारत सरकारने अतिरिक्त सैन्य दल...

नैतिक पातळी घसरली कोणाची? मीडियाची की महाजनांची?

इमेज
नैतिक पातळी घसरली कोणाची? मीडियाची की महाजनांची? मंत्री गिरीश महाजन हसतमुखाने बोटीत बसले म्हणून एबीपी माझाने जो राईचा पर्वत केला त्याचं आश्चर्य वाटतं. नेता म्हंटलं की त्याने नौटंकेबाजीच केली पाहिजे असं काही असत का? निवडणूक आल्या की मीडियाचं राजकीय लोकांना नैतिक मूल्य शिकवण्याचं सत्र बरोबर सुरू होत असतं. नित्य नेमाने हा तोच प्रकार. मंत्री गिरीश महाजन हसत मुखाने बोटीत बसले म्हणून वाईट काय झालं? त्यांनी फार काही तरी दुःख कोसळलय याचं नाटक करायला हवं की बोटीत बसून प्रत्यक्ष पाहणी करायला हवी? ट्विट करून हळहळ व्यक्त करायला हवी की आपत्तीग्रस्तांशी थेट संपर्क करायला हवा?  राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विधानावर तर हसूच आलं. मंत्री गिरीश महाजनांच्या कृत्य राज्याचं दुर्दैव म्हणतात. मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर मधून पाहणी करतात, त्यापेक्षा जमिनीवर प्रत्यक्ष लोकांशी संपर्क करून त्यांना आधार द्यायची गोष्ट करतात; मला पुरात अडकलेल्या बारा ते पंधरा लोकांचे फोन आले असं सांगतात आणि मदत करायला जा म्हणून फोन करतात तहसीलदाराला? हा काय प्रकार आहे बुवा?  जे विरोधक या बातमीवर तोंडस...

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले...

इमेज
खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले... लक्षावधी क्रांतिवीरांनी देशाच्या स्वातंत्र्य यज्ञात आहुती दिल्यानंतर इंग्रजांच्या जुलुमी राजवतीतून आपला भारत देश 1947 साली स्वातंत्र्य झाला. आज त्याला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. सत्तर वर्षांपूर्वी आपल्या देशातून इंग्रज निघून गेले, पण आपल्यासाठी कायमस्वरूपी काही वाद निर्माण करून गेले. भारत पाकिस्तान फाळणी हा त्याचाच एक भाग. प्रचंड रक्तपात झाल्यानंतर देश स्थिरस्थावर होऊ लागला, तोच पाकिस्तानच्या कुरापत्या सुरू झाल्या. पाकिस्तानची वक्रदृष्टी आपल्या स्वर्गासमान जम्मू काश्मीरच्या भूमीवर पडली आणि कलम 370 नावाची डोकेदुखी निर्माण झाली. यावर्षी या कलम 370 चे विसर्जन झाले, म्हणून हा स्वातंत्र्य दिवस विशेष महत्वाचा आहे. राष्ट्रीय उत्सव म्हणून या वर्षी कलम 370 च्या विसर्जनाच्या निमित्ताने 5 ऑगस्ट या नवीन दिवसाची भर पडली. भारताच्या एकतेचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांचे अपूर्ण कार्य पूर्ण झाले. त्यासाठी याच सरदार पटेलांच्या जन्मभूमितील दोन धुरंधर नेत्यांनी धाडस दाखवले. अर्थातच ते म्हणजे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच आहेत. बऱ्याच वेळा परिणामांची ...

अपराजित 'शदर वपार'

इमेज
अपराजित 'शदर वपार' मागे एकदा क्रिकेट खेळताना आम्ही फायनल मॅच अगदी जिंकत आलो होतो. खूप वर्षांनी आमच्या कॉलेज ला ट्रॉफी मिळेल याचा आनंद होता. प्रामाणिक लोकांचा राजा हरिश्चंद्र बनून खेळताना आम्ही हरत आलो होतो. यावेळी कॅप्टन बदलला होता, खेळाडू बदलले होते आणि रणनीती ही. त्याचाच परिपाक विजय दिसत होता. मोठे कष्ट घेऊन आणि धूर्त आणि रडीचा डाव खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना पराजयची धूळ चारली होती.  यंदा पुन्हा आमने सामने आलो होतो. देवेंद्र च्या नेतृत्वात लढत होतो. समोरच्या टीम चा कर्णधार शदर वपार तसा वयाने मोठा, मुरब्बी पण केवळ नामधारीच. जुन्या टीम सोबत त्याचा पाला पडला होता, म्हणूनच आयुष्य भरात केवळ 66 धावा करूनही 'जाणता ख्वाजा' म्हणून नावाजला. पण नव्या दमाच्या देवेंद्र ने पहिल्याच सामन्यात 122 रन्स केले तरी त्याचे चेले अजूनही त्याच्यातच बाप शोधत होते व पिकल्या केसांना डाय करत होते.  राष्ट्रीय पातळीवर जाऊन टीमचा कर्णधार व्हायचं शदरचं मधूस्वप्न. पण स्वप्न दोष नित्याचा. राज्य स्तरावर 66 च्या वर कधी जाता आले नाही. चिअर अप करण्यासाठी भाड्याचे प्रेक्षक व चाहते लावणारा हा पठ्ठ्या अखेर वय...

सीमोल्लंघन कलम ३७० चे

सीमोल्लंघन कलम ३७० चे     १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. साडे तीनशेहून अधिक संस्थाने सरदार पटेलांच्या प्रयत्नामुळे भारतीय संघराज्यात सामील होण्यास तयार झाले. पण जुनागड संस्थान, हैद्राबाद संस्थान आणि जम्मू काश्मीर मात्र आपले स्वतंत्र्य राष्ट्र तयार करण्यासाठी तयारी करत होते. जम्मू काश्मीर येथे त्यावेळी महाराजा हरिसिंग राजगादीवर बसले होते. जनता बहुसंख्य मुस्लीम आणि राजा मात्र हिंदू अशी जम्मू  काश्मीरमधील त्यावेळची परिस्थिती होती.      अश्या परिस्थितीत पाकिस्तानने २१ ऑक्टोबर १९४७ रोजी एक क्रूर डाव रचला व जम्मू काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांचे तीन हजारहून अधिक सशस्त्र सैनिक नागरी वेशात जम्मू काश्मीरमध्ये शिरले. त्यांनी तेथील जमिनीवर कब्जा करण्याबरोबरच प्रचंड उच्छाद मांडला. पश्चिम जम्मू काश्मीर भागातील पश्तून मुसलमानांनी राजा हरिसिंग विरुध्द विद्रोह केला. पाकिस्तान पुरस्कृत लष्करी गुंड श्रीनगरच्या जवळ येऊन पोहचले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे दिसताच राजा हरिसिंग यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी भारताकडे मदत मागितली. त्यानुसार भा...

'राजे' आणि 'वाजे'

इमेज
'राजे' आणि 'वाजे' खान्देशातील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून ना. गिरीश महाजन यांनी आपण राजकीय मैदानातील सच्चे पहेलवान आहोत, हे दाखवून दिले आहे. खरं म्हणजे मोठ्या मनाने हार स्वीकारण्याची हिम्मत सगळेच पहेलवान दाखवतात असे नाही. काही जण पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडतात तर कधी आमचे काय तर व्हाट्सअप्प हॅक केले म्हणून आम्ही हरलो अशी बोंब करून आपला पराभव दुसऱ्याच्या माथी मारतात. म्हणून सर्वप्रथम पालकमंत्री ना. गिरीश महाजन राजकीय लढवय्ये म्हणून कौतुकाचे मानकरी ठरतात. यंदाच्या निवडणुकांचा थोडा जरी अभ्यास केला तरी असे लक्षात येते, की भाजप राज्यभरात पुन्हा सद्गुणविकृतीला बळी पडला आहे. २०१० पूर्वीचे भाजपचे राजकारण ज्याप्रकारे सद्गुणांची जपमाळ हाती धरून होत असे, त्याची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येते. भाजप साम-दाम पर्यायाने मैदानात उतरल्याचे चित्र मध्यंतरी माध्यमात विरोधकांनी अतिशय हुशारीने सोडले व त्याला हातभार विरोधकांनी लावला. त्यामुळे भाजपने सुरू केलेली नेत्यांची इनकमिंग फारच काहीतरी नैतिकता सोडून केलेले देशद्रोही कृत्य असल्यासारखे लोकमनावर सोडले गेले. यामुळे ...