"ती सुई" हिंदूंना का टोचत नाही?

"ती सुई" हिंदूंना का टोचत नाही?

जगातल्या शांतताप्रिय असणाऱ्या धर्मांमध्ये सर्वोच्च स्थानी कोण असेल तर तो म्हणजे हिंदू धर्म. भारतासह जगातील कोणत्याही देशात हिंदूंनी आजवर हिंसाचार केला किंवा एखाद्या मुद्द्यावर देश पातळीवर आंदोलन केले असे शोधून सापडणार नाही. हिंदूंची अशीही काही ओळख. पण हिंदूंना १५ मिनिटात संपविण्याची भाषा वारंवार केली जात असतानाही त्याविरोधात एक अवाक्षर हिंदूंकडून निघत नाही, यास काय म्हणावे? "शांतताप्रिय" आणि "भित्रा" या दोन शब्दांचा अगदीच जवळचा संबंध आहे. शांतताप्रिय असणे वाईट नाही, पण आपल्यावर संकट येत असून, अन्याय होत असून आणि आपल्या सभ्यतेवर घणाघात होत असूनही निद्रिस्त असतो तेव्हा त्यास भित्रेपणाची किनार मिळालेली असते. यामागे कारणे बरीच असू शकतील, पण हिंदूंच्या हक्काचा देश म्हणून फक्त भारताच असताना आपल्या अस्तित्वाबद्दल कोणाला चिंता का वाटत नाही, असा एक अनुत्तरित प्रश्न निर्माण होतो.

खरे तर बौद्ध धर्माची शांतताप्रिय म्हणून जगात ओळख. पण आपल्या अस्तित्वावर धोका निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर श्रीलंका आणि म्यानमार सारख्या बौद्ध बहुल देशात बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो आणि तेथील मुसलमानांना धाकदडपशा त्यांना देशातून हाकलून लावतो. याकडे शेजारील हिंदुस्तानात राहणारे हिंदू तिरपी नजर करून बघण्याचेही कष्ट घेत नाही. अहिंसेची पूजा करणाऱ्या शांतताप्रिय बौद्ध समुदायाला अहिंसकतेकडून हिंसेकडे जावे लागले, त्याचे साधे कारणही हिंदूंना जाणून घ्यावेसे वाटत नाही. आपल्यावरील संकट पाहून गरीब गाय देखील प्रसंगी शिंगे उगारते; पण हिंदूंची अवस्था तर गोगलगाय प्रमाणे झाली आहे. काय म्हणावे यास? 'आततायी अहिंसा' की 'गांभीर्यहीनता'?

म्यानमार आणि श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम समाजात दंगली उसळल्या. नेहमीप्रमाणे याची सुरुवात तथाकथित शांतिप्रिय मुसलमानांनी केली. म्यानमार मध्ये तर रोहिंग्या मुसलमानांच्या आतंकवादी संघटना आहेत. त्याही यात सशस्त्र उतरल्या होत्या. त्यामुळे तेथील सैन्याने या आतंकवाद्यांविरोधात खड्ग उपसले आणि त्यांना सळो की पळो केले. रोहिंग्यानी तेथील बौद्धांच्या जमिनी हडप केल्या होत्या. लव्ह जिहादच्या प्रकरणामुले लोक जेरीस आले होते. अश्या अनेक कारणांमुळे तेथील अहिंसाप्रेमी समाजाच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला आणि रोहींग्यांना त्यांनी देशातूनच हाकलून लावले.

जगभरात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. रोहिग्यांना शरण द्यायला कोणताही देश पुढे येत नव्हता. भारतानेही नकार दिला. पण तोपर्यंत देशात अवैध घुसखोरी पश्चिम बंगालमधून सुरू झालेली होती. संसदेत जेव्हा यास विरोध होऊ लागला तेव्हा एक बाजूने देशात मुस्लिम नेते व मुस्लिम संघटना रोहींग्यांना शरण देण्याचा आग्रह करत होत्या. ना रक्ताचे नाते, ना ओळख परिचय मग भारतातील मुसलमान रोहिग्यांना शरण देण्यासाठी रस्त्यावर का उतरले? या उपद्रवी रोहींग्यांसाठी संसदेत गदारोळ का झाला? रोहिंग्यांचा आणि भारतातील मुसलमानांचा काय संबंध? संबंध होता एकच- "हम सब मुसलमान है", "हमारा खुदा एक है", "हमारा मजहब एक है" केवळ धर्म एक आहे म्हणून भारतातील मुसलमानांपर्यंत म्यानमार मधील रोहिंग्या मुसलमानांच्या वेदना पोहचतात.
श्रीलंकेतील मुसलमानांचे अश्रू त्यांचे अश्रू होतात.

कोणत्याही देशात मुस्लिम समाजावर अन्याय झाला की त्याचे पडसाद सर्व जगभरातील मुस्लिम देशात उमटतात. जिथे जिथे मुस्लिम आहेत, तिथे तिथे मुस्लिम त्याविरोधात एकवटतात. करण त्यांच्या तळपायाला जरी सुई टोचली, तरी त्यांच्या सर्वांगाला वेदना होतात, केवळ पायपूरट्या मर्यादित राहत नाही. म्यानमार मधील मुसलमानास सुई टोचली होती व त्याची वेदना भारतातील मुसलमानांपर्यंत पोहचली होती. हा त्याचाच परिपाक होता.

हाच विचार हिंदूंविषयी केला तर? आज जगातील सर्व मोठ्या देशात मोठ्या संख्येने हिंदू समाज अस्तित्वात आहे. पण कोणत्याही देशात हिंदूवर अन्याय झाला तर तो समस्त हिंदूंवरचा अन्याय नसतो. बांगलादेशात मंदिरात पूजा करताना पुजाऱ्याची धर्मांधांकडून हत्या होते, याची वेदना त्या शहरातील हिंदुव्यतिरिक्त जगभरातील हिंदूंपर्यंत वेदना पोहचतच नाही. पाकिस्तानात हजारो मुलींना बळजबरी, फसवणूक करून लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरित केले गेले, त्याचे कोणालाच वाईट वाटत नाही. इतकेच काय तर हजारो काश्मिरी पंडितांना काश्मीर मधून हाकलून लावण्यात आले त्याची वेदना जगातील सोडा भारतातील हिंदूंपर्यंत पोहचू शकली नाही. हिंदूंच्या आराध्य दैवतांविषयी अश्लील अश्लाघ्य भाषेत लिखाण होते, हिंदूंना दोन दोन वेळेस १५ मिनिटात संपविण्याची भाषा केली जाते, जय श्री राम म्हंटले म्हणून पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांकडून हिंदूंना मारहाण होते, हत्या होतात, त्यांना तुरुंगात टाकले जाते याचा देशातील हिंदूंना साधा संतापही येऊ नये? कोण कुठल्या रोहिंग्यांसाठी भारतातील मुस्लिम रस्त्यावर येतो, त्याच देशातील बहुसंख्य असलेल्या समाजाचा वारंवार अपमानित करण्यात येते, जीव घेतले जातात त्यांच्यासाठी देणंघेणं कोणाला तर फक्त हिंदुत्ववादी संघटनांना? मग अन्य समाजाला याची वेदना, संताप, क्रोध, आक्रोश का होत नाही? हिंदूंच्या पायाला टोचलेल्या सुईची वेदना त्याच्या सर्वांगाला का होत नाही? आपल्याच एक भावाच्या वेदनेची सुई समस्त हिंदूंच्या काळजाला का टोचत नाही? असा उद्विग्न सवाल उपस्थित होतो.

पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८-२२ या कालखंडात तुर्कस्तानच्या खालीफाची सत्ता संपुष्टात आली. त्याचे पडसाद संपूर्ण जगभरात  उमटले. भारतात त्याचवेळी याच्या निषेधार्थ खिलाफत चळवळ सुरू झाली होती. या चळवळीत उतरलेल्या मुस्लिमांची सहानुभूती मिळवण्यासाठी गांधीजींनीही त्यास समर्थन दिले. स्वा. सावरकरांना मात्र हे पटले नव्हते. अंदमानात सोबत असलेले काही मुस्लिम कैदीही या चळवळीत उतरले होते. सावरकर त्यांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले, की आमच्यासाठी आमचा धर्म महत्वाचा आहे. "खलिफा मुसलमानोकी नुमाइंदगी करता है, इसलीये हं भी उसे अपना खलिफा मानते है।" त्यांनी वंदे मातरम व भारत माता की जय बोलण्यासही नकार दिला होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुस्लिमांच्या या स्वभावाचे स्पष्टीकरण आपल्या "थॉट्स ऑन पाकिस्तान" या ग्रंथात करतात. डॉ. आंबेडकर म्हणतात, मुस्लिम 'दार-उल-हरब' आणि 'दार-उल-इस्लाम' या दोन तत्वांचे पालन करतात." दार-उल-हरब म्हणजे असा प्रदेश जिथे मुस्लिम अल्पसंख्याक असून त्याठिकाणी त्यांचे राज्य नाही, तर दार-उल-इस्लाम म्हणजे असा प्रदेश जिथे मुस्लिमांचे राज्य आहे. अख्या जगाला दार उल इस्लाम करण्यासाठी त्यांचे इस्लामच्या स्थापनेपासून अविरत प्रयत्न सुरू आहे.

भारतातील किंवा जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील मुसलमान असो, त्याच्यावर अन्याय झाल्यास वा त्यांच्या विरोधात गेल्यास ते आपला देश न पाहता धर्म म्हणून आपल्या जात बांधवांच्या मदतीला जातात. कारण त्यांचा धर्म फक्त मुसलमानांनाच आपला जातभाई मानण्याची परवानगी देतो. अन्य लोक त्यांच्यासाठी 'काफिर' आहेत. काफ़िरांना एक तर मुसलमान तरी व्हावे लागेल (दार उल इस्लाम) किंवा मरावे तरी लागेल. इसिस सारख्या आतंकवादी संघटनांद्वारे जी कत्तल चालवली आहे, त्यातून हेच अभिप्रेत होते. फक्त फरक एवढाच आहे की काही उघडपणे हेतू साध्य करतात तर काही लपून छपून जिहादच्या मार्गाने.

त्यामुळे जगातील विविध देशात वास्तव्यास असणाऱ्या, पण संकटकाळी एकट्या पडणाऱ्या हिंदू समाजास आपुलकीची ही सुई का टोचत नसावी, असा प्रश्न पडतो.

©️कल्पेश जोशी, सोयगांव
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान