नैतिक पातळी घसरली कोणाची? मीडियाची की महाजनांची?
नैतिक पातळी घसरली कोणाची? मीडियाची की महाजनांची?
मंत्री गिरीश महाजन हसतमुखाने बोटीत बसले म्हणून एबीपी माझाने जो राईचा पर्वत केला त्याचं आश्चर्य वाटतं. नेता म्हंटलं की त्याने नौटंकेबाजीच केली पाहिजे असं काही असत का? निवडणूक आल्या की मीडियाचं राजकीय लोकांना नैतिक मूल्य शिकवण्याचं सत्र बरोबर सुरू होत असतं. नित्य नेमाने हा तोच प्रकार.
मंत्री गिरीश महाजन हसत मुखाने बोटीत बसले म्हणून वाईट काय झालं? त्यांनी फार काही तरी दुःख कोसळलय याचं नाटक करायला हवं की बोटीत बसून प्रत्यक्ष पाहणी करायला हवी? ट्विट करून हळहळ व्यक्त करायला हवी की आपत्तीग्रस्तांशी थेट संपर्क करायला हवा?
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विधानावर तर हसूच आलं. मंत्री गिरीश महाजनांच्या कृत्य राज्याचं दुर्दैव म्हणतात. मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर मधून पाहणी करतात, त्यापेक्षा जमिनीवर प्रत्यक्ष लोकांशी संपर्क करून त्यांना आधार द्यायची गोष्ट करतात; मला पुरात अडकलेल्या बारा ते पंधरा लोकांचे फोन आले असं सांगतात आणि मदत करायला जा म्हणून फोन करतात तहसीलदाराला? हा काय प्रकार आहे बुवा?
जे विरोधक या बातमीवर तोंडसुख घेताय त्यांच्या आजवरच्या कार्यकाळात नदीत उतरून मदतकार्य केलय का कधी एखाद्या मंत्र्याने? मंत्री गिरीश महाजन नदीत उतरून कमरे इतक्या पाण्यात एनडीआरएफ च्या टीम सोबत मदतकार्य करीत आहेत. त्यांच्या या कृतीच कौतुक करून 'कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी' असा चांगला पायंडा पाडायचा, की बोटीत बसताना हसत होते म्हणून टीका करायची?
बरं...मिडियातल्या किती लोकांनी हातातले कॅमेरे ठेऊन आजपर्यंत आलेल्या आपत्तीत मदतकार्य केलं आहे? लोक पाण्यात बुडून मरत असताना, त्यांचे घर संसार वाहून जात असताना किती रिपोर्टर्सनी हातचा कॅमेरा ठेऊन त्यांना मदतीचा हात दिला? अश्यावेळी कुठे जाते मीडियाची माणुसकी? जास्तीत जास्त वायरल होईल असा व्हिडीओ मिळवण्याचाच प्रयत्न मीडियाने केला ना? आपल्या टीआरपी वाढीसाठी शिकारच शोधली ना?
मग नैतिक पातळी घसरलीय कोणाची?
एका कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची कुचंबना करणाऱ्या एबीपी माझाची, की घरादाराची पर्वा न करता जवानांसोबत उभं राहून मदतकार्य करणाऱ्या गिरीश महाजनांची?
©️ कल्पेश जोशी, सोयगांव
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा