राममंदिरामुळे देशाच्या विकासाला काय फायदा होणार आहे?

५ ऑगस्ट रोजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे ऐतिहासिक भूमीपूजन संपन्न झाले. कित्येक आनंदाश्रू या सोहळ्याचे साक्षी बनले. परंतु, देशातील काही तथाकथित पुरोगामी सेक्युलरांना मात्र जणू सुतक पडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संविधानिक पद्धतीने सगळे झालेले असताना ते दुःखी झाले आहेत. हिंदुत्ववादी या दुःखी आत्म्यांची फार टर उडवीत आहेत, पण त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. त्यांचे रडणे स्वाभाविक आहे, कारण मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी जी स्वप्ने रंगवली होती ती धुळीस मिळत आहेत व खरा भारत निर्माण होत आहे. या नवभारत निर्मितीत कुठेही वैयक्तिक स्वार्थ नाही. स्वार्थविना कुणी इतकी यशस्वी आणि मोठं होऊ शकतं का, याचं सकारात्मक उत्तर पचवणे त्यांना कठीण झाले आहे. असो. राम मंदिर बांधून देशाला काय फायदा होणार आहे? देशाच्या विकासात काय भर पडणार आहे? गरीबाच्या थाळीत काय पडणार आहे. देशाला शाळा, हॉस्पिटलची गरज आहे. राममंदिरामुळे कोरोना जाणार आहे का? अशी अनेक प्रश्न कथित लिब्रांडूना पडली. मंदिरांची तुलना हॉस्पिटल आणि शाळांशी जशी केली जात आहे तशी देशभरात बेगुमानपणे वाढत चाललेल्या मशिदी, मदरस...