भाग २ - चिनी हस्तक व कम्युनिस्ट अजेंडे
युद्धाचा विषय निघताच नमती भाषा का सुरू होते? याचे सांगोपांग स्पष्टीकरण करणारी लेखमाला..
भाग २ - चिनी हस्तक व कम्युनिस्ट अजेंडे
चीनचा अजून एक अजेंडा म्हणजे समाजवाद्यांच्या हातून लोकमानसात माओवादी विचारांची (अप्रत्यक्ष) पेरणी करणे होय. चीनने ज्याप्रमाणे तिबेट बळकावले आहे, त्याप्रमाणे नेपाळ, भूतान व नंतर माओ ने सांगितल्या नुसार भारतातील अरुणाचल प्रदेश, लडाख, गलवान याकडे त्याची वक्रदृष्टी आहे. लोकांचा त्यांच्या संस्कृती, परंपरांवरून विश्वास उडवायचा, राष्ट्रीय भावना कमजोर करायची नंतर 'लालक्रांती' करायची, अशी त्यांची साम्राज्यवादी पद्धत राहिली आहे. भारतात संस्कृती, परंपरा, सद्भावना व राष्ट्रीय भावनेस छेद देणाऱ्या टुकडे टुकडे गँगसारख्या विकृती तेच काम राजरोसपणे करत असतात.
या माओवादी अजेंड्याला खतपाणी घालण्यासाठी चीनने मोठी फळी मीडियात उभी केलेली आहे. भारताची जागतिक स्तरावर बदनामी करण्याचे उद्योग त्यांच्याद्वारेच केले जातात. भारतातील विशिष्ट माध्यमे, पत्रकार मंडळी, लेखक, न्यूज चॅनल्स यांची दुकाने चीनच्या भरवश्यावर सुरू आहेत. अनेक पत्रकार, लेखकांना पैसे देऊन हवे ते आर्टिकल्स लिहून देण्याचे उद्योग नित्याचे सुरू आहेत. यातील काही प्रकाराने CAA विरोध सुरू असताना समोर आले आहेत. कोरोना लॉकडाऊन काळातही या विषयी बोलल्या जात होते. आपल्या गावाकडे पायी निघालेल्या मजुरांच्या टाळूवरचं लोणी या कम्युनिस्ट बोक्यांनी खायला कमी केलेलं नाही.
भारतात फोफावलेल्या नक्षलवादामागे सुद्धा चीनचाच हात असून साम्यवादाने पछाडलेली लाल क्रांती करण्याच्या उद्देशाने देशांतर्गत शस्त्रधारी शत्रू आजवर चीननेच पोसला आहे. काही चित्रपटात कम्युनिस्ट चीनचे हस्तक असलेले शहरी नक्षलवादीच कसे नक्षलवाद चळवळ जिवंत ठेवत आहेत हे दाखवले आहे. जिज्ञासूंनी "बुद्धा इन अ ट्राफिक जाम" हा चित्रपट जरूर बघावा. देशातील मोठमोठ्या हुद्द्यावरील बरीच व्हाइट कॉलर लोकं शहरी नक्षलवादी म्हणून आपल्या आसपास फिरकत असतात, आपल्याला त्याचा थांग पत्ताही नसतो.
कम्युनिस्ट थिंकटॅंक मधून काही वर्षांपासून असाच एक विचार बाहेर पडलेला आहे… उदाहरण द्यायचं झालं तर तो म्हणजे 'कुं फुं कराटे'. 'कराटे' आणि 'चीन' यांचा विविध कपोलकल्पित चित्रपट तयार करून व प्रचंड अतिशयोक्तीचा वापर करून इतका घनिष्ठ संबंध दाखवला गेला आहे, जणू चीन व्यतिरिक्त अन्य कोणासही कराटे हा युद्ध प्रकार ठाऊकच नाही.
वास्तविक पाहता कराटे या युद्ध प्रकारचा जन्म भारतात झालेला आहे. दक्षिण भारतातील बोधिधर्मा (किंवा बुद्धवर्मा) यांनी सहाव्या शतकात कराटे या युद्ध प्रकारचा आविष्कार केला असल्याचे बऱ्याच लेखकांनी मांडले आहे. चित्रपटाच्या माध्यमातूनही बोधिधर्मा यांना चित्रित केले आहे. अगस्त्य मुनी व परशुराम यांनीही कालारी (कराटे) हा युद्ध प्रकार अवगत केल्याचे सांगितले जाते. हा सत्य व भारतीयांना अभिमान वाटावा असा इतिहास न सांगता चिनी कसे कराटे चॅम्पियन आहेत हेच वारंवार बिंबवले जाते. त्यावर संशोधन, अभ्यास होत नाही. त्यामुळे आज भारत चीन युद्ध विषय समोर येताच भारतीय बालमनावर सहज 'कराटे चॅम्पियन चिनी चेहरे' डोळ्यासमोर तरळून जातात.
देशांतर्गत आपले हेर आणि हस्तक पेरल्याशिवाय घुसखोरी करण्याची चीन हिम्मत करू शकत नाही. आपला कम्युनिस्ट अजेंडा राबविण्यासाठी चिनने व्यवस्था लावली तेव्हाच तो इतका मुजोर झाला आहे. भारताच्या छोट्या छोट्या भू-भागावर कब्जा करून टाकायचा, त्यानंतर भारताच्या सैन्यावर ज्यांचा अंकुश आहे अश्या केंद्र सरकारवर "युद्ध होऊ नये", "नरमाईने घेतले पाहिजे", "चर्चा व्हावी" अश्या बोटचेप्या भुमीका मांडणारे कथित विचारवंत सक्रिय होतात. जनतेने शत्रूवरील आपला रोष कमी करून युद्ध झाल्यास आपले कसे नुकसान होऊ शकते असे माध्यमांना हाताशी धरून विविध लेख, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स वायरल करून समाजमनावर बळजबरी बिंबवले जाते. आणि मग तिकडे आपल्या शूर वीर जवानांकडे इच्छा असतानाही हातावर हात ठेवून बसण्याशिवाय पर्याय नसतो.
(सर्जिकल स्ट्राईक सारख्या मोहीम याचमुळे गुप्तपणे राबविल्या गेल्या.)
परंतु, यामुळे शत्रूला उत्तर देण्याची योग्य वेळ निघून जाते. मग सरकार आपली योग्य बाजू मांडण्याचा प्रयत्न होतो. मीडिया चॅनेल्स आपल्या कव्हरिंगच्या फुशारक्या मारत असतात. नागरिक आपण किती समजूतदारपणा दाखवला याच्या अविर्भावात असतात. या सगळ्यात जे जिंकतात त्यांची एव्हाना नवीन मोहीम सुरू देखील झालेली असते आणि आपल्या जवानांचा शत्रू विषयीचा राग मात्र तसाच धगधगत राहतो. वेळ भेटल्यास कधीतरी याचा शांतपणे विचार कराच.
(भाग १ - शांततादूत की चिनी हस्तक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. http://vsk-devgiri.blogspot.com/2020/06/blog-post_3.html)
✍️ लेखाग्नी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा