सनातनची हत्या व मुस्लिम व्यापार श्रेणी

सनातनची हत्या व मुस्लिम व्यापार श्रेणी

आसाम मध्ये लॉकडाऊन काळात रोजीरोटीसाठी सायकल वरून भाजीपाला विकणाऱ्या सनातन डेकी या हिंदू गृहस्थाची मुस्लिम जमावाने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. "मुस्लिम मोहल्ले मे सब्जी बेचने क्यू आया?" असे म्हणत या मुस्लिम जमावाने सनातन डेकी याचा जीव घेतला. देशभरात या घटनेच्या विरोधात संताप उफाळत आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांचा विचार जरी केला तरी हिंदू विक्रेते, व्यापारी यांच्यावर मुस्लिमांकडून बहिष्कार घालण्याच्या घटना घडलेल्या आहेत असे लक्षात येते. हिंदू कधीतरी याचा गांभीर्याने विचार करणार आहेत की नाही? या घटना घडल्यावर नुसतीच आदळआपट आणि चर्चा करून काय साध्य होणार आहे. सोशल मीडियात रोष व्यक्त करून काय उपयोग आहे? 

१०० कोटी हिंदूंच्या देशात आज २५ कोटी मुसलमानांची तंत्रशुद्ध व्यापार यंत्रणा अस्तित्वात आहे. या रचनेत कोणाही हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांना स्थान नाही. स्थान मिळालेच तर ते सर्वात शेवटी म्हणजेच किरकोळ विक्रेता किंवा ग्राहक म्हणून. ते म्हणतील त्या दराला/किमतीला तुम्हाला 'हो' म्हणण्या पलीकडे पर्याय नाही. कित्येक हिंदू शेतकऱ्यांना याचा वर्षानुवर्षे फटका बसत आलेला आहे. कवडीमोल भावात केळी विकत घेऊ पाहणाऱ्या व्यापाऱ्याला केळी न देता अख्ख्या गावाला केळी वाटप केल्याचं उदाहरण नुकतंच माझ्या ऐकण्यात व पाहण्यात आलं आहे. फळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचे अनुभव नेहमी येत असतात. अक्षय तृतीयेला गगनाला भिडलेल्या फळांच्या किमती रमजानचा महिना सुरू होताच कमी कश्या होतात? यात अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत.

फळविक्री व भंगार व्यवसायात एका विशिष्ट वर्गाचा कब्जा झाला असून त्यात कोणाला किती स्वातंत्र्य आहे हे सर्वश्रुत आहेच. फळ पिकवणारा शेतकरी हिंदू आणि व्यापार करणारा, विकणारा मात्र मुस्लिम असे हे समीकरण आहे. अन्य  व्यापाऱ्याला यात सहजासहजी जागा मिळत नाही. मिळालीच तर त्याला यातून बाहेर कसे फेकले जाईल याचा विचार होतो. हिंदू शेतकऱ्यांकडून कमी भावात घेतलेला माल दामदुपटीसह विकला जातो. म्हणूनच 'शेतकरी ते ग्राहक' ही नवीन संकल्पना लॉकडाऊन काळात समोर आली. शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा आणि सरळ ग्राहकापर्यंत न्यायचा अशी पद्धत अनेक ठिकाणी अवलंबली गेली. एका विशिष्ट वर्गाकडून सतत झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या यंत्रणेची योग्यता कमी जास्त प्रमाणात सिद्ध झाली आहे. 

झारखंड मध्ये दुकानावर 'हिंदू' नाव दिसल्यामुळे त्या दुकानदारावर सरकारकडून कारवाई करण्यात आली. परंतु कोणत्याच सरकारला आजवर चालत आलेला मुस्लिम श्रेणी व्यापार दिसला नाही. कर्नाटकमध्ये हिंदूंच्या दुकानातून वस्तू खरेदी केली म्हणून मुस्लिम महिलेला मुस्लिम पुरुषांनीच भर रस्त्यात झापुन काढले. आसाममधील मुस्लिम मोहल्ल्यात भाजीविक्री करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून हत्या करण्याची घटना नुकतीच घडली आहे. रमजान पूर्वी काही मौलवी हिंदूंच्या दुकानातून काहीही खरेदी करू नका असे सांगत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. फळांना थुंकी लावून फळे भाज्या विकायला नेणारे व्हिडिओ पाहिल्यानंतर तर चीड व संताप उफाळतो. एवढेच काय तर 'हलाल' नामक एक आंतरराष्ट्रीय मुस्लिम व्यापार श्रेणीच तयार झाली आहे. समस्त इस्लामिक व गैर इस्लामिक देशातील मुस्लिम यामध्ये सहभागी करण्यात आले असून 'हलाल'चा शिक्का असणारेच उत्पादने विकत घ्यावी असे आवाहन यातून मुस्लिमांना केले गेले आहे. कालपर्यंत केवळ अरबी देशात असणाऱ्या या यंत्रणेचा भारतात शिरकाव झाला आहे व अंमलात ही आणली जात आहे. 

ज्या हिंदूंनी आजवर आपल्याला कृपाळूपणे जवळ घेतले, त्याच हिंदूवर बहिष्कार टाकू पाहणाऱ्या व देशातील एकात्मतेला सुरुंग लावू पाहणाऱ्या काही धर्मांध वृत्ती आणि व्यक्तींना त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे झाले आहे. अब्दुल जर हिंदूंच्या वस्तीत खुलेआम भाजी, फळ, टोस, खारी विकण्यासाठी येऊ शकतो, तर सनातन सारख्या व्यक्तीला मुस्लिम मोहल्ल्यात भाजी विकायला गेल्यामुळे का अमानुषपणे मारले जाते? हिंदू स्त्रिया बांगड्या भरायला करीम चाचाकडे जाऊ शकतात तर मुस्लिम महिलेला हिंदूंच्या दुकानात जाण्यापासून का अडवले जाते? मुस्लिम व्यापार श्रेणीमुळे देशातील एकात्मतेला तडा गेला आहे. सनातन डेकाचा जीव गेला आहे. त्यामुळे उद्या हिंदूंनी संघटितपणे असा व्यापार व्यवसाय सुरू केल्यास त्यांना कोणी दोष देऊ शकणार नाही. भारतासारख्या उदारमतवादी, दयावान व सांस्कृतिक एकात्मता जोपासणाऱ्या देशात व्यापारात सामाजिक विभागणी होणे ही खरं तर लांच्छनास्पद बाब आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून बहूसंख्य असूनही एक विशिष्ट वर्ग एका अन्यायाला सामोरे जात आहे हे सत्य आहे.  

(हिंदु शेतकरी, व्यापारी, विक्रेते तसेच महानुभाव व्यक्ती यांच्याशी झालेल्या संवादातून मिळालेली ही माहिती व निष्कर्ष आहेत. यास काळ, ठिकाण व व्यक्तीपरत्वे अपवाद असू शकतात) 

@लेखाग्नी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान