पेटा इंडियाची पोलखोल



मुक्या जीवांचे तथाकथित तारणहार व बेगडी पशुप्रेमी जागतिक संघटना असलेल्या पेटाचा (PETA) हिंदुद्वेषी चेहरा अखेर उघड पडलाच. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने पेटाने हिंदू सणांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. "या रक्षाबंधन ला माझी रक्षा करा. चर्म मुक्त बना". असे गुजरातमध्ये लागलेल्या पेटाचा बॅनर वरून पेटा कश्या पद्धतीने वारंवार हिंदू सणांना टार्गेट करत आहे हे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या शेफाली वैद्य यांनी पेटाची या प्रकरणावरून चांगलीच हजेरी घेतली. 

पेटाचा या विवादित बॅनरला पाहता आपल्याला असे वाटून येईल की पेटाला गोरक्षणाची किती काळजी आहे. परंतु, वास्तविक तसे नाही. पेटाने गाईला 'बहीण' म्हणून संबोधले आहे. भारतात गाईला गोमाता म्हणून संबोधले जाते, एवढेच नाही तर तिला पूजनीय मानले गेले आहे. मग पेटाला गाईला बहीण का बनवावेसे वाटले? याचप्रमाणे  रक्षाबंधनला आजवर आपण कधी चामड्यापासून बनलेली राखी पहिली आहे का? अपवाद म्हणूनही अशी राखी सापडणार नाही. मग पेटा ने असे बॅनर लावून काय साधले?

पेटाचा इतिहास पाहता असे लक्षात येते की पेटाने आजपर्यंत भारतात वारंवार हिंदू परंपरांना लक्ष्य बनविले आहे. हिंदू संस्कृती किंवा परंपरांच्या विरोधात आपण बोललो म्हणजे आपण मोठे पुरोगामी व आधुनिक विचारांचे आहोत असा सर्वत्र जो समज आहे हे कारण असावे किंवा पेटाचं पोट अश्या लोकांच्या फंडिंगवर भरत असावं ज्यांनी हिंदुत्व बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. पेटाने आतापर्यंत दही-हंडी, दिवाळी, होळी-रंगपंचमी या सारख्या सणांसह जलीकट्टू व कंबाला सारख्या परंपरांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. 

पेटा इंडियाची दुसरी बाजू पाहू गेल्यास असे लक्षात येते की पेटा इंडियाने बकरी ईद ला निष्पाप बकरे (व गाय, बैल सुद्धा) कापले जातात त्यांच्या विरोधात कधीच अशी बॅनरबाजी केलेली नाही. काही वर्षांपूर्वी पेटाने बकरी ईद ला लावलेल्या बॅनरवर केवळ बकरी ईद चा साधा नामोल्लेख सुद्धा केला नव्हता. याउलट बकरी ईदला बकरा कसा कापावा याची आपल्या वेबसाईटवर एसओपी (Standard Operating Procedure) सांगितली. बकऱ्याला आपल्या मुलाप्रमाणे कसा जीव लावावा, त्याची कोणती नस अगोदर कापावी, त्याने कितीवेळ तडफडावे अशी सगळी माहिती सांगितली आहे. शिवाय वर सल्लाही दिला आहे की जर आपण अश्या प्रकारे बकऱ्याचा बळी दिला तरच आपली कुर्बानी अल्लाह स्वीकारेल. पशुप्रेमी म्हणवून मिरवणारी हीच आहे ती पेटा संघटना. 

पेटाने भारतातील तथाकथित पशुप्रेमी सेलिब्रेटीना पर्सन ऑफ दि इयर अवॉर्ड देऊन गौरविले आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी, सोनम कपूर, जॅकलीन फर्नांडिस या अभिनेत्रीचा समावेश होतो. जी शिल्पा शेट्टी चिकन बनविण्याचे एक हजार प्रकार प्रमोट करते, दिया मिर्झाला चिकन बिर्याणीपेक्षा मटण बिर्याणी जास्त आवडते अश्या सेलेब्रिटी पेटाला अवॉर्ड देण्यालायक वाटतात. या सर्व अभिनेत्री व सेलिब्रेटीकडे महागड्या हॅन्ड बॅग्स असतात. (हजारो डॉलर्स इतकी किंमत असलेल्या 50 महागड्या हॅन्ड बॅग्सची लिस्ट शेफाली वैद्य यांनी ट्विट करून पेटाला दिली आहे.) तरीही पेटा या अभिनेत्रींकडे पशुप्रेमी म्हणून बघते. हे हास्यास्पद नाही का? 

आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु याच पेटा संघटनेची एक मुस्लिम तरुण कार्यकर्ती 2017 मध्ये भोपाळ मधील एका मुस्लिम मोहल्ल्यात बकरी ईद समोर असताना हातात "Make Eid happy for all. Try vegan." (सर्वांसाठी आनंदमय बकरी ईद साजरी करू. शाकाहारी होऊ.) या माहितीचे होर्डिंग्ज घेऊन उभी काय राहिली तिला मारहाण करण्यात आली, तिचे कपडे फाडले गेले. महिलांसह पुरुषांनीही त्या तरुणीला मारहाण केली. या धाडसी व खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या तरुणीची एखादी प्रतिक्रिया सुद्धा पेटाला घ्यावीशी वाटली नाही. त्या तरुणीला न्याय देण्याचा प्रयत्न झाला नाही. हिंदू सणांच्या विरोधात कोर्टात याचिका टाकणाऱ्या पेटाला त्या तरुणीसाठी कोर्टाचा दरवाजा का दिसला नाही? बकरी ईदला मुसलमानांमध्ये जनजागृती करणे पेटाला आवश्यक वाटत नाही की भीती वाटते? 

शेफाली वैद्य यांनी पेटाचा हिंदूविरोधी विरोधी बुरखा टराटरा फाडला म्हणून त्यांच्या ट्विटरवर भाडोत्री ट्विटर गुंड असभ्य भाषेचा वापर केला. पेटाने सुद्धा शेफाली वैद्य यांना 'साप' म्हणून हिणवले. यावर काँग्रेसी व जिहादी गुंड ट्विटरवर फेक अकाउंट तयार करून मला भीती घालू शकता नाही अशी निर्भीड प्रतिक्रिया शेफाली वैद्य यांनी एका वाहिनीवर बोलताना व्यक्त केली. पेटाचे पशुप्रेम खरे असते तर त्यांनी पशु अत्याचार कायद्यातील धार्मिक परंपरांना संरक्षण देणाऱ्या कलमाचा कधीच का विरोध केला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

सामाजिक सुधारणा व सामाजिक कार्य करणाऱ्या पेटासारख्या संस्था-संघटना वारंवार हिंदू विरोधी अपप्रचार करत आले आहेत. मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांच्याविरुद्ध मात्र त्यांना कधीच समाजकार्य करावेसे वाटत नाही. यामागे नेमके कारण काय असावे? 

ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणाऱ्यांना गणपती, गोपाळ अष्टमी व हिंदूंचे लग्न समारंभ दिसतात परंतु मशिदीवरून दिली जाणारी बांग कधीच ऐकू का येत नाही? हिंदू आस्था व श्रद्धांचा अवमान करणाऱ्या चित्रपटावर बंदी येत नाही परंतु मुस्लिम संघटनांनी धमकीस्वरूप पत्र सरकारला दिले की लगेच त्याची दखल घेतली जाते व 'महंमद- मेसेंजर ऑफ गॉड' सारख्या चित्रपटावर तात्काळ बंदी आणली जाते. एखाद्या समाज किंवा समूहाला न्याय देण्याची हीच दिशा असणार असेल तर देशातील शांत, संयमी व सहिष्णूपणे राहणाऱ्या समाजाला आपण 'हिंसेची, धमकीचे भाषा वापरली' तरच न्याय मिळतो हा संदेश देत नाहीये का? असेच असेल तर उद्या देशातील बहुसंख्यक समाजसुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी व अस्तित्वासाठी हिंसेची भाषा करू लागल्यास त्याला जबाबदार कोण असणार? याचाही विचार कराव लागणार आहे.

@लेखाग्नी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान