टिकटॉकवर बंदी यावीच, पण...

टिकटॉकवर बंदी यावीच, पण...

टिकटॉक एप्पच्या विरोधात देशात एक लहर उठली आहे. जातीवाचक, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी व महिला अत्याचारांना उत्तेजना देणाऱ्या व्हिडिओमुळे टिकटॉक चर्चेत आले. देशात या विरोधात एवढी मोठी लहर उठली कि प्ले स्टोअर वर 4.6 रेटिंग असलेले हे एप्प आज 1.3 इतक्या नीचांकी रेटिंग वर येऊन पोहचले आहे. निमित्त ठरले फैजल सिद्दिकी या टिकटॉकरचे. एसिड हल्ल्यांना समर्थन व उत्तेजन देणाऱ्या त्याच्या व्हिडिओमुळे समाजमनात संतप्त भावना उमटल्या, आणि असे एक एक व्हिडीओ समोर येत गेले व थेट टिकटॉक बंदीची मागणी उठली. भारतीय महिला आयोगानेही आता टिकटॉकवर बंदी आणण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. 

टिकटॉक बंदीची मागणी करणाऱ्या मंडळींची मागणी चुकीचे आहे, असे कोणीही म्हणू शकणार नाही. टिकटॉकमुळे अनेक तरुण तरुणींना अक्षरशः वेड लागण्याची पाळी आली आहे. मनोरंजन, विनोद, व्यंग, खिल्ली उडवणे व ट्रोल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टिकटॉकचा वापर होऊ लागला. जास्तीतजास्त कमेंट्स, फोलोअर्स वाढवण्याचा इर्ष्येपायी दररोज नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी सुरुवात झाली, त्याचे रुपांतर सवयीत कधी झाले हे त्यांनाच कळाले नाही. टिकटॉकमुळे अनेकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला खरा परंतु, ती सर्जनशीलता विकृतीकडे झुकू लागली. अंग प्रदर्शन, लैंगिक आकर्षण, अश्लील शब्दांचा व गाण्यांचा वापर (संदर्भ) या दिशेने ही हाव पुढे सरकू लागली. टिकटॉकचे सर्वात जास्त वापरकर्ते भारतात झाले. शिक्षित, अशिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सार्यांनाच टिकटॉकने वेड लावले. टिकटॉक केवळ करमणूक व सर्जनशीलतेचे साधन न राहता राजकारण, जातीय-धार्मिक चिखलफेक आणि मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे जणू साधन बनले. परंतु टिकटॉक चा विचार करताना काही गोष्टी लक्षात येतात, त्या संशयास्पद आहेत. घडवून आणल्यासारख्या वाटणाऱ्या आहेत. 

काही घटना व परिणाम :

1 कोटी 35 लाख इतके फॉलोअर्स असलेला टिकटॉक फेम फैजल सिद्दीकी या तरुणाने "तुमच्या प्रेमाला नकार मिळाल्यास एसिड मारून फेका" अश्या आशयाचा व्हिडीओ टिकटॉकवर तयार करून पोस्ट केला होता. त्याच्या व्हिडिओला देशातून मोठा विरोध झाला. संदर्भ

औरंगाबाद येथील इम्रान शेख या व्यक्तीने चक्क दाऊद ला टिकटॉक वरून आमंत्रण पाठवले. "'तेरी कमी है आजा, हद हो चुकी है आजा" असे म्हणत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसोबत दाऊद चा फोटो जोडून हा व्हिडीओ तयार केला आहे. अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या विरोधातून हा व्हिडीओ त्याने तयार केलेला आहे. दिल्ली भाजप प्रवक्ता ताजींदर पाल सिंग बग्गा यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतला आहे. संदर्भ

मुजीबुर रहमान या तरुणाने नैतिकतेच्या सर्व पातळ्यांना तिलांजली देत थेट बलात्काराला प्रोत्साहित करणारा व्हिडिओ तयार केला आहे. त्यामध्ये एक तरुणी अत्याचार पीडित दाखवलेली असून दोन तरुण असुरी आनंद घेत असल्याचा देखावा केला आहे. "तेरे इश्क पे, तेरे वक्त पे बस हक है मेरा" हे गाणं त्याच्यासोबत जोडले आहे. असे एक ना अनेक व्हिडीओ वेगवेगळ्या तरुणांनी तयार केलेले दिसून येतात, जणू काही बलात्कारास उत्तेजित करण्याची कोणी मोहीमच सुरू केली असावी. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनीही या विडिओवर आक्षेप घेतला होता. संदर्भ

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे एका समसुद्दीन नामक इसमाचे लॉकडाऊन काळात टिकटॉकवर असे काही प्रेम जडले कि टिकटॉक व्हिडिओ बनविण्यासाठी तो आपल्या बायकोला बळजबरी करू लागला. त्याच्या जबरदस्तीची परिसीमा ओलांडली गेल्याने व झालेल्या मनस्तापामुळे तिने मुलासोबत आत्महत्या करून टाकली. 

नुकत्याच समोर आलेल्या या काही घटना आहेत. परंतु, टिकटॉक वर कुत्र्यांना मारहाण करताना, उंचावरून खाली फेकताना, मांजरीला फाशी देताना, कुत्र्याच्या पिलांचे हातपाय बांधून त्यांना निर्दयपणे मारताना असे एक न अनेक अमानवी हिंस्र वर्तन दाखवणारे व्हिडीओ टिकटॉक वर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडिओची संख्या पाहता जाणीवपूर्वक हे व्हिडीओ तयार केले जात असल्याचे लक्षात येते. तरीही या व्हिडीओज ना हजारो लाईक्स मिळतात. असे व्हिडीओ करणाऱ्यांना हजारो फॉलोअर्स असतात. यावरून हे लोक किती आविवेकी झाले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. फैजल सिद्दीकी इतकेच त्याच्या व्हिडीओ ला लाईक्स देणारेही तितकेच दोषी म्हंटले पाहिजे. 

एका व्हिडीओ मध्ये मुस्लिम तरुण हिंदू तरुणीला प्रेमाची मागणी घालतो, ती सांगते तू मुस्लिम आहेस, घरचे कसे परवानगी देतील? त्याचा प्रपोगंडा राबवताना व्हिडीओकर्त्याने पुढे दाखवले की प्रेम करताना धर्म काय पाहायचा, प्रेम महत्वाचे. आणि ती तरुणी त्या मुलासोबत डोक्यावर हिजाब घेऊन अल्लाह ची प्रार्थना करू लागते. अर्थातच तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो. ह्याच आशयाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसात तयार झाले आहेत. जे लव्ह जिहादला, हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणासोबत संबंध जोडण्यासाठी उत्तेजित व प्रोत्साहित करणारे आहे. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनीही या व्हिडिओवर आक्षेप व्यक्त केला होता.

टिकटॉकच्या माध्यमातून घडून येणारे षडयंत्र :

आपल्याला जाणून हैराण वाटेल की टिकटॉक वर भारतात जे टिकटॉक स्टार सर्वाधिक फेमस आहेत, त्यांच्यापैकी सर्वाधिक मुस्लिम तरुण व तरुणी आहेत. ज्या फैजल सिद्दीकी ने ऍसिड हल्ल्यांना प्रोत्साहन करणारा व्हिडीओ तयार केला त्याला या व्हिडीओ मध्ये साथ देणारी युवती आलिया हमीदी मुस्लिमच आहे. फैजलचा भाऊ अमर हाही टिकटॉक व इन्स्टाग्राम वर फेमस असून तिथेही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. टीम नवाब म्हणून त्यांनी एक टीमसुद्धा तयार केली आहे. टिकटॉक वरील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या आवेज दरबार याची 1.5 मिलियन डॉलर्स इतकी म्हणजेच 11 कोटी 33 लाख इतकी संपत्ती असल्याचे एका  च्या वृत्तामध्ये समोर आले आहे. अरिश्फा खान या तरुणीचे 26.5 मिलियन इतके फॉलोअर्स असून तिचीही 1 मिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे. रियाज अलीचे टिकटॉकवर 0.8 मिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे. जन्नत जुबेरचे टिकटॉकवर 26 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर त्याच्याकडे 1 मिलियन डॉलर्स म्हणजेच 7 कोटी 55 लाख इतकी संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

टिकटॉकचे वेड लागलेले व दुसऱ्यालाही वेड लावणाऱ्या या तथाकथित टिकटॉक सुपरस्टार्सची संपत्ती आश्चर्यकारक तर आहेच पण शंकास्पदही आहे. फैजलच्या टीम नवाब मध्ये सामील मुस्लिम साथीदार, मुस्लिम सहकारी युवती या सगळ्यांच्या एकूणच कृतीचा व त्यांच्या कामाचा संशय एका सुनियोजित धार्मिक प्रपोगंडाकडे मन वळविणारा आहे. फैजलचे टिकटॉक वरील अकाउंट बंद करण्यात आले आहे. परंतु, ट्विटर, इन्स्टाग्राम वरील अकाउंट अजूनही सुरूच आहे. त्यामुळे केवळ त्यांचे अकाउंट डिलीट करणे किंवा सायबर कायद्याखाली गुन्हा नोंदवणे पुरेसे आहे का? लव्ह जिहादसारख्या गोष्टींना प्रोत्साहित करणारी अश्या काही टोळी टिकटॉक व एकूणच मीडियावर सक्रिय असल्याची दाट शक्यता वाटते. त्यांना मिळणार पैसा, त्याचे स्रोत या सगळ्याची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

13 ते 16 वर्ष वयाचे (अंदाजे) मुस्लिम तरुण (उदा. मुजीबुर) बलात्काराला प्रोत्साहित करणारे व्हिडीओ तयार करून पोस्ट करतात, याचा अर्थ काय काढावा? ह्या तरुणांना त्यांच्या शिक्षणकेंद्रात नेमके कोणते नैतिकतेचे पाठ पढवले जातात, की ज्यांना असे कृत्य करताना ना कायद्याचा ना समाजाचा धाक वाटत नाही. अश्या कोणत्या प्रेरणेमुळे ही मुलं दाऊदला भारतात येण्याची गयावया करतात, हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणाशी प्रेम करण्यास प्रोत्साहित करतात. त्यामुळे फैजल सिद्दीकीच्या माध्यमातून केवळ एक डाव उघडकीस आला असे आपण म्हणू शकतो. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर काय कारस्थानं शिजत आहेत, याचा कोणालाही सुगावादेखील नाही. 

सोशल मीडियातून प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली आणि नंतर नको ते गुन्हे घडल्याचा अनेक घटना घडल्या आहेत. सोशल मीडियात कित्येकांनी आपली बनावट व वेगळ्या नावाने खाती उघडली आहेत. ट्विटरवर राजकीय-सामाजिक ट्रेंड्स सुरू करण्यासाठी कित्येक फेक अकाऊंट्स तयार आहेत. भारतातील घडामोडीवर ट्रेंड चालवताना सरकारविरोधी किंवा हिंदूविरोधी ट्रेंड चालवतानाही याचा वापर होतो. त्यामुळे यामागे कोणाचा हात आहे हे उघड झालेच पाहिजे. टिकटॉकवर उद्या बंदीही येईल. एका फैजलवर गुन्हा नोंदवला जाईल. परंतु, सोशल मीडियाच्या महाजालावर सुरू असलेल्या अश्या भारतविरोधी कारस्थानांचे काय? पडद्याआड असलेल्या अनेक फैजल व आलिया यांचे बुरखे कधी फाटणार, हा प्रश्न पडतो.

@लेखाग्नी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान