बंगाल हिंसाचार आणि हिंदू मानसिकता

'आजचा बंगाल उद्याच्या काश्मीरकडे जात आहे' असे म्हंटल्यास आश्चर्य वाटेल, पण ते सत्य आहे. बंगाल मध्ये ज्या पद्धतीने मागील काही वर्षांपासून अराजकवाद व दहशत निर्माण करणाऱ्या आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहे व विशेषतः आताच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हिंदूंसोबत झालेला नरसंहार पाहता ह्या घटना बंगाल मधील आहे की काश्मीर मधील, असा प्रश्न पडतो. त्यामुळे बंगाल आता भारताच्या भूमीवरील अराजक, मुस्लिम दहशत, धर्मांध व पुढे चालून फुटीरतावाद याला पोसणारं नवीन राज्य निर्माण होत आहे असे लक्षात येईल. बंगाल मधील ममता सरकारने लोकशाही आणि संविधानिक शासन प्रणाली अक्षरशः गुंडाळून ठेवली आहे. 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्ता व स्थानिक धर्मांध जिहादी यांनी जो नंगानाच केला तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलाच असावा असे मत भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. यावरून या घटनांची भीषणता लक्षात येते. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहे, महिलांवर बलात्कार होत आहेत, ज्या लोकांनी भाजपला समर्थन केले त्यांच्या घरांवर हल्ले होत आहे, त्यांची संपत्त...