बंगाल हिंसाचार आणि हिंदू मानसिकता



'आजचा बंगाल उद्याच्या काश्मीरकडे जात आहे' असे म्हंटल्यास आश्चर्य वाटेल, पण ते सत्य आहे. बंगाल मध्ये ज्या पद्धतीने मागील काही वर्षांपासून अराजकवाद व दहशत निर्माण करणाऱ्या आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहे व विशेषतः आताच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हिंदूंसोबत झालेला नरसंहार पाहता ह्या घटना बंगाल मधील आहे की काश्मीर मधील, असा प्रश्न पडतो. त्यामुळे बंगाल आता भारताच्या भूमीवरील अराजक, मुस्लिम दहशत, धर्मांध व पुढे चालून फुटीरतावाद याला पोसणारं नवीन राज्य निर्माण होत आहे असे लक्षात येईल. 

बंगाल मधील ममता सरकारने लोकशाही आणि संविधानिक शासन प्रणाली अक्षरशः गुंडाळून ठेवली आहे. 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्ता व स्थानिक धर्मांध जिहादी यांनी जो नंगानाच केला तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलाच असावा असे मत भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. यावरून या घटनांची भीषणता लक्षात येते. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहे, महिलांवर बलात्कार होत आहेत, ज्या लोकांनी भाजपला समर्थन केले त्यांच्या घरांवर हल्ले होत आहे, त्यांची संपत्ती लुटून नेली जात आहे, कित्येक लोकांचा तर थांगपत्ता नाही...भयग्रस्त हिंदूंनी बंगालमधून पलायन सुरू केले आहे, भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांना पोलीस अधिकाऱ्यांकडून तृणमूल मध्ये प्रवेश करण्याचे सांगितले जात आहे, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते भूमिगत होऊन सुरक्षित स्थळी त्यांना आश्रय दिला आहे अशी भयानक परिस्थिती आज बंगाल मध्ये निर्माण झाली आहे. ज्याचे वर्णन करताना आपण खरच लोकशाही शासन असलेल्या देशात राहतो की तालिबानी दहशतीत राहतो आहोत असा प्रश्न पडतो. 

भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी हिंसाचाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक न्यूज चॅनलवर वर मुलाखत दिली. त्यांनी मर्यादा सांभाळत काही गोष्टी समोर मांडल्या, परंतु त्याहूनही अतिशय विदारक व भयानक प्रकार आज बंगाल मध्ये घडत आहे. कैलास विजयवर्गीय यांच्या बोलण्यात उल्लेख आला की 'एक विशिष्ट समाज भाजप , संघ कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहे'. हे विशिष्ट कोण? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भाजपची सत्ता आली तर आपल्याला अनधिकृतपणे इथे राहता येणार नाही, याची ज्यांना भीती वाटत होती त्या बांग्लादेशी व रोहिंग्या मुसलमान व त्यांचे पोशिंदे असलेल्या सगळ्यांनी हा उच्छाद मांडला आहे. आणि याला ममता सरकारचे समर्थन आहे, पोलीस बघ्याची भूमिका घेतात म्हणून हे सगळं घडत आहे. कैलास विजय वर्गीय यांनी मुलाखतीत हेही सांगितले आहे की 'ममता सरकार कडून पोलीस प्रशासनाला फक्त बघ्याची भूमिका घ्यायचे सक्त निर्देश आहेत' असे एका आयपीएस अधिकार्यानेच त्यांना हे सांगितले आहे. "तुम्हाला फोन येतील, ते फोन उचलायचे नाहीत, जे होतंय ते होऊद्या" असे निर्देश जर पोलिसांना मिळत असतील तर त्याला अराजक नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?

ममता बॅनर्जी ना आपली सत्ता प्रिय आहे आणि त्यासाठी त्या काय टोकाला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या सत्तेला जो आव्हान देईल त्याला रक्तपात करवून संपवून टाकू अशी त्यांची भूमिका आहे. बंगाल चे हे दृश्य पाहिले के मला हैद्राबाद संस्थानवर राज्य करू पाहणाऱ्या सत्तालोलुप निजाम आठवतो. आपल्या सत्तेला आव्हान देऊ पाहणाऱ्या हिंदूंना जीवे मारण्यासाठी त्याने खास रझाकार नावाची फौज तयार केली होती. ममता सरकारने सुद्धा घुसखोरी करून राहणाऱ्या व त्यांना आश्रय देणाऱ्या जिहाद्यांची अनधिकृत फौज तयार केली आहे. यामुळे जिहादी व ममता दोघांचे हित साधले जात आहे. ममता सरकारमुळे घुसखोरांना आश्रय मिळाला आहे आणि ममता बॅनर्जी ना रझाकार! 

तथापि निजाम कितीही क्रूर असला तरी लोहपुरुष सरदार पटेल यांनी पोलीस एक्शन करून निजामाच्या अभिलाषा धुळीत मिळवल्या होत्या. परंतु तत्कालीन हैद्राबाद संस्थानातील व  भारतातील हिंदू समाज सरदार पटेलांच्या सोबत उभा होता. हिंदूंनी केवळ संस्थानातच नव्हे तर देशभरात निजाम विरुद्ध एक वातावरण तयार केले होते. त्यामुळेच सरदार पटेल पोलीस एक्शनचा निर्णय घेऊ शकले. आज केंद्रात तसेच संक्षम सरकार आहे. परंतु हिंदू समाज निद्राधीन झाला आहे. बंगाल मधील हिंदूंवर इतक्या भयंकर पद्धतीने हल्ले झाले आहेत की ते स्वतःच्या जीवाला वाचवण्यापलीकडे काही करू शकत नाही. त्यामुळे बंगाल वगळता अन्य राज्यातील हिंदूंनी आपल्या बंगाली बांधवांच्यासाठी आवाज उठवणे फार गरजेचे आहे. 

या सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होताय असा राजकीय हिंसा होत असल्याचे वार्तांकन सर्व माध्यमात दाखवले गेले आहे. परंतु ते अर्धसत्य आहे. बंगाल मधील हिंसाचार हा केवळ राजकीय पार्श्वभूमीतुन होत नाहीये, तर एका विशिष्ट जिहादी धर्मांध उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठीही होत आहे. जे स्वतःला हिंदू म्हणू लागले होते, तेच टार्गेट होतायत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

भाजपच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या बंगाल मधील हिंदूंना हे सगळं होईल याची कल्पना नव्हती का? निश्चितच होती. 2016 च्या विधानसभा निवडणूक व त्या अगोदर सुद्धा ममता सरकार ने काँग्रेस व सिपीएम सोबत असाच व्यवहार केला आहे. फक्त त्याला धार्मिक किनार नव्हती. परंतु यावेळी होणाऱ्या हिंसेला धार्मिक किनार आहे. भाजप कार्यकर्त्यांना आपण हरलो तर काय होणार याची पूर्ण कल्पना होती तरीही केवळ आपल्या भारताचं सार्वभौमत्त्व जपण्यासाठी, हिंदूहित व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन हा धोका त्यांनी पत्करला आहे. आज तेच कार्यकर्ते, हिंदुजन संकटात असताना अन्य राज्यातील हिंदू त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी साधं व्यक्त सुद्धा होऊ शकत नसतील तर ही फार शरमेची गोष्ट आहे. हिंदू असाच बेफिकीर राहिला तर हिंदू हितासाठी उद्या कोण पक्ष आणि कोण कार्यकर्ता आपला जीव धोक्यात घालेल? जरा याचाही विचार केला पाहिजे. प्रत्येक घटना राजकीय चष्म्यातून पाहणे धोक्याचे आहे. त्यामुळे बंगाल हिंसाचाराचे वास्तव समजून घेऊन समस्त हिंदूंनी आपली मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. 

@कल्पेश जोशी, सोयगांव 
kavesh37@yahoo.com


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान