पोस्ट्स

युवाकुंभात घडले भारताचे युवादर्शन

इमेज
युवाकुंभात घडले भारताचे युवादर्शन २३/१२/२०१८ प्रयागराज येथे जानेवारी २०१९ मध्ये होणा-या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाच कुंभ उत्तरप्रदेश सरकारने आयोजित केले होते. त्यापैकी चौथा कुंभ असलेल्या युवाकुंभाचे आयोजन लखनऊ विश्वविद्यालयाने केले होते. लखनऊ शहरात होणा-या या कार्यक्रमासाठी भारतातील सर्व राज्यातून युवक युवतींनी उपस्थिती लावली. युवाकुंभाच्या कार्यक्रमप्रसंगी २२ डिसेंबर, शनिवार रोजी प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्यासोबत चर्चासत्र आयोजीत केले होते. यावेळी भारतीय परंपरा व संस्कृतीचे महत्व त्यांनी विशद करताना देशात पाश्चात्य संस्कृतीचे प्रमाणापेक्षा जास्त उदात्तीकरण होत असल्याचे मत मांडले. पाश्चात्य संस्कृतीला विरोध नाही परंतु आपली भारतीय परंपरा सोडूनदेखिल चालणार नाही. पाशिचात्यांच्या काही चांगल्या गोष्टी स्विकारुन आपल्या संस्कृतीचे विकृतीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. देशात आजकाल भारतीय परंपरांचा विरोध करणारा उच्च विचार किंवा पुरोगामी ठरतो तर भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणा-याला प्रतिगामी व अडाणी ठरवले जाते, ही वाईट बाब आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली....

खंत एकट्या सोनु निगमचीच?

इमेज
खंत एकट्या सोनु निगमचीच? "आपल्या देशात भारतीय गायकांना गाण्यासाठी म्यूझिक कंपन्याना पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही पैसे दिले नाही, तर ते तुमचं गाणं वाजवणार नाही. त्यासोबतच तुम्हाला गाणंही मिळू देणार नाही. मात्र पाकिस्तानी गायकांसोबत असं केलं जात नाही. त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले जात नाही. मग भारतीय गायकांसोबतच असा दुजाभाव का? पाकिस्तानात जन्मलो असतो तर बरं झालं असतं." अशी खंत सोनू निगमने एका मुलाखती दरम्यान बोलून दाखवली." देशात कालपर्यंत रोहिंग्या व बांग्लादेशींची घुसखोरी वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता पाकिस्तानी नागरीकांची कलाकाराचा मुखवटा घालून कशी घुसखोरी वाढत आहे, व त्याचा भारतीय कलाकारांना कसा फटका बसत आहे हे लक्षात येऊ शकेल. पाकड्यांच्या या स्मार्ट घुसखोरीचा स्व. बाळासाहेबांनी काही वर्षापूर्वीच समाचार घेतला होता व देशाला हा धोकाही लक्षात आणून दिला होता. पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. पाकिस्तानी कलाकार, खेळाडू, कोच अश्या लोकांचे उदारमतवादी व सहिष्णू या सदगुणविकृत्यांनी पछाडलेल्या उच्चभ्रू भूरट्या भारतीयांनी जे लांगूलचालन चालवले आहे ते गंभीर आहे....

 मंदिरनिर्माण व हिंदू अस्मितेचा इतिहास

इमेज
  "मंदिरनिर्माण   व  हिंदू अस्मितेचा इतिहास"         अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सध्या जे काही रणकंदन सुरु झाले आहे, ते केवळ 'राजकारण' या केवळ एका मुद्द्याचा विचार करुन चालणार नाही. राम मंदिर उभारणीचा आग्रह हिंदूंकडून होतोय, त्यामागे खरे तर अस्मितेचा प्रश्न दडलेला आहे. राम मंदिर उभारणी हा भारतातील बहुसंख्यक असणा-या हिंदूंच्या अस्मितेचा व त्यांच्या श्रद्धास्थानाचा प्रश्न आहे. भारत लोकशाहीप्रधान झाल्यापासुन हिंदूंच्या अस्मितेविषयी विसाव्या शतकात उद्भवलेला हा पहिलाच प्रसंग. म्हणुन याकडे काहीजण 'राजकिय मुद्दा' म्हणुन बघताना दिसतात. परंतु, इतिहासात डोकावले तर लक्षात येईल की हा प्रश्न राजकिय नसून हिंदूंच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा व स्वाभीमानाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. या संदर्भातील  ऐतिहासिक घडामोडींच्या दाखल्यासह केलेला हा उहापोह.       इ.स. ७११ साली मोहम्मद बीन कासीमची स्वारी भारतावर झाली व तेव्हापासुन इस्लामचा संपर्क भारताशी आला. या अगोदर भारतावर अनेक परकिय आक्रमकांनी आक्रमणं केली होती, परंतु त्यांची या आक्रमणा...

मुस्लीम आरक्षण: एक राष्ट्रीय आव्हान!

इमेज
मुस्लीम आरक्षण:   एक राष्ट्रीय आव्हान! मराठा समाजाला आरक्षण मिळेल याची कोणालाही खात्री नव्हती. परंतु फडणवीस सरकारने आपण खरंच अभ्यास करत होतो हे सिद्ध करुन दाखवले. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण पाहुन आता अनेकांच्या आशा पल्लवित होत आहेत. फडणवीस सरकारभोवती डोकेदुखी वाढणार आहे. धनगर समाजाने पुर्वीच आरक्षणासाठी जोरदार मागणी सुरु केली आहे. त्यातच मुस्लीमांनीही आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढवला आहे. सत्ताधारी भाजप सरकारची हिंदुत्ववादी अशी ओळख असताना मुस्लीम समाजातर्फे सरकारकडून आरक्षणाची अपेक्षा बाळगणे हे भाजपच्या हिंदुत्वाच्या धारेला कमी करत धर्मनिरपेक्षतेला चकाकी आणताना दिसू शकेल. पण कधी नव्हे तेवढ्या मागण्या, मोर्चे, आंदोलनं मागील चार वर्षात भाजपच्या शासनकाळात झाले. याचा अर्थ भाजप सरकारकडूनच सर्वांना अपेक्षा आहेत ही दुसरी बाजूही समोर येते. 'आपण हिंदुत्ववादी आहोत पण कुणा धर्माला विरोध करत नाही' हे दर्शवण्यासाठी व मुस्लीमांच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपकडून मुस्लीमांची एखादी लहानसहान मागणी पुर्णही केली जाऊ शकते. पण ती मागणी 'आरक्षण' असणे धोक्याचे ठरू शकते. धर...

अवनीच पावली!

अवनीच पावली! #तिरपी_टांग अखेर काहीतरी सापडले. आरडाओरड करायला. बोंबाबोंब करायला. अवनी पावली. स्वत: गेली पण कोणाचं तरी भांडवल झाली. तसा एक प्रकारे आनंद आहेच. राज्यातील उच्चशि...

सुरक्षितता हवी की स्वैराचार?

सुरक्षितता की स्वैराचार? बहुसंख्यांकांच्या राज्यात अल्पसंख्यक असुरक्षित अाहेत अशी ओरड नेहमीच केली जाते. त्यात तथ्य आहेच. कश्मीरसारख्या मुस्लीमबहुल राज्यात अल्पसं...

उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य??

उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य?? #तिरपी_टांग त्या दिवशी महाशय जरा नाराजीत दिसत होते. नीट बोलत नव्हते की हसत नव्हते. तसे मघाशीच फार आनंदात होते महाशय. कोर्टाने दिवाळीतील फटाक्...