युवाकुंभात घडले भारताचे युवादर्शन
युवाकुंभात घडले भारताचे युवादर्शन
२३/१२/२०१८
प्रयागराज येथे जानेवारी २०१९ मध्ये होणा-या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाच कुंभ उत्तरप्रदेश सरकारने आयोजित केले होते. त्यापैकी चौथा कुंभ असलेल्या युवाकुंभाचे आयोजन लखनऊ विश्वविद्यालयाने केले होते. लखनऊ शहरात होणा-या या कार्यक्रमासाठी भारतातील सर्व राज्यातून युवक युवतींनी उपस्थिती लावली.
युवाकुंभाच्या कार्यक्रमप्रसंगी २२ डिसेंबर, शनिवार रोजी प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्यासोबत चर्चासत्र आयोजीत केले होते. यावेळी भारतीय परंपरा व संस्कृतीचे महत्व त्यांनी विशद करताना देशात पाश्चात्य संस्कृतीचे प्रमाणापेक्षा जास्त उदात्तीकरण होत असल्याचे मत मांडले. पाश्चात्य संस्कृतीला विरोध नाही परंतु आपली भारतीय परंपरा सोडूनदेखिल चालणार नाही. पाशिचात्यांच्या काही चांगल्या गोष्टी स्विकारुन आपल्या संस्कृतीचे विकृतीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. देशात आजकाल भारतीय परंपरांचा विरोध करणारा उच्च विचार किंवा पुरोगामी ठरतो तर भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणा-याला प्रतिगामी व अडाणी ठरवले जाते, ही वाईट बाब आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. देशात वाचक वर्गाला उद्देशून बोलताना चांगल्या पुस्तकांना लोकापर्यंत पोहचविण्यासाठी मार्केंटिंग महत्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. रात्री मोहन जोशींसारख्या दिग्गज कलाकारांनी साकारलेले 'चाणक्य' या प्रसिद्ध नाटकाचाही युवकांनी आनंद घेतला.
२३ डिसेंबर, रविवाररोजी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ व रा.स्व. संघाचे सह सरकार्यवाह डाॅ. गोपालकृष्णजी यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. दिवसभरच्या वेगवेगळ्या सत्रामध्ये श्रीमती मोनिका अरोरा, मा. सुनिल आम्बेकर, आॅलम्पीक विजेता कुस्तीपटू सुशिलकुमार व बाॅक्सर विजेंद्रकुमार, सिनेमा दिग्दर्शक मधूर भांडारकर तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य व दिनेश शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रिय मंत्री स्मृती इराणी, रास.स्व. संघाचे सह सरकार्यवाह मा. दत्तात्रयजी होसबळे, आचार्य बाळकृष्णजी व भोजपुरी अभिनेता रविकिशन यांचीही उपस्थिती राहिली. त्यांनी युवकांसमोर यावेळी आपले विचार मांडले. उपस्थित युवकांमध्ये प्रचंड उत्साह व देशभक्तीचे वातावरण पहायला मिळाले. यावेळी युवकांमध्ये राममंदिर निर्माणसाठी असलेली तीव्र इच्छाही प्रकट झाली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भाषणात रा.स्व.संघाचे सह सरकार्यवाह यांनी देशाच्या अखंडता व एकतेसाठी अध्यात्मिक शक्ती व भारताच्या भविष्याविषयी चिंतन मंथनसाठी कुंभाची आवश्यकता विशद केली तर समारोप केंद्रिय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या भाषणाने झाला.
जळगांव विभागातील जवळजवळ २५ जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. युवाकुंभ हा शक्ती व भक्तीचा संगम असुन देशाला विश्वगुरुपदी विराजमान करताना या शक्तीचा उपयोग होणार असल्याचे देवगीरी प्रांत युवाकुंभ संयोजक विराज भामरे यांनी सांगितले.
कार्यक्रमातील विशेष आमंत्रितांचे अतिथी भाषण:
देशात अनेक वर्षापासुन भारताच्या उज्ज्वल परंपरा, संस्कृती व कुंभास बदनाम करण्याचा काही शक्ती प्रयत्न करीत आहेत. परंतु, कुंभ दलितविरोधी व स्त्रीविरोधी नसून कुंभामध्ये देशातील सर्व संप्रदाय व पंथाचे लोक सहभागी होतात, म्हणुन कुंभ म्हणजे समरसता व एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव अाहे. प्रयागराजमधील कुंभाची स्वच्छता, शुद्धता व व्यवस्था आपणांस आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही.
-योगी आदीत्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश
स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने उत्तरप्रदेशात नवीन विद्यापीठ सुरु होत आहे. तसेच, उत्तर प्रदेशात दरवर्षी विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ दरवर्षी नियमीत होत असून गेल्यावेळी ११ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ झाले. यापैकी साडे सात लाख (५६ %) विद्यार्थीनी असुन यावरुन मुलींची प्रगती होत असल्याचे दिसुन येते.
-राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेश
देशात आतंकवाद्यांच्या सुटकेसाठी वकिलांची फौज उभी राहते, आतंकवाद्यांसाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय खुले असते पण देशातील बहुसंख्यक हिंदूंच्या भावना ज्या राममंदिराशी जुळलेल्या आहेत त्यावर निर्णय आतापर्यंत होऊ शकला नाही हे दूर्दैव म्हंटले पाहिजे.
-मा. मोनिकाजी अरोरा
आपल्या संस्कृती व परंपरांचा सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे व संस्कृतीचे जतन केले पाहिजे.
-दिग्दर्शक मधूर भांडारकर
युवकांनी आपल्या आवडत्या खेळात इतकी प्रगती करावी की आॅलम्पीकपर्यंत आपण पोहचू शकू. आपल्या विजयाने देशाची मान उंचावेल.
- मुष्टीयोद्धा विजेंद्रकुमार
कुंभाचा आदर्श पुर्ण जगात पोहचला पाहिजे. तरुणांनी आता एकजुट होऊन देशासाठी कार्य करायचे आहे.
- कुस्तीपटू सुशिलकुमार
राममंदिर निर्माण झाले पाहिजे व ते याच सरकारच्याहस्ते झाले पाहिजे अशीच आपली सर्वांची इच्छा आहे. जगात तरुणांचा देश म्हणुन आपली ओळख झालेली असताना देशातील युवकांनी राष्ट्रोध्दारासाठी संकल्प करण्याची गरज आहे. तो संकल्प पुर्ण करण्याची व अडचणींचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुमची जर अशी तयारी असेल तर तुमचा पराजय होणे शक्य नाही. असे झाल्यास देश परम वैभवास गेल्याविना राहणार नाही.भारताचा स्वभाव कुनावर दमन करण्याचा नसून दीपस्तंभाप्रमाणे जगाला प्रकाशमान करण्याचा आहे.
-दत्तात्रयजी होसबळे, रा.स्व.संघ, सह सरकार्यवाह
राममंदिराशिवाय दुसरी कोणतीही वास्तू रामजन्मभूमीत होणार नाही. मीसुद्धा कारसेवा केलीय. अयोध्येत भव्य राममंदिरच होणार.
-केशवप्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
कुंभ समतेचा प्रतिक आहेच, पण हा युवाकुंभ पाहुन देशातील युवक भारतनिर्माणसाठी कटीबद्ध असल्याचा अनुभव होतोय.
-स्मृती इराणी, केंद्रिय मंत्री
भारतातील तरुणांचे सर्वात प्रभावी युवा आयकाॅन जर कोणी असेल तर ते स्वामी विवेकानंद आहे. तरुणांनी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचे ठरवले तर भारत विश्वगुरु झाल्याविना राहणार नाही. आज भारताची ज्या प्रकारे वेगाने सर्वक्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे त्यावरुन भारत विश्वगुरुपदी लवकरच विराजमान होईल असे वाटते.
-राजनाथसिंग, केंद्रिय गृहमंत्री
©कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा