खंत एकट्या सोनु निगमचीच?
खंत एकट्या सोनु निगमचीच?
"आपल्या देशात भारतीय गायकांना गाण्यासाठी म्यूझिक कंपन्याना पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही पैसे दिले नाही, तर ते तुमचं गाणं वाजवणार नाही. त्यासोबतच तुम्हाला गाणंही मिळू देणार नाही. मात्र पाकिस्तानी गायकांसोबत असं केलं जात नाही. त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले जात नाही. मग भारतीय गायकांसोबतच असा दुजाभाव का? पाकिस्तानात जन्मलो असतो तर बरं झालं असतं." अशी खंत सोनू निगमने एका मुलाखती दरम्यान बोलून दाखवली."
देशात कालपर्यंत रोहिंग्या व बांग्लादेशींची घुसखोरी वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता पाकिस्तानी नागरीकांची कलाकाराचा मुखवटा घालून कशी घुसखोरी वाढत आहे, व त्याचा भारतीय कलाकारांना कसा फटका बसत आहे हे लक्षात येऊ शकेल. पाकड्यांच्या या स्मार्ट घुसखोरीचा स्व. बाळासाहेबांनी काही वर्षापूर्वीच समाचार घेतला होता व देशाला हा धोकाही लक्षात आणून दिला होता. पण त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. पाकिस्तानी कलाकार, खेळाडू, कोच अश्या लोकांचे उदारमतवादी व सहिष्णू या सदगुणविकृत्यांनी पछाडलेल्या उच्चभ्रू भूरट्या भारतीयांनी जे लांगूलचालन चालवले आहे ते गंभीर आहे.
पाकिस्तानी कलाकार भारतात येतात. कमी पैश्यात व सवलतीत काम मिळवतात. रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात. त्यातून आम्ही किती पुढारलेल्या विचारांचे आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न करतात. असे करताना भारतीयांची खुशामत करण्यासाठी प्रयत्न करतात. आम्हीही भारतावर प्रेम(?) करतो, हे लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करतात. आणि याच खोट्या सदगुणांच्या जोरावर भारतातलीच एखादी अभिनेत्री, गायिका किंवा कलाकार आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात व तिच्याशी निकाह करतात. या यथोचित नियोजनबद्ध नापाक खेळीला स्मार्ट लव्ह जिहाद म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
पाकिस्तानाचे सध्या पोट भरण्याचे देखिल वांदे झाले आहेत. चीनच्या भीकेवर त्यांचे जगणे अवलंबून झाले आहे. त्यातच अमेरिकेनेही त्यांना मदत बंद करुन टाकली आहे. मुस्लीम राष्ट्रेसुद्धा पाकिस्तानला दारावर उभे करायला तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू व कलाकारांना भारतात आपली कदर केली जाईल अशी आशा वाटते. लाचार पाकिस्तानी मुँहमांगी रकम मोजतात व कमी पैश्यात म्युझिक कंपन्यांची व फिल्म कंपन्यांची हुजरेगीरी करायला तयार होतात. म्हणुन त्यांचे सगळे चोचले पुरवले जातात व भारतीय कलाकारांना दुय्यम स्थान मिळते. भारतीय असुन जर आरल्यावरच अन्याय होत असेल तर त्याहुन अपमान तो कोणता? म्युझिक कंपन्यांच्या या दांडगाईला लवकर आळा बसवला पाहिजे. राष्ट्रवाद व देशहिताच्या मोठमोठ्या गोष्टी करणा-या नेत्यांचे याकडे लक्ष नाही का? विरोधी पक्षाकडून तर यावर विरोध होण्याची अपेक्षाच नाही. त्यांचे नेते पाकिस्तानात जाऊन भारताचे वाभाडे काढतात व पाकिस्तानचे कौतुक करतात. तेव्हा राज्यातल्या किंवा केंद्रातल्या विरोधी पक्षाकडून ह्या राष्ट्रविरोधी गोष्टीस विरोध करण्याची अपेक्षा ठेवणेच व्यर्थ. पण विद्यमान सरकारांनी यावर तगडा उपाय करणे आवश्यक आहे.
सोनु निगमने मागे मशिदीवरील भोंग्यांविषयीही विरोधात्मक मत नोंदवले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारने मशिदीवरीव भोंगे उतरविण्याची हिंमत दाखवली नाही. आताही देशी व विदेशी कलाकारांना भेदभावात्मक वागणुक दिली जात असल्याची खंत त्याने व्यक्त केली. सोनु निगममुळे हा मुद्दा प्रकाशात आला. पण ही व्यक्त होण्याची हिंमत सगळेच दु:खी भारतीय दाखवु शकणार नाही. देशात व राज्यात भारतीयांचे असेच विविध क्षेत्रात गळे दाबले जात नसतिल व भेदभाव होत नसेल हे कश्यावरुन? पण असे अजुन सोनु निगम हवेत. त्यांनी पुढे यायला हवं. आणि सिनेसृष्टीत व कलासृष्टीत कसे विदेशी 'गाजरी गवत' फोफावलंय हे दाखवुन द्यायला हवं.
-कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा