पोस्ट्स

उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य??

उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य?? #तिरपी_टांग त्या दिवशी महाशय जरा नाराजीत दिसत होते. नीट बोलत नव्हते की हसत नव्हते. तसे मघाशीच फार आनंदात होते महाशय. कोर्टाने दिवाळीतील फटाक्...

नरभक्षक वाघ की वाघभक्षक नर?

इमेज
नरभक्षक वाघ की वाघभक्षक नर? #तिरपी_टांग दर आठ दहा दिवसांनी पेपरला वाघांविषयी बातमी ठरलेली आहे. अर्थात चारपायाच्या ओरीजनल वाघांची. कधी ते मानवी वस्तीत शिरतात, कधी शहरात प्...

मीटू व अपरिचीत

इमेज
मीटू व 'अपरिचीत '!! सैफली म्हणतो माझ्यासोबतही २५ वर्षापुर्वी अन्याय झाला होता. तो अन्याय लैंगिक स्वरुपाचा नव्हता. पण ते आठवल्यावर आजही तळपायाची आग मस्तकात जाते. काय आठवते ...

मीटू: नुसतेच आरोप की अजुन काही?

इमेज
मीटू: नुसतेच आरोप की अजुन काही?       काही दिवसापुर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतातील हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर दहा वर्षापुर्वी लैंगिक दुर्वतन केल्याचे आरोप केले. यामुळे मिडियात एकच खळबळ उडाली. गेल्या महिनाभरात सोशलमिडियावरील मीटू चळवळीत अश्याप्रकारच्या आरोपाच्या फैरींची संख्या शंभरीपार गेली आहे. विंता नंदा यांनीही ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचे आरोप केले व सगळ्यांना पुन्हा एक धक्का बसला. ज्या ज्या कलाकारांवर आरोप होत आहेत त्यांचे भारतातील लोक फार मोठ्या संख्येने चाहते आहेत. त्यामुळे खरं खोटं काय ते समजायला मार्ग नाही. या अभियानामुळे अजुन किती जणांवर आरोप होणारेत व पुढे हे मीटू नावाचं वादळ काय थैमान घालणार, हे काहीच सांगता येत नाही.       मी टू अभियानाच्या माध्यमातून कधीकाळी झालेल्या अत्याचाराविरोधात आज अचानक आवाज उठवणे अनेकांना शंकास्पद वाटत आहे. ते स्वाभाविक आहे. पण त्यात तथ्य नाही. दहा वीस वर्षापुर्वी अत्याचार झाले तेव्हाच त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार का केली गेली नाही, अ...

कपडे, दर्शन व प्रदर्शन

इमेज
कपडे, दर्शन व प्रदर्शन आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशातच आधुनिकतेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गावरुन भरकटले असावे असे चित्र निर्माण झाले आहे. छद्मी पुरोगामीत्व, छद्मी विज्ञानवाद, छद्मी विवेकवाद व स्वत:ला बुद्धीवादी म्हणुवुन घेणा-या ढोंगी लोकांमुळे या सर्व संकल्पना जणु आपला मुळ प्रवाह सोडून भरकटत चालल्या आहे असे वाटत आहे. याला कारणीभूत असलेल्या नुकत्याच महिनाभरात चर्चेत आलेल्या शबरीमाला मंदिर निकाल, कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराचे प्रकरण  यांसारख्या घटना जरी लक्षात घेतल्या तरी लक्षात येऊ शकेल. नैतिकता आणि सदसद विवेकबुद्धी नावाचा प्रकार मानवाला मिळालेली अमुलाग्र देणगी आहे. ज्याचा वापर त्या व्यक्तीवर अवलंबुन असतो. पण हल्ली नैतिकता आणि विवेक नावाच्या गोष्टींना काही किंमतच उरलेली दिसत नाही, असे या घटनांवरून वाटू लागले आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे परिधान करुन जाण्यास विरोध दर्शवणा-या पश्चिम महाराष्ट्र देवालय समितीच्या एका निर्णयावर सध्या वादंग निर्माण झाले आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी तर समितीला चोप देण्याची भाषा वापरली. इतरवेळी दुस-यांना न्याय, ...

मुस्लीम समावेशक हिंदुत्व??

इमेज
मुस्लीम समावेशक हिंदुत्व?? सरसंघचालक हिंदुत्वाविषयी नेमकं काय बोलले? 》》 "हिंदुत्व या विषयावर (१८ सप्टेबर) बोलताना मोहनजी म्हणाले, की हिंदुत्व हा विचार संघाने शोधलेला विचार नाही. हिंदुत्व या विचाराचे उगमस्थान भारताच्या प्राचिन संस्कृतीपासुनच आहे. सर्व मानवाचे कल्याण, सर्वसमावेशकता, परस्परांबद्दल आदरभाव, वसुधैव कुटुंबकम व मानवता या विचारांना आत्मसात करणे म्हणजेच 'हिंदुत्व' आहे . तसेच देशभक्ती, संस्कृती व आपल्या पुर्वजांचा गौरव हे हिंदुत्वाचे तीन आधारस्तंभ असल्याचेही सरसंघचालकांनी सांगितले. दुष्टांबाबतही चांगला विचार करणे आपली संस्कृती शिकवते. हाच विचार संघाचाही आहे. याचे स्पष्टीकरण करताना मोहनजींनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानातील 'जे खळांची व्यंकटी सांडो' या ओवीचा आधार घेतला. आम्हाला दुष्ट व्यक्तीविषयी चीड नाही, तर त्याच्यातील दुष्ट विचारांची अडचण आहे. त्या व्यक्तीला दुर्गुणविरहित घडवुन आपलेसे करणे म्हणजे हिंदुत्व आहे. संघ याच विचारावर आजपर्यंत चालत आला आहे, असेही त्यांनी सांगितले. मोहनजींचे मुस्लीम समावेशक हिंदुत्वाचं विधान समजुन घेताना या गोष्टीचा विचा...

जरा दूरदृष्टी हवी...

इमेज
जरा दूरदृष्टी हवी... दिल्लीच्या विज्ञान भवनातील सरसंघचालकांच्या भाषणामुळे अनेक 'हिंदुप्रेमी' दुखावले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी मांडलेले 'सर्वसमावेशक हिंदुत्व'. पण संघावर लगेच टिका करण्यापेक्षा विचार करा. थोडे दिवस आधीच 'शिकागो' येथे 'विश्व हिंदु काँग्रेस'चा कार्यक्रम झाला. विश्व हिंदु काँग्रेस आता जगाच्या कानाकोप-यात राहणा-या हिंदुंच्या हितासाठी काम करणार आहे. या कार्यक्रमासाठी ६० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी व राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. जगातील सर्व महासत्तांनी या कार्यक्रमाची नोंद घेतली आहे. उद्या विश्व हिंदु काँग्रेसचे काम करत असताना मुस्लीमबहुल देशात किंवा ख्रिश्चनबहुल देशात कट्टर हिंदुवादीपेक्षा कट्टर मुस्लीमविरोधक किंवा कट्टर ख्रिश्चन विरोधक असलेल्या आरएसएसची संलग्न संघटना आपल्या देशात सक्रिय होतेय म्हंटल्यावर तेथिल कट्टरवादी मुस्लीम किंवा ख्रिश्चन वि.हिं.काँ. चे काम चालू देतील काय? तेथिल सरकार वि.हिं.काँ.ला मान्यता देईल काय? त्यासाठी संघाच्या अजेंड्याचा विचार केला जाईल. संघचालकांच्या विचारांचा विचार केला जाईल. आणि संघाचा मुस्लीम विरोधी ...