जरा दूरदृष्टी हवी...
जरा दूरदृष्टी हवी...
दिल्लीच्या विज्ञान भवनातील सरसंघचालकांच्या भाषणामुळे अनेक 'हिंदुप्रेमी' दुखावले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी मांडलेले 'सर्वसमावेशक हिंदुत्व'. पण संघावर लगेच टिका करण्यापेक्षा विचार करा. थोडे दिवस आधीच 'शिकागो' येथे 'विश्व हिंदु काँग्रेस'चा कार्यक्रम झाला. विश्व हिंदु काँग्रेस आता जगाच्या कानाकोप-यात राहणा-या हिंदुंच्या हितासाठी काम करणार आहे. या कार्यक्रमासाठी ६० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी व राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. जगातील सर्व महासत्तांनी या कार्यक्रमाची नोंद घेतली आहे.
उद्या विश्व हिंदु काँग्रेसचे काम करत असताना मुस्लीमबहुल देशात किंवा ख्रिश्चनबहुल देशात कट्टर हिंदुवादीपेक्षा कट्टर मुस्लीमविरोधक किंवा कट्टर ख्रिश्चन विरोधक असलेल्या आरएसएसची संलग्न संघटना आपल्या देशात सक्रिय होतेय म्हंटल्यावर तेथिल कट्टरवादी मुस्लीम किंवा ख्रिश्चन वि.हिं.काँ. चे काम चालू देतील काय? तेथिल सरकार वि.हिं.काँ.ला मान्यता देईल काय? त्यासाठी संघाच्या अजेंड्याचा विचार केला जाईल. संघचालकांच्या विचारांचा विचार केला जाईल. आणि संघाचा मुस्लीम विरोधी अजेंडा दाखवला म्हणजे ती परवानगी देतील काय?
जरा विचार करा, संघाने आजपर्यंत संघबाह्य लोकांसाठी अशी खुल्या पद्धतीने व्याख्यानमाला घेतलीय का? निश्चितच नाही.
अशी व्याख्यानमाला घेऊन संघाला जगाला संदेश द्यायचा होता की, आम्ही हिंदुत्ववादी आहोत; पण आमच्या मनात इतर धर्मीयांविरुद्ध द्वेष नाही. तसा तो खरच नाहीये. पण पुर्वीपासुन काही संघविरोधकांनी संघाची बदनामी व्हावी व राजकारण साधता यावे म्हणुन संघ मुस्लीमविरोधी आहे अश्या अफवा पसरवल्या होत्या. खर तर संघ हिंदुंसाठी काम करणारी संघटना. अन्य धर्मीयांकडून लव्हजिहाद सारखे फतवे काढून धर्मांतरण केले जात असेल, तर संघाने त्याविरोधात काम केले आहे व करत आहे. पण संघाला या कार्यक्रमातुन आपल्या व्यापक व सर्वसमावेशक हिंदुत्वाचा विचार जगासमोर ठेवायचा होता.
युरोप, आॅस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका सारख्या ठिकाणी हिंदुंची लाखोने संख्या आहे. पण ते संघटित नाही. त्यांच्यावर होणा-या अन्यायाचा विरोध करण्यापेक्षा त्यांना धर्म बदलणे अधिक सोयीचे वाटते. म्हणुन विश्व हिंदु काँग्रेसचे महत्व आहे. ते लक्षात घेतले पाहिजे. आणि विश्व हिंदु काँग्रेसला सर्व देशात मान्यता मिळावी म्हणुन संघातर्फे दिल्लीच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असु शकते. कारण त्या कार्यक्रमाकडे सर्व जगाचे लक्ष होते. विदेशातील मिडीयाने त्या कार्यक्रमाची नोंद घेतली.
भारतातही पुर्वीपासुन काही लोकांनी मुसलमान व दलितांना केवळ संघाचा व हिंदुत्ववाद्यांचा धाक दाखवुन आपल्या गोटात बांधुन ठेवलंय. मोहनजींचे सर्वसमावेशक, समरसपुर्ण हिंदुत्वाचे भाषण ऐकुन त्यांच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण हिंदुंपासुन भीतीने किंवा द्वेषाने दूर पळणारा आपलाच भटक्या समाजातील, दलित समाजातील बंधु आपल्याकडे निर्भयतेने परतण्याचा विचार करणार आहे. हे त्यांच्या नावावर पोळी शेकणा-यांना रुचणारं नाही.
हिंदुंची किंवा संघाची भीती दाखवुन मुस्लीम तरुणांना ते धर्मांध व कट्टर जिहादी बनवलं जात होतं, त्याच्यावर आता अंकुश लागु शकतो. मुस्लीम समाज संघाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा प्रयत्न करेल. हेच विरोधकांना, मुस्लीमनेत्यांना, दलितनेत्यांना नकोय. कारण सर्व समाज एकत्र झाला तर त्यांच्या राजकिय रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल. दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमाकडे जरा सकारात्मक व दुरदृष्टी ठेवुन पहा. जगाच्या कानाकोप-यात वसलेल्या असंघटित हिंदुंचा विचार करा. नाहीतर हिंदुंना शाप आहेच, ऐन विजय डोळ्यासमोर असताना आपापसात भांडण्याचा!
जरा...दूरदृष्टी ठेवा...
-कल्पेश जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा