मीटू व अपरिचीत

मीटू व 'अपरिचीत'!!

सैफली म्हणतो माझ्यासोबतही २५ वर्षापुर्वी अन्याय झाला होता. तो अन्याय लैंगिक स्वरुपाचा नव्हता. पण ते आठवल्यावर आजही तळपायाची आग मस्तकात जाते.

काय आठवते हे वाचल्यावर?

मी टू ही चळवळ आता केवळ स्त्रियांवर होणा-या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. मी टू नावाच्या लाटेचे पाणी आता भिन्न भिन्न प्रकारच्या अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याची नांदी ठरू शकते.

मग ती नोकरी लागताना होणारी फेरफार वा भ्रष्टाचार असो, कधीतरी नोकरीत पर्मानंट होऊ या आशेवर जगणा-या मजुरांना अतिशय कमी पगारात राब राब राबवुन घेणारे कंपन्यांचे चालक अधिकारी असो, नोकरी मिळावी म्हणुन रात्रंदिवस अभ्यास करुन चांगले गुण मिळवले असुनही व नोकरीच्या सर्व पात्रता अंगी असुनही नोकरी मिळवण्यासाठी ब्लॅकमेल झालेले लाचार असो, केवळ पैसे नव्हते म्हणुन नोकरी किंवा बढती मिळाली नाही असे अन्यायपीडित असो, कंपनीसोबत घरचेही कामे करुन घेणारे मुजोर ढेरपुटे साहेब असो, आपल्यावर अन्याय अत्याचार झालेला असतानाही पोलीसात तक्रार न घेतली गेलेले पीडित असो, केवळ पैसे कमी होते किंवा काॅलेजात होणा-या विद्यार्थ्यांच्या गळचेपीविरोधात आवाज उठवला म्हणुन म्हणुन काॅलेजांमध्ये प्रवेश नाकारले गेलेले वा वारंवार परीक्षेत नापास केले गेलेले वा तत्सम त्रास झालेले शेरदिल अन्यायपीडित विद्यार्थी असो. हे सर्व दबलेले आवाज आज एक होऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात एकवटले, तर सत्तेच्या, पैशाच्या, खुर्चीच्या किंवा अधिकाराच्या मुजोरड्या टेकडीवर बसलेल्या सर्व खलनायकांचे कान बधीर होऊ शकते.

अश्या प्रकारच्या अन्यायास बळी पडलेल्या पण काही कारणास्तव त्याविरोधात आवाज उठवू न शकलेल्या सर्व समदु:खी मंडळींचा कोप झाल्यास मी_टू ची लाट फक्त स्त्रीयांपुरती मर्यादीत न राहता ज्यांनी ज्यांनी आपल्या फायद्यासाठी कोणावर अन्याय केला असेल, त्यांच्या नाकातोंडात मीटू चे पाणी घुसल्याशिवाय राहणार नाही.

या परिस्थितीला जुळणारा साऊथ चित्रपट 'अपरिचित' आठवतोय. फक्त फरक एवढाच आहे, की तिकडे मानवसदृष्य व्यक्ती अन्यायाविरोधात प्रतिशोध घेतो, इथे 'मीटू'नामक एक सोशलमिडियावरील चळवळ.

अब हर पीडित बोलेगा...
"आली रे आली, आता तुझी बारी आली"

- कल्पेश जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान