पोस्ट्स

'चार बोटांचा निर्देश'...

     आपल्या देशात गरीबीवर आणि दारिद्र्यावर तसेच बेरोजगारीवर गळे काढणा-या मंडऴींची अजिबात कमी नाही. त्यातील बहुतेक सगळेच कायम सरकारला धारेवर धरतात. कारण सरकार देशाचा च...

"नोटबंदीची गुलाबी आठवण"

इमेज
२०१७ या संपुर्ण वर्षात प्रसारमाध्यमात व जनसामांन्यात सर्वात जास्त चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे 'नोटबंदी'! एकीकडे शालेय विद्यार्थ्यांपासुन ते गावागावातील कट्यांवर, पारावर, पानटप-यांवर व सार्वजनिक ठिकाणी कधी नव्हे इतके अर्थतज्ञ आढळुन येऊ लागले. देशाच्या पंतप्रधानांच्या निर्णयातील चुका शोधणे म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा शहाणे असल्याचा अविर्भाव कित्येकांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. तर...काही जणांचा नोटाबंदीचा निर्णय कसा योग्य आहे, हे सोशल मिडियापासुन ते गल्लीगल्लीतील गप्पांमध्ये पटवुन देताना प्रयत्नांची शर्थ लागत होती. काहींना जुन्या नोटा परत करतानाचा त्रास होत होता, तर काहींना गुलाबी नवीन नोट पाहुन आनंद होत होता. नवीन येणा-या २०००च्या नोटविषयी तर सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या अफवा पसरत होत्या. पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाचा कुठे आनंद व्यक्त होत होता, तर कुठे शक्य तितकी अवहेलना केली जात होती. आनंद - दु:ख, उत्साह - यातना, भक्ती - द्वेष, समर्थन - निरोधन यांसारखा विरोधाभास नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रकर्षाने जाणवला. कारण एकच...'नोटबंदी'!!      ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी भारता...

'पुरोगामीत्व, दैव आणि श्रद्धा'

                                                           पुरोगामीत्व, दैव आणि श्रद्धा       आजपर्यंत आपण अनेक लेख, कथा, निबंध देव व श्रद्धा-संस्कृती यांविषयी वाचलेले आहेत. 'जगात देव आहे' हे मांडण्यासाठी देवाची वकिली करणे हा यामागचा उद्देश्य नसतो. देवाची वकिली करणारे आपण कोण? स्वत:च्या अस्तित्वाचा साक्षात्कार तो भिन्न प्रकारे देत असतो. तो काहींना कळत नाही यात त्याचा मुळी दोष नाही. परंतु समाजाला त्याच्या संस्कृतीपासुन, कर्तव्यापासुन आणि धर्मापासुन कोणी फसवेगीरी करुन दूर नेऊ पाहत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी या धर्मद्रोही विकृतींशी लेखणीयुद्ध करावेच लागते. किंबहुणा तेच लेखकाचे आद्य कर्तव्य असते. म्हणुन हा माझा सुक्ष्म प्रयत्न.     पाप पुण्यापासुन ते स्वर्ग-नरक या संकल्पनांपासुन मणुष्य कधी दूर तर कधी जवळ जाताना दिसतो. आपल्याला येत असलेल्या अनुभवातून सोयीस्कररीत्या दैवावर विश्वास ठेवणे आणि न ठेवणे मण...

"भंसाळी - एक (दु)प्रवृत्ती"

इमेज
     दिग्दर्शक व निर्माता भन्साळींच्या चित्रपटाला पुन्हा एकदा विरोध होतोय. दोन वर्षापुर्वी असाच विरोध 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाला होत होता. यावरुन भन्साळींची 'उपदव्यापी' अशी प्रतिमा तयार झालीय. आणि का होऊ नये? ज्या व्यक्तीला समाजाशी काही देणं घेणं नाही, राष्ट्रीय एेक्याशी काही एक घेणं नाही आणि एक कलाकार म्हणुन जो स्वत:चं कर्तव्य समजु शकत नाही त्याला उपदव्यापीच म्हंटलं पाहिजे. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आपण कुठल्या थराला जातोय याचं भान जवळपास सगळेच सिनेसृष्टीतील कलाकार विसरलेले दिसतात. त्यातीलच एक म्हणजे भन्साळी. बाजीराव मस्तानी चित्रपटातही बाजीराव मस्तानीची प्रेमकथा अतिशयोक्तीने रंगवुन दाखविण्यात आली होती. चित्रपटातील बाजीराव-मस्तानी आणि बाजीराव-काशीबाई या जोडीचे काही हाॅटसीन दाखवले गेले होते. का? तर हाॅटसीनमुळे लोक चित्रपटाकडे आकर्षित व्हावे म्हणुन? कल्पकता करावी ती किती? ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यांचं भांडवल करुन पैसे उकळायचे आणि मनोरंजन, कला, स्वातंत्र्य पुढे करुन लोकांसमोर खोट्या गोष्टी मांडायच्या. वर अभिव्यत्ती स्वातंत्र्याची बदनामी करायची.   ...

'म्हैसुरचा महिषासुर'

इमेज
     महाराष्ट्र साम्राज्याचा विस्तार होत होता. मराठ्यांनी दिल्लीची पातशाही हादरवुन सोडली होती. हिंदूंच्या राजसत्तेला डिवचण्याची हिंमत करेल असा हर एक शत्रु मराठेशाहीच्या चाबकाने सोलुन निघत होता. अख्या हिंदूस्तानात हिंदू राजसत्तेला परिणामकारक विरोध करु शकेल असा विरोधक शिल्लक राहिला नव्हता. परंतु, अश्या काळीही दक्षिण भारतात हैदरअल्ली नामक मुसलमान हिंदू राजाच्या हाताखाली अधिकारावर चढत होता. त्या हिंदू राजाच्या 'सर्वधर्मसमान' व 'उदारीपणा'च्या भोंगळसुत्रीपणामुळे हैदर सत्ता काबिज करुन बसला. हैदरने हिंदूराजास बाजु सारुन सर्व राजसत्ता स्वत:च्या हाती घेतली. त्याच्या अंगी क्षत्रियाकडे असावे ते मुत्सद्दीपणा, शूर, पराक्रमी, चतुर असे सारे गुण होते. हैदरच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र टिपू याच्याही अंगी तेच सर्व गुण होते. पण एक राजा किंवा शासक म्हणुन त्यांच्या अंगी प्रजेला समान न्याय देणारे गुण होते काय? ते प्रजाहितदक्ष होते काय? ज्या प्रमाणे हैदरपुर्वीच्या हिंदू राजा चिक्क कृष्णराजने आपल्या पदरी महत्वाच्या पदांवर मुसलमानांनाही मान दिला होता तसा हैदर किंवा टिपुने त्यांच्या पदरी हिंदू सरद...

एसटी कर्मचा-यांच्या व्यथा:

इमेज
लेख प्रकाशन दि 20.10.2017       महाराष्ट्राची लालवाहिनी असलेली एस.टी. बस ऐन दिवाळीत आगारात तळ ठोकुन आहे. कारण या लालवाहिनीत प्राण ओतणा-या कामगारांनी सातवा वेतन आयोग लागु व्हावा यासाठी संप पुकारला आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाश्यांची चांगलीच फजिती झाली आहे. परंतु एसटी कामगारांचीही दिवाळी अजुन गोड झालेली नाही. घरादारापासुन दूर एसटी आगाराबाहेर संपकरी ठाण मांडून आहेत. त्यात राज्य सरकारने अजुनही या संपाविषयी सकारात्मकता आणि एसटी कामगारांच्या मागण्या व समस्या जाणुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही. उलट परिवहन मंत्र्यांचे "अजुन २५ वर्ष सातव्या वेतन आयोगासाठी विचार होऊ शकत नाही" असे बेजबाबदार विधान आगीत तेल ओतणारे ठरणार आहे. सरकारने एसटी कामगारांच्या मागण्यांकडे कानाडोळा केलेलाच आहे पण, विरोधीपक्षांनीही या कामगारांसाठी अजुन पर्यंत आवाज उठवलेला नाही हे विशेष. त्यामुळे एसटी कामगारांचा संप अधांतरी झाला आहे. पण, तरीही राज्यातील सर्व एसटी कामगार या संपात उतरलेले आहे आणि स्वत:च्या मागण्यांसाठी पुर्ण शक्तीनिशी लढा चालुच राहणार असे चित्र आहे. या संपामागे वेतनवाढ ...

#"फाशीच्या शिक्षेचे आव्हान"#

इमेज
    #..फाशीच्या शिक्षेचे आव्हान..#     न्याय, समता, बंधुता या मुलतत्वांना समाज व्यवस्थेत जितके उच्च स्थान दिले तितका समाज सुरक्षित, सुसंस्कृत व विवेकी बनतो. पण समानतेचा विचार करण्याला काही लगाम असतो का? जर असेल तर त्यांना कुठे ताण द्यावा आणि कुठे सैल सोडावे? असे काहीसे प्रश्न पडतात, जेव्हा समानतेचा विचार एखाद्या गोष्टीच्या दोन अंगांना स्पर्श करू लागतो. अश्याच एका प्रकरणाने समानतेचा तराजू हेलकावे खाऊ लागला आहे. निमित्त्य आहे सुप्रीम कोर्टात केलेल्या एका याचिकेचे. “फाशीची शिक्षा असंवैधानिक असून जीवन संपवण्याची ती सन्मान जनक पद्धत नाही” अश्या प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यासाठी फाशीमागची समानता तपासुन पाहण्याची वेळ आली आहे.     ‘त्रास रहित मरणाचा अधिकार’ आणि ‘सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकारा’मुळे फाशीच्या शिक्षेला आव्हान मिळाले आहे. ज्या प्रमाणे ‘डोळ्यासाठी डोळा’ हे तत्व पटू शकत नाही, मग ‘मृत्यूसाथी मृत्यू’ हे तत्व कसे पटू शकते.? तसेच, केवळ फाशीच्या शिक्षांमुळे गुन्हेगारीला पूर्णत: आळा बसला आहे का? हे प्रश्न सामान्...