पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रावणाचा अतिरंजित प्रचार

इमेज
रावण काय तर विद्वान होता, शास्त्रांचा अभ्यास केला होता, वेद अध्ययन केलं होतं आणि अजून काय तर वीणावादक होता आणि म्हणून काय तर तो चांगला होता म्हणे.  माणूस कर्तृत्वाने आणि कृतीने चांगला किंवा वाईट ठरतो. रावणाने आपल्या वरदानाचा जो दुरुपयोग करून देव, दानव, यक्ष, गंधर्व, नाग आदी लोकांना त्रास दिला , छळ केला  त्यावरून तो कोणत्या चांगल्या चौकटीत बसतो?  एवढंच काय तर त्याने अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, राक्षसांच्या अनेक स्त्रियांना बळाने पळवून आणले आणि त्यांचा उपभोग घेतला. कोणत्या अर्थाने तो चांगला वाटतो? त्याची ही कृत्ये रावण भक्तांना समर्थनीय वाटतात का?  रावण काय तर सर्व शक्तिमान होता म्हणे. हे कसं शक्य आहे. रावणाला फक्त वरदान प्राप्त होतं की तो देव, दानव, यक्ष आणि प्राणी यांच्या द्वारे मरणार नाही. त्यामुळे त्याने सर्वत्र उन्माद घातला होता. पण त्याला वालीने काखेत मुंडके धरून मारला होता. तसेच सुमाली, माली आणि माल्यावन रावणापेक्षा बलवान होते असे रामायणात म्हंटले आहे. आणि एका मानवाच्या हाताने (श्रीरामांच्या) त्याचा वध झाला आहे.  ====...

“रावण चांगला होता” म्हणण्याआधी हे वाचा आणि मग विचार करा...

इमेज
रावण चांगला होता. तो परम शिवभक्त होता. बलशाली, वीणावादक, वेद शास्त्रसंपन्न होता, तो ब्राह्मण होता म्हणून काय तर तो चांगला होता असे अनेकजण बोलता बोलता बोलून जातात. पण रावण किती नीच व्यक्ती होता हे आधी समजून घेतले पाहिजे. त्याला चांगलं म्हणून आपण एकप्रकारे त्याच्या दोषांचे समर्थन करत असतो.  रावणाने ब्रह्मा आणि शिवाकडून वरदान प्राप्त करून घेतल्यावर उन्मत्त झाला आणि केवळ पापकर्मे करू लागला. शत्रूच्या बायका, मुलींना पळवून आणणे आणि त्यांचा बळाने उपभोग घेणे हेच रावणाचे नित्य धोरण होते.  त्याशिवाय ऋषी मुनींच्या तपात विघ्न आणणे, त्यांची हत्या करणे, देवांना त्रास देणे, स्वर्गातील अप्सरांवर अत्याचार करणे हाच जणू राक्षस रावणाचा धर्म झाला होता.  रावणाची काही कुप्रसिद्ध कर्मे: 1. रावणाने पाताळातील भोगवतीपुरी मधील नागराज वासुकी व तक्षकला पराभूत करून त्याच्या पत्नीचे हरण केले होते.  2. कैलास पर्वतावर स्वतःचा भाऊ  कुबेर याच्यासोबत युद्ध करून छल कपट करून त्याला पराभूत केले, त्याची सोन्याची लंका हडप केली, त्याच्या राजदुताचीही हत्या केली आणि त्याचे पुष्पक विमानही चोरून ...

रावण–शुर्पणखा खरंच प्रेमळ भाऊ बहिण होते की एकमेकांचे वैरी? काही तथ्य...

इमेज
आजकाल शुर्पनखा आणि रावणाच्या भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या काल्पनिक कथा फार सांगितल्या जातात. पण वस्तुस्थिती काय होती, हेही पाहिले पाहिजे. रावण आणि शुर्पनखेची संशयास्पद भूमिका पाहता त्यांच्यामध्ये कुठेही तितके स्नेहसंबंध असल्याचे दिसत नाही. उलट वितुष्ट असल्याचे प्रमाण मिळते. त्यातील एक प्रमुख तथ्य म्हणजे रावणाने शुर्पनखेचा पती विद्युजिन्ह याची कपट करून हत्या केली होती. शुर्पनखा आणि विद्युजिन्हच्या प्रेम विवाहास त्याचा विरोध होता. विद्युजिन्हा खूप महत्त्वाकांक्षी होता त्यामुळे हा आपले राज्य बळकवेल अशीही त्याला भीती वाटत होती. त्यामुळे शुर्पणखेचे रावणासोबत वितुष्ट झाले होते. त्याचाच प्रतिशोध म्हणून शुर्पणखा रामाच्या हातून रावण वध करून घेण्यासाठी प्रयत्न करते असे अनेक रामायण अभ्यासकानी मांडले आहे.  १. शुर्पणखा ऐशोआरामात लंकेत न राहता खर – दुषणच्या जनस्थान राज्यात विधवा बनून जंगलात का राहत होती?  २. विद्युजिन्हची हत्या झाली तेव्हा शुर्पनखेच्या पोटात गर्भ वाढत होता. तिच्या त्या मुलाचं नाव होतं जम्बुमाली. आपल्या पित्याच्या हत्येबाबत त्याला माहिती होते तेव्हा तोसुद्धा क्रुद्ध ...

राम लक्ष्मणने शुर्पणखेवर अन्याय केला होता का?

इमेज
राम – लक्ष्मणाने शुर्पणखेवर अन्याय केला होता का? पिवळी पुस्तके वाचून काल्पनिक इतिहास वाचणारी काही जातीवादी लोक म्हणतात लक्ष्मणाने शुर्पणखेवर अत्याचार केला. अबला नारीवर हल्ला केला. आणि म्हणून काय तर राम लक्ष्मण महिला विरोधी होते म्हणे? काहीजण तर शुर्पणखाचा आदिवासी महीलेपर्यंत संबंध लावून मोकळे होतात.  पण वस्तुस्थिती तर ही आहे की शुर्पणखा आणि तिचं त्यावेळेचे वागणे स्त्रीवर्गाला लाजवेल असे आहे.  १. शुर्पणखा दिव्य स्वरूप श्रीरामास पाहून इतकी भाळते की ती श्री रामांना आपली भार्या करवून घेण्याची अतीव मागणी करते.  २. ती म्हणते, “तुम्ही मला भार्या म्हणून स्वीकार केलं की कामभावनेने दंडकारण्य वनात विहार करू.” ३. सीतेला ती कुरूप म्हणून तिला त्यागण्याचे सांगते. शिवाय मी तिला मारून तिचे रक्त पिते असेही ती पुन्हा पुन्हा बोलून दाखवते.  ४. शुर्पणखाचे हे बोलणे ऐकून राम – लक्ष्मण दोघेही तिचा उपहास करत असतात. राम तिला लक्ष्मणाकडे जाण्यास सांगतात, तर लक्ष्मण पुन्हा रामाकडे पाठवतात.  ५. लक्ष्मणास तर ती अक्षरशः प्रणय याचना करते. जे कुठल्याही शीलवान स्त्री ला शोभणारे नाही. ...

रावणाच्या आडून वर्ग संघर्षाचा डाव!

इमेज
दसरा जवळ येऊ लागला की काही लोकांचे रावण प्रेम सुरू होते. रावण वाईट आणि मानवता विरोधी कसा होता हे वेगळ्या लेखात मांडतो. पण रावणाने मागील काही वर्षात पुन्हा डोकं का वर काढलं असेल? मागच्या हजारो वर्षात रावण हा सर्व समाजासाठी दुष्ट होता मग आताच त्याच उदात्तीकरण का सुरू झालं? रावणाचा आणि तथाकथित मूलनिवासींचा काय संबंध? याचा सारासार विचार आत्ता करणे अधिक उचित वाटतेय. रावणाच्या उदात्तीकरणामागे डाव्यांचे सुनियोजित षडयंत्र आहे हे समजून घेतले पाहिजे. प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावरून प्रश्न उभे करणारे सो कॉल्ड बुद्धिवादी रावणाला का मान्य करत असावे? याचा विचार केला पाहिजे. आपल्या देशातील कथित बुद्धिवादी, लिबरल गँगने सर्वात अगोदर रामाचे अस्तित्वच अमान्य केले होते. रामायण हे केवळ काल्पनिक काव्य  असल्याचे त्यांनी मांडले. परंतु प्रभू राम व रामायण सत्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर मात्र त्यांचे धाबे दणाणले. ब्रिटिशांच्या फुटीरतावादी नितीवर डाव्यांनी आपली मांड ठोकली आणि येथील गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, शहरी-ग्रामीण, भाषा वाद, प्रांत वाद, वंश वाद आणि आता इतिहासातल्या पात्रांना विविध समाजवर्ग...

प्रसन्न जोशीचा वैचारिक दळीद्रीपणा... म्हणे साहित्य संमेलनाचे तेच ते जुनाट दळीद्री लोगो कश्यासाठी?

इमेज
#जळगांव जिल्ह्यातील #अमळनेर येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. या संमेलनाचा लोगो एकूण कान्हदेशाच्या संस्कृतीला प्रकट करणारा असा बनवला गेला आहे. त्याची थीम ही कान्हदेशातील जनजाती समाजाचं पारंपरिक वाद्य, प्रसिद्ध शेतीपीक केळी (केळीचे पान),  कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याला अनुसरून असलेलं जातं, गोंधळी व भटक्या गोंधळी समाजाशी संबंधित असलेले संबळ, जगप्रसिद्ध मंगळग्रह मंदिर अश्या विविध चिन्हांच्या समावेशाने तयार झालेले आहे.  पुढारी चॅनलचा आणि नेहमीच वादग्रस्त व बालिश वक्तव्य करणाऱ्या प्रसन्न जोशीने मात्र अश्या सर्वसमावेशक लोगोला #दळीद्री म्हणून हेटाळणी करणे म्हणजे संपूर्ण #कान्हदेशाचा अवमान आहे. इथल्या लोककला, संस्कृती, परंपरा आणि लोकांच्या श्रद्धेचा हा जाणीवपूर्वक केलेला अवमान आहे.  कान्हदेशाची केवळ महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात आपल्या भाषा, संस्कृती, कला, परंपरा, नृत्य आदी वैशिष्ट्यांनी ओळख आहे. एसीत बसून विदेशी घेणाऱ्या अश्या दळीद्री लोकांना काय कळणार कान्हदेशाची संस्कृती? त्यांच्या दृष्टीने ग्रामीण भागातील लोक, त्यांच्या परंप...

‘दी वॅक्सिन वॉर’: जग वाचवणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांची कहाणी

इमेज
पल्लवी जोशी दिग्दर्शित ‘दी वॅक्सिन वॉर’ चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाची फार कुठे चर्चा नाही. शाहरुख खानच्या जवान चा ट्रेण्ड कमी होऊ नये म्हणून केलेली मार्केट स्ट्रेटेजी कदाचित असेल. पण आपल्या कुटुंबासह पाहण्यासारखा कोविड काळातील आपल्या वैज्ञानिकांचे शौर्य, धाडस आणि त्यागाची कहाणी म्हणजे ‘दी वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट आहे.  चित्रपटाची सुरुवात जानेवारी २०२० पासून सुरू होते. जेव्हा चीनमध्ये करोना नामक व्हायरस मुळे लोक मरायला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारताची सर्वोच्च वैज्ञानिक संस्था काय करत होती? हे यात दाखवले आहे. चीन च्या वुहान स्थित लॅब मधून हा व्हायरस पहिल्यांदा स्प्रेड झाला, त्यामुळे चिनी लोक वेगाने प्राण गमावत होते आणि चीन पूर्ण जगासमोर खोटं बोलत होता हेही दाखवले आहे.  पण खरी कहाणी सुरू होते, जेव्हा २८ जानेवारी रोजी केरळमध्ये पहिला करोना रुग्ण सापडतो तेव्हा. भारताला घाबरवले जात होते की देशात ४०  कोटी मृत्यू होतील, भारत स्मशानभूमी बनेल. भारत कधीच स्वतःची वॅक्सिन करू शकत नाही, WE CAN'T DO IT असा NARRATIVE पसरवला जात असताना ICMR ने के...