प्रसन्न जोशीचा वैचारिक दळीद्रीपणा... म्हणे साहित्य संमेलनाचे तेच ते जुनाट दळीद्री लोगो कश्यासाठी?
#जळगांव जिल्ह्यातील #अमळनेर येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. या संमेलनाचा लोगो एकूण कान्हदेशाच्या संस्कृतीला प्रकट करणारा असा बनवला गेला आहे. त्याची थीम ही कान्हदेशातील जनजाती समाजाचं पारंपरिक वाद्य, प्रसिद्ध शेतीपीक केळी (केळीचे पान), कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याला अनुसरून असलेलं जातं, गोंधळी व भटक्या गोंधळी समाजाशी संबंधित असलेले संबळ, जगप्रसिद्ध मंगळग्रह मंदिर अश्या विविध चिन्हांच्या समावेशाने तयार झालेले आहे.
पुढारी चॅनलचा आणि नेहमीच वादग्रस्त व बालिश वक्तव्य करणाऱ्या प्रसन्न जोशीने मात्र अश्या सर्वसमावेशक लोगोला #दळीद्री म्हणून हेटाळणी करणे म्हणजे संपूर्ण #कान्हदेशाचा अवमान आहे. इथल्या लोककला, संस्कृती, परंपरा आणि लोकांच्या श्रद्धेचा हा जाणीवपूर्वक केलेला अवमान आहे.
कान्हदेशाची केवळ महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात आपल्या भाषा, संस्कृती, कला, परंपरा, नृत्य आदी वैशिष्ट्यांनी ओळख आहे. एसीत बसून विदेशी घेणाऱ्या अश्या दळीद्री लोकांना काय कळणार कान्हदेशाची संस्कृती? त्यांच्या दृष्टीने ग्रामीण भागातील लोक, त्यांच्या परंपरा दळीद्री आहेत काय?
स्वतःला पुरोगामी, उदार, उच्च विचारसरणीचे म्हणवून घेणाऱ्या या डाव्या लिब्रांडू लोकांना बुद्धिजीवी म्हणून संबोधले जाते, पण यांचा असा वैचारिक दळभद्रीपणा त्यांचे खरे रूप उघडे नागडे करून टाकतो.
प्रसन्न जोशीला केवळ याच लोगोचा नाही तर यापूर्वीच्या लोगोचाही तिटकारा आहे. (अर्थात ही पोस्ट जुनीच पण नव्याने शेअर केली आहे) संत नामदेवांच्या चित्र असलेल्या लोगोला सुधा आक्षेप घेतला आहे. लोगो मध्ये असलेल्या पुस्तक, दौत, मोरपीस लेखणीला कल्पना दारिद्र्य म्हंटले आहे. त्याने टाकलेल्या काही लोगो मध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेले गडकिल्ले, भगवा ध्वज यांचाही समावेश आहे. अर्थात या प्रसन्न जोशीच्या मते हीसुद्धा दळीद्री क्रिएटिविटी आहे. त्याच्या दृष्टीने आता इंटरनेटच्या युगात फक्त टॅब, मोबाईल, लॅपटॉप यांचा समावेश झाला पाहिजे. आणि हेच त्याचं दळीद्री रडगाऱ्हाणं दरवर्षी असतं.
याच अमळनेरच्या संमेलनाच्या लोगो मध्ये घोषवाक्य म्हणून साने गुरुजींचे “बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो” ही ओळ टाकण्यात आली आहे. प्रसन्न जोशी सारख्या लिब्रांडू आणि पाश्चिमात्य देशांची तळी उचलणाऱ्या इंग्रजाळलेल्या दळीद्री लोकांना या घोष वाक्याने मूळव्याध होणार नाही तर काय? ‘भारत विश्वात शोभून राहणार’ असे म्हंटलेले यांना कधीही पचु शकत नाही. ही मळमळ त्याचमुळे असावी.
(हीच ती विवादित पोस्ट👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10160120543212807&id=638107806&mibextid=Nif5oz )
– कल्पेश जोशी
#मराठी_साहित्य_सम्मेलन #जळगांव #कान्हदेश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा