रावणाचा अतिरंजित प्रचार



रावण काय तर विद्वान होता, शास्त्रांचा अभ्यास केला होता, वेद अध्ययन केलं होतं आणि अजून काय तर वीणावादक होता आणि म्हणून काय तर तो चांगला होता म्हणे. 
माणूस कर्तृत्वाने आणि कृतीने चांगला किंवा वाईट ठरतो. रावणाने आपल्या वरदानाचा जो दुरुपयोग करून देव, दानव, यक्ष, गंधर्व, नाग आदी लोकांना त्रास दिला , छळ केला  त्यावरून तो कोणत्या चांगल्या चौकटीत बसतो? 

एवढंच काय तर त्याने अनेक महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, राक्षसांच्या अनेक स्त्रियांना बळाने पळवून आणले आणि त्यांचा उपभोग घेतला. कोणत्या अर्थाने तो चांगला वाटतो? त्याची ही कृत्ये रावण भक्तांना समर्थनीय वाटतात का? 
रावण काय तर सर्व शक्तिमान होता म्हणे. हे कसं शक्य आहे. रावणाला फक्त वरदान प्राप्त होतं की तो देव, दानव, यक्ष आणि प्राणी यांच्या द्वारे मरणार नाही. त्यामुळे त्याने सर्वत्र उन्माद घातला होता. पण त्याला वालीने काखेत मुंडके धरून मारला होता. तसेच सुमाली, माली आणि माल्यावन रावणापेक्षा बलवान होते असे रामायणात म्हंटले आहे. आणि एका मानवाच्या हाताने (श्रीरामांच्या) त्याचा वध झाला आहे. 

=======

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान