राम लक्ष्मणने शुर्पणखेवर अन्याय केला होता का?
राम – लक्ष्मणाने शुर्पणखेवर अन्याय केला होता का?
पिवळी पुस्तके वाचून काल्पनिक इतिहास वाचणारी काही जातीवादी लोक म्हणतात लक्ष्मणाने शुर्पणखेवर अत्याचार केला. अबला नारीवर हल्ला केला. आणि म्हणून काय तर राम लक्ष्मण महिला विरोधी होते म्हणे? काहीजण तर शुर्पणखाचा आदिवासी महीलेपर्यंत संबंध लावून मोकळे होतात.
पण वस्तुस्थिती तर ही आहे की शुर्पणखा आणि तिचं त्यावेळेचे वागणे स्त्रीवर्गाला लाजवेल असे आहे.
१. शुर्पणखा दिव्य स्वरूप श्रीरामास पाहून इतकी भाळते की ती श्री रामांना आपली भार्या करवून घेण्याची अतीव मागणी करते.
२. ती म्हणते, “तुम्ही मला भार्या म्हणून स्वीकार केलं की कामभावनेने दंडकारण्य वनात विहार करू.”
३. सीतेला ती कुरूप म्हणून तिला त्यागण्याचे सांगते. शिवाय मी तिला मारून तिचे रक्त पिते असेही ती पुन्हा पुन्हा बोलून दाखवते.
४. शुर्पणखाचे हे बोलणे ऐकून राम – लक्ष्मण दोघेही तिचा उपहास करत असतात. राम तिला लक्ष्मणाकडे जाण्यास सांगतात, तर लक्ष्मण पुन्हा रामाकडे पाठवतात.
५. लक्ष्मणास तर ती अक्षरशः प्रणय याचना करते. जे कुठल्याही शीलवान स्त्री ला शोभणारे नाही. हा तर स्त्रीत्वाचा अवमान आहे.
६. ती पुन्हा श्रीरामास लग्नासाठी उद्युक्त करू लागते आणि सितेवर अचानक जीवघेणा हल्ला करते. याच वेळी श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मण तलवारीने तिचे कान आणि नाक कापून तिला जखमी करतात. तत्क्षणी ती रडत विव्हळत तिथून पळून जाते.
या सर्व प्रसंगात शुर्पणखावर अत्याचार केल्याचा संबंध नाही की ती अबला होती. कारण ती स्वतः सांगते की ती तिच्या सर्व भावांपेक्षा शक्तिशाली आहे. शिवाय ती नरमांसभक्षण करणारी राक्षस आहे. म्हणजे ती मानव सुद्धा नाही. मग आदिवासी म्हणणं ही तर हास्यास्पद गोष्ट आहे. उलट या सर्व राक्षसांनी वनातील आदिवासी – वनवासी मनुष्य, जनावरे, पक्षी व अन्य जीवांना सतत त्रास देऊन त्यांच्या हत्या केल्या आहेत.
आदिवासी हा वन आणि सृष्टीस देवता मानणारा असतो. तो खऱ्या अर्थाने वनरक्षक आणि वनदेव असतो. त्यामुळे जे लोक राक्षस किंवा असुरांचा संबंध आदिवासी / जनजाती समाजासोबात संबंध लावतात ते जनजाती समाजाचा घोर अवमान करत असतात.
- कल्पेश जोशी , छत्रपती संभाजीनगर
http://lekhagni.blogspot.com/2023/10/blog-post_16.html
#shurpanakha #ravana #adivasi #ramayan #shriram
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा