रावण–शुर्पणखा खरंच प्रेमळ भाऊ बहिण होते की एकमेकांचे वैरी? काही तथ्य...
आजकाल शुर्पनखा आणि रावणाच्या भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या काल्पनिक कथा फार सांगितल्या जातात. पण वस्तुस्थिती काय होती, हेही पाहिले पाहिजे. रावण आणि शुर्पनखेची संशयास्पद भूमिका पाहता त्यांच्यामध्ये कुठेही तितके स्नेहसंबंध असल्याचे दिसत नाही. उलट वितुष्ट असल्याचे प्रमाण मिळते. त्यातील एक प्रमुख तथ्य म्हणजे रावणाने शुर्पनखेचा पती विद्युजिन्ह याची कपट करून हत्या केली होती. शुर्पनखा आणि विद्युजिन्हच्या प्रेम विवाहास त्याचा विरोध होता. विद्युजिन्हा खूप महत्त्वाकांक्षी होता त्यामुळे हा आपले राज्य बळकवेल अशीही त्याला भीती वाटत होती. त्यामुळे शुर्पणखेचे रावणासोबत वितुष्ट झाले होते. त्याचाच प्रतिशोध म्हणून शुर्पणखा रामाच्या हातून रावण वध करून घेण्यासाठी प्रयत्न करते असे अनेक रामायण अभ्यासकानी मांडले आहे.
१. शुर्पणखा ऐशोआरामात लंकेत न राहता खर – दुषणच्या जनस्थान राज्यात विधवा बनून जंगलात का राहत होती?
२. विद्युजिन्हची हत्या झाली तेव्हा शुर्पनखेच्या पोटात गर्भ वाढत होता. तिच्या त्या मुलाचं नाव होतं जम्बुमाली. आपल्या पित्याच्या हत्येबाबत त्याला माहिती होते तेव्हा तोसुद्धा क्रुद्ध होतो आणि रावणाला संपवण्यासाठी सूर्याची उपासना सुरू करतो. मग शुर्पणखा त्याला का समजावीत नाही? उलट तीच त्याच्या मनात रावणाविषयी राग उत्पन्न का करते ? (अरण्यकांड, रंगनाथ रामायण)
३. शुर्पनखा आपल्या दिव्य मायावी शक्तीने राम कोण आहे हे ओळखून घेते, त्यामुळेच ती धर्मासाठी रामाची अप्रत्यक्षपणे साथ देत नाही का? (पूर्वजन्मी शाप देताना ऋषींनी सांगितलेले असते की राक्षस जन्मात तुला प्रभूचे दर्शन होईल.)
४. रावण सीताहरण करतो ती त्याची दुसरी फेरी असते. खर दूषण मारल्या गेल्यानंतर जीव वाचलेला अकंपन नावाचा राक्षस लंकेत जाऊन रावणाला सर्व हकीकत आणि सीतेचे सौंदर्य वर्णन करून सांगतो. तेव्हा ते ऐकून रावण सीताहरण करण्यासाठी येतो, पण मारीच त्याला समजावतो आणि हे पाप न करण्याचं सांगून परत पाठवतो. (अरण्यकांड, सर्ग ३१, अध्याय १, २, ४१, ४२, ४३)
५. अकंपनला आलेले अपयश पाहून शुर्पणखा स्वतः लंकेत जाते आणि मग रावणाला पुन्हा तेच पण विस्ताराने सांगते. रावणाचे राजा म्हणून अक्षरक्ष: वाभाडे काढते. त्याला नालायक आणि बालिश बुद्धीचा म्हणते. सीता तुझीच भार्या झाली पाहिजे असे सांगते. तिचे एक एक अंगाचे वर्णन करून सांगते. तेव्हा रावण पुन्हा सीताहरण करण्यासाठी जातो. शुर्पणखेची ही धडपड कश्यासाठी असते? दोन भाऊ मारले गेल्यानंतरही ती आपल्या तिसऱ्या भावाला बळी पाडण्यासाठी का प्रयत्न करते? (अरण्यकांड, सर्ग ३२, सर्ग ३३, सर्ग ३४)
६. विशेष म्हणजे ती खर आणि दूषण कडेही राम, लक्ष्मण आणि सीतेचे वर्णन करते. पण त्यांना ती म्हणत नाही की सीतेला तुमची बायको करा. मग रावणालाच का नको नको ते भरवले?
७. त्याचं उत्तर आहे रावणाला मिळालेले श्राप. रावणाला मानव सोडून कोणीही मारू शकणार नाही असे वरदान मिळालेले होते. पण त्याला अबला नारीवर बळजबरी अत्याचार केल्यामुळे ब्रह्मदेव, वेदवती, अप्सरा पुंजकुलिस्था व नलकुबेराचा श्राप मिळालेला असतो की कोणत्याही स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श जरी केला तरी तुझा मृत्यू होईल. (युद्धकांड, सर्ग १३, अध्याय १२, १३, १४, १५)
८. रावणाचा मृत्यू कसा होणार हे शुर्पणखा जाणून होती. त्यामुळे तिने रावणाच्या डोक्यात सितेबद्दल आकर्षण निर्माण केले आणि एक नालायक राजा ठरवून त्याचा अहंकार दुखावला व त्याला सीताहरण करण्यास भाग पाडले नाही का?
९. अजून एक म्हणजे शुर्पणखा रावणाला धादांत खोटं सांगते की, ती त्याच्यासाठी (रावणसाठी) योग्य स्त्री (बायको) म्हणून सीतेला आणण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिच्यावर राम - लक्ष्मणकडून हल्ला होतो. मग ती रावणाला खोटं का सांगते? (अरण्यकांड, सर्ग ३४, अध्याय २१)
१०. अजून एक गूढ म्हणजे सीताहरण झाल्यानंतर शुर्पणखा कुठे गायब होते? ती जिवंत असूनही युद्धात का जात नाही? स्वतःला सर्व भावांमध्ये शक्तिशाली समजणारी आपला एक एक भाऊ, भाचे मरत असताना तिला दुःख यातना होत नाही? रावण मेल्यावर लंकेतील त्याच्या सर्व स्त्रिया युद्ध भूमीत येऊन शोक करतात. मग ही रावणाची प्राणप्रिय बहीण कुठे असते?
११. सीता बंदी असताना तिला डिवचायला सुद्धा ती अशोकवनात जात नाही. हनुमानाकडून लंका जाळली जाते तरी ती मध्यस्ती करत नाही. राक्षस वंश नष्ट होत असताना तिला थोडेही दुःख वाटू नये?
१२. खरंच रावणाचे शुर्पनखेवर इतकी माया होती की त्याने त्याचे सर्वस्व केवळ बहिणीचे नाक कापले म्हणून भस्मसात करून टाकले? जो आपले कापलेले मुंडके परत आणू शकतो तो बहिणीचे नाक-कान ठीक करू शकत नाही?
१३. ज्या रावणाला आपल्या आई वडिलांचा अवमान करायला काही वाटत नाही, जो आपल्या सावत्र भाऊ कुबेर सोबत युद्ध करून त्याची लंका हडपतो, आपल्या मेव्हण्याची हत्या करतो, होणाऱ्या सूनेसोबत बलात्कार करतो, विधवा बहिणीला जंगलात निघून जायला सांगतो तो रावण बहिणीवर वेडी माया करणारा कसा असू शकतो???
*एव्हाना सत्य काय आहे ते आपल्या लक्षात आलेच असेल. मग रावणाला बहिणीवर प्रेम करणारा म्हणून का सांगितले जाते? तर भोळ्या भाबड्या जनजाति बांधवांना आपला पूर्वज ‘रावण’ असल्याचे सांगायचे असते ना. तोच आपला देव आणि पूर्वज असल्याचे सांगायचे असते ना. त्यामुळे तो स्त्रीवर अत्याचार करणारा असून कसे चालेल? त्याचे पाप झाकण्यासाठी बहीणप्रेम मध्ये आणावे लागते. म्हणून काहीतरी काल्पनिक गोष्टी तयार करायच्या आणि भोळ्या भाबड्या लोकांना सांगायच्या. जेणेकरून लोकांना आपला आदर्श ‘राम’ न वाटता ‘रावण’ वाटायला लागेल!*
– कल्पेश जोशी
खालील संदर्भ जरूर पहावे....
आता सत्यता बघा....
धन्यवाद. 🙏🙏✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा