पोस्ट्स

शेंदुर्णीला थडग्यांचा वेढा

इमेज
#सोयगांव - #शेंदुर्णी रस्त्यावर लिहा तांडा फाट्याजवळ ही कबर/ थडगं आहे. जेव्हा मी शेंदुर्णी येथे शाळेत जायचो (साधारण 2008 पूर्वी) तेव्हा इथे काहीच नव्हते. किमान मला तर तसे आठवत नाही.  अकरावी बारावीत जात असताना इथे पहिल्यांदा हिरवा झेंडा लावलेला पाहिलेलं मला आठवतं. दोन तीन वर्षापूर्वी इथे कबर स्पष्ट दिसू लागली, त्यावर हिरवी चादर पाहीली.  आत्ता दोन दिवसापूर्वी पाहिले तेव्हा या थडग्याला तारेचे कंपाऊंड झालेले दिसले. मागील 12 ते 15 वर्षात या थडग्याची झालेली वाढ माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. तथाकथित दर्गे आणि कबरी अश्याच निर्माण होत असाव्यात.  विशेष म्हणजे शेंदुर्णी येथून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आता थडगे झाले आहेत हेही एक आश्चर्य. फक्त सोयगाव रस्ता अपवाद होता, आता तोही पूर्ण झाला. शेंदुर्णीचे कबरी–स्तान करण्यासाठी कोणत्या बाबाचे आशीर्वाद आहेत हे शेंदुर्णीकर चांगले जाणतात.  - कल्पेश जोशी

कम्युनिस्टांचा राष्ट्रद्रोह: संस्थानातील पापे

इमेज
@कल्पेश जोशी  हैदराबाद मुक्ती लढ्यात कम्युनिस्टांनीही योगदान दिले, त्यांनी शेतकरी आंदोलन केले, कामगार चळवळ उभी केली, कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवल्या, काही कथित कम्युनिस्ट नेत्यांनी निजामास विरोध केला, कोणी काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिला अश्या नानाविध तर्काच्या आधारावर कम्युनिस्टांना हैदराबाद मुक्ती लढ्यात हिरो ठरवण्याचा प्रयत्न आजवर झाला आहे. काही दिग्गज लेखकांनी व अभ्यासकांनी आपली सर्वसमावेशक, तटस्थ भूमिका दाखवण्यासाठी कोणाला दुखावणे टाळले असेल. परंतु हैदराबाद मुक्ती लढ्यात योगदान म्हणून वरीलपैकी एकही तर्क लागू पडत नाही. स्वतःचा पक्ष किंवा संघटना मोठ्या करण्यासाठी ते प्रयत्न असू शकतात. हैदराबाद संस्थान मुक्त होण्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिक, लाखो नागरिक रक्ताचे पाणी करत होते, नरकयातना भोगत होते. पण याचवेळी कम्युनिस्ट गिधाडे स्थानिक नागरिकांचे लचके तोडण्यासाठी आसुसले होते. कम्युनिस्टांनी मुक्ती लढ्याच्या अशांत व अस्थिर परिस्थितीचा रक्तरंजित क्रांती घडवून आणण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केलेला दिसून येतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर आजतागायत कम्युनिस्टांनी ए...

*‘फादर’लेस अमेरिका आणि भारत*

इमेज
@कल्पेश जोशी एखाद्या कुटुंबात ‘आई’ किंवा ‘वडील’ दोघांपैकी एक जरी नसेल, तरी त्या कुटुंबावर किती संकटे येतात आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यावर किती प्रतिकूल परिणाम होतो, याची भारतीय समाजाला जाणीव आहे. तरीही अशी कल्पना केली, की एखाद्या देशात वडील नसलेली अर्ध्याहून अधिक कुटुंबे होऊ लागली आहेत, तर आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण ही परिस्थिती सद्य स्थितीत ओढवली आहे बलाढ्य अश्या अमेरिका देशात. *_2021 मध्ये एका संस्थेने केलेल्या संशोधनानुसार अमेरिकेत वडील नसलेल्या कुटुंबांची संख्या 24.7 मिलियन (2.4 कोटी) इतकी झाली आहे, जी अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 33% टक्के आहे. अमेरिका सध्या या कौटुंबिक - सामाजिक समस्येमुळे प्रचंड तणावात आहे. अमेरिकेतील लोकांसमोर ही गंभीर समस्या उभी राहिली आहे आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होतच आहे. केवळ अमेरिकाच नाही तर एकूण पाश्चात्य देशात कमी अधिक प्रमाणात ही समस्या वाढीस लागली आहे. अमेरिकेची ही व्यथा डेव्हिड ब्लंकेनहॉर्न या लेखकाने ‘फादरलेस अमेरिका’ या पुस्तकातही विस्तृतपणे मांडली आहे._* पाश्चात्य देशात पूर्वी पती-पत्नी शेवटपर्यंत एकमेकाच...

मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास विसरून चालणार नाही. आम्हाला ‘या’ गंभीर प्रश्नांचा विचार करावाच लागेल!*

इमेज
1. हजारो निरपराध लोकांची हत्या करविणारा धर्मांध जिहादी कासिम रझवी 1956 मध्ये तुरुंगातून सुटताच कोणाच्या मदतीने पाकिस्तानात पळून गेला? 2. ज्या निजामामुळे हैदराबाद संस्थान एक वर्ष उशिरा स्वतंत्र झाले, हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान झाले, निरपराध लोक मारल्या गेले व ज्याने स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्या निजामाला पुन्हा राजप्रमुख का करण्यात आले ? 3. इत्तेहादुल मुसलमिन (MIM) या देशविरोधी धर्मांध संघटनेवर हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी तत्काळ बंदी घातली होती. या देशविघातक संघटनेची बंदी जवाहरलाल नेहरूंनी का काढली? 4. आजची ओवेसी प्रणित AIMIM संघटना ही त्याच कासिम रझवीच्या संघटनेची वारसा चालवते आहे. त्यांचे नेते कधीच मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाला अभिवादन करत नाही, मुक्तीसंग्राम दिनी झेंडावंदन करण्यासही उपस्थित राहत नाही. का? 5. ज्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वावर मुक्ती लढा यशस्वी झाला, संस्थानात काँग्रेसचे काम वाढले, त्या राष्ट्रभक्त स्वामीजींवर मुक्तीसंग्राम नंतर काँग्रेसने खोटे नाटे आरोप करून अन्...

संघाच्या भूमिकांचा त्रास कोणाला आणि का?

इमेज
पू. सरसंघचालक यांच्या मुंबईतील संत रविदास जयंती निमित्त भाषणावरून अनेक उलटसुलट चर्चा काल परवापासून सुरू झाल्या आहेत. खरेतर मोहनजी भागवत यांनी केलेले विधान हिंदू धर्माशी अतिशय पूरक आणि क्रांतिकारी असे आहे. ते म्हणाले जातीव्यवस्था आणि उच्चनीचता धर्माने किंवा देवाने केल्या नाहीत. समाजातील काही पंडित (विद्वान) लोकांनी तसा खोटा प्रचार केला. या विधानात आलेल्या पंडित नावामुळे गोंधळ झाला. परंतु संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल जी आंबेकर यांनी त्याची स्पष्टता करून पंडित म्हणजे विद्वान असा अर्थ अभिप्रेत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ब्राम्हण समाजातील संभ्रम दूर झाला. परंतु काही मंडळींनी हा वाद विनाकारण वाढवला आहे. या लोकांमुळे ब्राम्हण समाजाची बदनामी होत आहे. ब्राम्हण समाज संघाविरुद्ध आहे किंवा ब्राम्हण समजाला उच्चनीचता विरुद्ध बोललेले चालत नाही असा (गैर) अर्थ यातून काढला जात आहे.  वस्तुस्थिती तर अशी आहे की जे लोक संघाला आपली जहागीर समजत होते, ज्यांना समरसता, सर्वसमावेशक हिंदुत्व मान्य नाही किंवा जे कर्मठ, रूढीवादी आहेत त्यांनाच सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे त्रास झाला आहे....

ईडीमुळे 'जनता खुश' अन 'विरोधकांची धुसफूस

इमेज
' ईडीच्या कारवाई वरून सध्या रणकंदन माजले आहे. केंद्रीय यंत्रणांवर विरोधकांकडून अनेक आरोप होतायत. त्यात काही नवल नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय यंत्रणा इतक्या बेधडकपणे कारवाई करू लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणांना सरकारने प्रोत्साहन दिले तर त्या आपल्या कर्तव्याला सिद्ध करू शकतात हे यावरून लक्षात येते.  काँग्रेस सरकारच्या काळात 2005 ते 2014 या दहा वर्षाच्या काळात केवळ 112 ईडीचे छापे पडले होते आणि त्यातून 5 हजार कोटींची संपत्ती जप्त झाली होती. परंतु मोदी सरकारच्या काळात ईडीला बूस्टर डोस मिळाला आणि केवळ आठ वर्षात 2,974 छापे ईडीकडून टाकले गेले आणि यामधून तब्बल 1 लाख कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. विरोधक याला सुडाची कारवाई म्हणतात. परंतु जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांना कोणी रोखले होते का? केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई केवळ राजकीय नेत्यांवरच झालेल्या नाहीत. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आदी लोकांचा समावेश आहे. ज्यांनी आर्थिक अफरातफर केली, ज्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आणि ज्यांची गतीविधी देशविरोधी वाटली त्...

मला भावलेलं पहिलं साहित्य संमेलन

इमेज
गेल्या आठवड्यात नागपुरात समरसता साहित्य संमेलन पार पडले. मीही गेलो होतो. या अगोदर अहमदनगरला 2017 मध्ये झालेल्या समरसता साहित्य संमेलनलाही मी हजेरी लावली होती. नगरला झालेल्या संमेलनात केवळ अनुभूती घ्यायला गेलो होतो. साहित्य संमेलन म्हणजे काय, हेच जाणून घ्यायचं होतं. त्या अगोदर इतर ठिकाणी काही साहित्य संमेलनासही गेलो होतो. पण त्यामुळे माझ्या मनात साहित्य विश्वाबद्दल एकप्रकारे नकारात्मकता निर्माण झाली होती.  साहित्य संमेलन म्हंटलं की तीच ती रडकी काव्य, अमक्या वरचा अन्याय, तमक्यावरील द्वेष, राजकारण केवळ ह्याच विषयांची जंत्री पाहिली होती. आपण कोणत्या काळात जगतो आहोत हाच विसर जणू पडावा असे निरुत्साही आणि नकारात्मक वातावरण दिसले म्हणजे साहित्य संमेलन अशी भावना होऊन गेली होती.  वशिलेबाजी करून निवडक व विशिष्ट नावं पुढं करायची. सांगायला तोंड वर करून सांगायचं की हे विचारांचं व्यासपीठ, पण विशिष्ट विचाराच्या लोकांनाच तिथे संधी द्यायची. काहींना खड्यासारखे बाजूला काढून फेकायचे अश्या गोष्टी अनुभवल्या होत्या. पण या वर्षी उदगीरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे थोडं स...