शेंदुर्णीला थडग्यांचा वेढा

#सोयगांव - #शेंदुर्णी रस्त्यावर लिहा तांडा फाट्याजवळ ही कबर/ थडगं आहे. जेव्हा मी शेंदुर्णी येथे शाळेत जायचो (साधारण 2008 पूर्वी) तेव्हा इथे काहीच नव्हते. किमान मला तर तसे आठवत नाही. 
अकरावी बारावीत जात असताना इथे पहिल्यांदा हिरवा झेंडा लावलेला पाहिलेलं मला आठवतं. दोन तीन वर्षापूर्वी इथे कबर स्पष्ट दिसू लागली, त्यावर हिरवी चादर पाहीली. 

आत्ता दोन दिवसापूर्वी पाहिले तेव्हा या थडग्याला तारेचे कंपाऊंड झालेले दिसले. मागील 12 ते 15 वर्षात या थडग्याची झालेली वाढ माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. तथाकथित दर्गे आणि कबरी अश्याच निर्माण होत असाव्यात. 
विशेष म्हणजे शेंदुर्णी येथून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आता थडगे झाले आहेत हेही एक आश्चर्य. फक्त सोयगाव रस्ता अपवाद होता, आता तोही पूर्ण झाला. शेंदुर्णीचे कबरी–स्तान करण्यासाठी कोणत्या बाबाचे आशीर्वाद आहेत हे शेंदुर्णीकर चांगले जाणतात. 

- कल्पेश जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान