मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास विसरून चालणार नाही. आम्हाला ‘या’ गंभीर प्रश्नांचा विचार करावाच लागेल!*



1. हजारो निरपराध लोकांची हत्या करविणारा धर्मांध जिहादी कासिम रझवी 1956 मध्ये तुरुंगातून सुटताच कोणाच्या मदतीने पाकिस्तानात पळून गेला?

2. ज्या निजामामुळे हैदराबाद संस्थान एक वर्ष उशिरा स्वतंत्र झाले, हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान झाले, निरपराध लोक मारल्या गेले व ज्याने स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्या निजामाला पुन्हा राजप्रमुख का करण्यात आले ?
3. इत्तेहादुल मुसलमिन (MIM) या देशविरोधी धर्मांध संघटनेवर हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी तत्काळ बंदी घातली होती. या देशविघातक संघटनेची बंदी जवाहरलाल नेहरूंनी का काढली?

4. आजची ओवेसी प्रणित AIMIM संघटना ही त्याच कासिम रझवीच्या संघटनेची वारसा चालवते आहे. त्यांचे नेते कधीच मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाला अभिवादन करत नाही, मुक्तीसंग्राम दिनी झेंडावंदन करण्यासही उपस्थित राहत नाही. का?

5. ज्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वावर मुक्ती लढा यशस्वी झाला, संस्थानात काँग्रेसचे काम वाढले, त्या राष्ट्रभक्त स्वामीजींवर मुक्तीसंग्राम नंतर काँग्रेसने खोटे नाटे आरोप करून अन्याय का केला? त्यांच्या अंत्ययात्रेला महाराष्ट्राच्या तत्कालीन एकाही मंत्र्याला, नेत्याला उपस्थित राहता आले नाही?

6. स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ कम्युनिस्टांच्या संपर्कात आले, पण मनाने आणि कृतीने कधीच कम्युनिस्ट झाले नाहीत ते सदैव स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहिले. तरीही त्यांना कॉम्रेड असल्याचा शिक्का का मारला जातो?

7. इत्तेहादुल मुसलमिन (MIM) व रझाकार संघटनेकडून 1925 ते 1935 या काळात 20 हजार दलितांचे बळजबरी धर्मांतर केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "निजाम आपला शत्रू आहे, त्याला साथ देऊ नका" असे पत्राद्वारे कळविले होते, हा इतिहास का सांगितला जात नाही.?

8. एकीकडे हैदराबाद संस्थान मुक्तीसाठी हजारो महिला पुरुष प्राणाची आहुती देत असताना या अस्थिरतेचा फायदा घेऊन कम्युनिस्टांनी शेतकरी आंदोलनाच्या आडून रक्तपात का केला? कोणाच्या सांगण्यावरून केला?

9. पंडित जवाहरलाल नेहरूंनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात स्वातंत्र्य लढा मानायला का तयार नव्हते? मुक्तीसंग्राम लढ्यास ‘स्वातंत्र्य लढा’ म्हणून मान्यता मिळण्यास 1972 साल का उजडावे लागले?

*“जे लोक इतिहास विसरतात,त्यांचा भूगोल बदलतो” असे म्हणतात. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या गावात, जिल्ह्यात, भागात काय रक्तपात झाला? काय अन्याय झाले? कोणी केले? त्यांचा हेतू काय होता? हे माहीत झाले पाहिजे. इतिहासातील काही चुकांमुळे आपले भविष्य अंधकारमय होऊ शकते. त्यामुळे आपल्या नवीन पिढीला सत्य इतिहास सांगा.*

वंदे मातरम् 🙏🇮🇳
===========

#मराठवाडा_मुक्तिसंग्राम #हैदराबाद #मराठवाडा #hyderabadliberation

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान