पोस्ट्स

कावेबाज पाकिस्तानला ओळखा

इमेज
@कल्पेश जोशी, औरंगाबाद पाकिस्तानी क्रिकेट टीमने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगले प्रदर्शन करत सेमी फायनल पर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानची टीम मोठी तयारी करून मैदानात उतरली असल्याचं बोललं जात आहे, परंतु यावेळी पाकिस्तानने केवळ मैदानावरच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सायकॉलॉजीकल वॉरफेअर प्रमाणे काम सुरू केल्याचेही निदर्शनास येत आहे. म्हणजे एक टीम मैदानावर खेळत आहे तर दुसरी टीम विशेषतः सोशल मीडियावर भारतासोबत गेम खेळत आहे.  सायकॉलॉजीकल वॉरफेअर ही एखाद्या युद्धाच्या वेळी आखली जाणारी एक रणनीती आहे. ज्याद्वारे शत्रूच्या शक्तीस्थानाचे खच्चीकरण केले जाते. त्याची प्रतिमा खराब केली जाते. त्याचा (अप)प्रचार इतका करायचा की मग सामान्य माणसातही तीच चर्चा रंगते व त्यांच्याकडूनही शत्रूचे मोरल डाउन करण्यास अप्रत्यक्षपणे मदत होऊ लागते.   यंदाच्या टी20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने हेच हत्यार उपसले आहे, व त्याचा मुख्य लक्ष्य आहे भारतीय संघ आणि विराट कोहली.  आयपीएल चे सामने झाले आणि टी20 वर्ल्ड कपची चर्चा सुरू होऊ लागताच सोशल मीडियात विराट कोहलीच्या संदर्भात बऱ्याच उलटसु...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

इमेज
     निजामाची राजवट असलेल्या आणि 1947 ला स्वतंत्र न झालेल्या मराठवाड्यात आर्य समाज, हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस व सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. लोक निजामाच्या सैन्याविरुद्ध आणि रझाकारांच्या विरुद्ध बंड करून उठले होते. हाती शस्त्र घेऊन भारताच्या अखंडत्वाचा आणि हैदराबादच्या मुक्तीचा संकल्प करण्यात आला होता. अश्या या क्रांती लढ्यात निजामी राजवट उलथवण्यासाठी धोपटेश्वर (ता. बदनापूर जि. जालना) येथील दगडाबाई शेळके यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्य प्रेरणेतून तसेच अन्य क्रांतिकारकांचे काम पाहून मुक्तिसंग्रामात उडी घेतली होती. त्याचवेळी मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सोयगांव येथील लढ्याचा इतिहासही अजरामर झाला.       दगडाबाईंनी 'बंदूक' आणि 'हातगोळे' चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. असे सांगितले जाते की त्यांनी पॅन्ट, शर्ट घालून बंदूकीसह घोड्यावर प्रवासही केला आहे. आपल्या नवऱ्याच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागल...

एक 'सत्तांतर' असेही घडले होते...

इमेज
"संत्तांतर"  संपूर्ण जग आज एका घटनेमुळे विचलित झाले आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर आपली हुकूमत प्रस्थापित केली. या घटनेचे पुढील काळात दूरगामी परिणाम पूर्ण जगावर पडणार आहेत. परंतु तालिबान्यांनी केलेले सत्तांतर पाहिल्यावर अजून एक गोष्ट लक्षात येते. असेच एक सत्तांतर 1948 मध्ये भारतातही घडले होते. 'हैद्राबाद' संस्थानचा निजाम हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करायला तयार होत नव्हता. त्यामुळे असाच एक संघर्ष झाला होता. परंतु दोन्ही संघर्षामध्ये खूप मोठा फरक आहे.  तालिबानी ही एकप्रकारे दहशतवादी संघटनाच आहे आणि ते जिहादी कट्टरतावादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत. शरियतच्या मार्गाने चालणारे व सर्व जगाला या मार्गावर आणण्यासाठी म्हणून शस्त्र हाती घेतलेल्या दहशतवाद्यांपेक्षा त्यांची वेगळी ओळख नाही. म्हणूनच तालिबानी सत्ता आल्यामुळे आज अफगाणिस्तानमध्ये 90 टक्के लोक मुस्लिम असूनही सर्वत्र भयग्रस्त वातावरण आहे.  या दरम्यान तालिबान्यांनी अफगाणी महिलांचे एक सर्वेक्षणच करण्याचा फतवा काढला आहे. जेणेकरून त्या अफगाणी महिलांचा त्यांच्या सैन्यात लिलाव करता येईल. या धाकाने म...

हिंदू-मुस्लिम विवाहात 'मॅरेज ऍक्ट'ची भूमिका

इमेज
गेल्या काही दिवसांपासून हिंदू-मुस्लिम विवाह आणि लव्ह जिहाद या विषयावरील अनेक विवाद पुढे आले आहेत. यात मॅरेज ऍक्टची भूमिकाही महत्वाची आहे. प्रेम ही निसर्गाने प्रदान केलेली सर्वात सुंदर भावना आहे असे म्हंटले जाते. जर असे असेल, तर प्रेम नैसर्गिकच व्हायला हवे. बळजबरीने प्रेम केले जात असेल तर त्याला प्रेम कसे म्हणता येईल? प्रेम करण्यामागे विशिष्ट हेतू असेल तर त्याला फसवेगिरीच म्हंटले पाहिजे. प्रेमात पडून विवाह करण्यास कोणाचाच विरोध नाही. परंतु 'प्रेम विवाह' आणि 'लव्ह जिहाद' मध्ये फरक आहे. एकीकडे लग्न म्हणजे प्रेम, विश्वास आणि सहमती आहे, तर लव्ह जिहाद म्हणजे प्रलोभन, विश्वासघात आहे. फसवून काही होत असेल तर कायदा असायलाच हवा, विरोध असायलाच हवा.  आजपर्यंत कित्येक गैरमुस्लिम तरुणींना जिहादी जाळ्यात फसवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित केला, त्यानुसार पहिल्याच महिन्यात 14 केसेस दाखल करण्यात आल्या व 49 आरोपींना अटक करण्यात आली. यावरून हा जिहादी रोग किती पसरला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्रेम करणाऱ्या जोडप्याच्या धर्म ...

बंगालमध्ये हिंसेची धग कायम... पुढे काय होणार?

इमेज
-- कल्पेश जोशी    प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उसळलेल्या राजकीय - जातीय हिंसाचाराची धग अजूनही कायम असून बंगाली हिंदू दहशतीच्या वातावरणात जगत आहे. या हिंसाचारात दीड महिन्यात आतापर्यंत 34 जणांच्या हत्या झाल्याचे सांगितले जात असून या मृतांमध्ये सर्वजण भाजपा, संघ, एबीव्हीपी कार्यकर्ता आणि सामान्य बंगाली हिंदू नागरिक आहेत ज्यांनी भाजपाला समर्थन केले होते. बंगाल मध्ये जे घडवले जात आहे, ते जाणीवपूर्वक सुनियोजित पद्धतीने होत असून एक विशिष्ट वर्ग युद्धे लक्ष्य केला जात आहे, त्यामुळे पूर्ण बंगालमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे.  मागील पंधरा दिवसात घडलेल्या काही घटना पाहता परिस्थिती किती भयानक व लोकशाहीविरोधी झाली आहे, हे आपल्या  लक्षात येईल.  ◾ एका 60 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेवर तिच्या सहा वर्षाच्या नातवासमोर बलात्कार करण्यात आला तसेच, एका अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत न्याय मागितला आहे. भाजपसाठी काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे पीडितेने सांगितले.  ◾ 5 जून रोजी भाटपाडा येथील भाजप कार्यकर्ता ज...

मदरश्यातील बॉम्बस्फोट - एक सेक्युलर विवेचन

इमेज
#तिरपिटांग बिहार च्या बांका मध्ये नुकतीच एक घटना घडली. सगळीकडे याचं वृत्त आलं आहे. घटनास्थळी मौलाना बॉम्ब तयार करत असतानाच मदरश्यात हा स्फोट झाला असेही निष्पन्न होत आहे. नेहमीप्रमाणे लगेच सगळ्यानी (विशेषतः मनुवाद्यांनी) मौलाना आणि मदरश्याकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. पण भारतीय नागरिक म्हणून आपली दृष्टी आपण कधी बदलणार आहोत? जातीय चष्मे फेकून सेक्युलरिजमच्या चष्म्यातून या घटनेकडे पाहिले पाहिजे. मदरसा म्हणजे शिक्षण संस्थाच आहे. शिक्षणसंस्था म्हणून त्यांना सगळे सरकारी लाभ मिळत असतात. मग अश्या विद्या ग्रहण करण्याच्या ठिकाणी काही प्रयोग केले जाऊ शकत नाही का?  संशोधन  आणि अभ्यास करण्यासाठी आयआयटीतच गेलं पाहिजे का? मदरश्यात काही प्रयोग करून पाहिले जात असतील तर त्यात काही गैर आहे का? मदरश्यात धार्मिक शिक्षण दिले जाते म्हणून काय झालं? धार्मिक शिक्षणाबरोबर तिथे काही वैज्ञानिक प्रयोग ही केले जातात हे या घटनेतून लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजेच काय तर मदरश्यात केवळ धार्मिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर तिथे अत्याधुनिक शिक्षण देण्याचीच गरज निर्माण झाली आहे. हेही अधोरेखित होते....

अवैध घुसखोरी- भारताला लागलेला कर्करोग

इमेज
@कल्पेश जोशी  भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी  घुसखोरी या विषयात मोठे भाकीत वर्तवलेले आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या 'बांग्लादेशी घुसखोरी - भारताच्या सुरक्षेशी सर्वात मोठा धोका' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दत्तात्रय शेकटकर यांनी आपले मत मांडले आहे. बांग्लादेशी घुसखोरी भारताला लागलेला कर्करोग असून आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या आहे, देशातील राजकीय नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना व नागरिकांना या धोक्याचे गांभीर्य कळणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आसाम मध्ये त्यांचा 'ऑल आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट' हा स्वतंत्र पक्ष तयार झाला असून त्यांचे चार खासदार व 17 आमदार निवडून आले आहेत. शेकटकर यांनी ही 2015 ची स्थिती मांडली असली तरी आजही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एआययुडीएफ चे 16 आमदार निवडून आले आहेत हे लक्षात घेण्याजोगे आहे. घुसखोरी ही आता नंबर एकची राष्ट्रीय समस्या झाली असून ती वेळीच थांबवली नाही तर 2026 मध्ये आपल्याला आसाम व बंगाल मध्ये बांग्लादेशी मुख्यमंत्र...