मदरश्यातील बॉम्बस्फोट - एक सेक्युलर विवेचन
#तिरपिटांग
बिहार च्या बांका मध्ये नुकतीच एक घटना घडली. सगळीकडे याचं वृत्त आलं आहे. घटनास्थळी मौलाना बॉम्ब तयार करत असतानाच मदरश्यात हा स्फोट झाला असेही निष्पन्न होत आहे. नेहमीप्रमाणे लगेच सगळ्यानी (विशेषतः मनुवाद्यांनी) मौलाना आणि मदरश्याकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. पण भारतीय नागरिक म्हणून आपली दृष्टी आपण कधी बदलणार आहोत? जातीय चष्मे फेकून सेक्युलरिजमच्या चष्म्यातून या घटनेकडे पाहिले पाहिजे.
मदरसा म्हणजे शिक्षण संस्थाच आहे. शिक्षणसंस्था म्हणून त्यांना सगळे सरकारी लाभ मिळत असतात. मग अश्या विद्या ग्रहण करण्याच्या ठिकाणी काही प्रयोग केले जाऊ शकत नाही का? संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी आयआयटीतच गेलं पाहिजे का? मदरश्यात काही प्रयोग करून पाहिले जात असतील तर त्यात काही गैर आहे का? मदरश्यात धार्मिक शिक्षण दिले जाते म्हणून काय झालं? धार्मिक शिक्षणाबरोबर तिथे काही वैज्ञानिक प्रयोग ही केले जातात हे या घटनेतून लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजेच काय तर मदरश्यात केवळ धार्मिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर तिथे अत्याधुनिक शिक्षण देण्याचीच गरज निर्माण झाली आहे. हेही अधोरेखित होते.
ही अशी पहिली घटना नाही. या अगोदरही अश्या काही घटना घडलेल्या असू शकतात. सगळ्याच घटना उजेडात येतील असं नाही. देशभरात अश्या कित्येक मदरश्यात असे वैज्ञानिक प्रयोग सुरू असतील. परंतु वरिष्ठ पातळीवरील धर्म मार्तंडांना हे समजले तर त्यांचा कोप होऊ शकतो ना. धर्म, धर्म ग्रंथ, जिहाद वगैरे पारंपरिक शिक्षण सोडून तुम्ही लोक हे काय नको ते उद्योग करताय म्हणून त्यांना धर्मातून बहिष्कृत केलं जाऊ शकतं. म्हणून बिचारे भीत भीत सर्व जगापासून लपवून असे वैज्ञानिक प्रयोग करत असावे. या घटनेनंतर गावातील सर्व पुरुष मंडळी पळून गेली म्हणतात ती याच कारणामुळे. अपुऱ्या ज्ञाना अभावी या बॉम्बस्फोटात निष्पाप प्रयोगशील, सृजनशील जीव मरण पावले, याला जबाबदार कोण?
आपल्या देशाला पाकिस्तान, चीन प्रमाणेच दहशतवाद आणि कट्टरतावाद पासून किती मोठा धोका आहे हे या दूरदृष्टी ठेऊन विचार करणाऱ्या मौलानांना (बांका सारख्या) माहीत आहेच. युद्ध झालं तर विविध आयुधं लागतात, बॉम्ब गोळे लागतात. अश्या वेळी शत्रूचा चक्काचूर करणारा बॉम्ब असायला हवा हा विचार करूनच ते धडपड करत असतात. त्यामुळे मीडिया व प्रशासनाने याची नोंद घेऊन या घटनेकडे सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे. सरकारने तर लवकरात लवकर सर्व मदरश्यांना केवळ धर्माधिष्टीत शिक्षण न देता आधुनिक शिक्षण पद्धती देणारे केंद्र करायला पाहिजे. सरकारने काही ठिकाणी याची सुरुवात केली आहे म्हणतात, आसाम मध्ये तर नुकताच मदरसे बंद करून आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळाच सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हे बाकी राज्यातही सुरू केले पाहिजे. तरच या मृत मौलानांच्या आत्म्यास शांती मिळेल.
बांका मदरसा बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या व सहभागी असणाऱ्या सर्व परिचित अपरिचित वैज्ञानिकांना समर्पित.
- कल्पेश जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा