कावेबाज पाकिस्तानला ओळखा

@कल्पेश जोशी, औरंगाबाद

पाकिस्तानी क्रिकेट टीमने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगले प्रदर्शन करत सेमी फायनल पर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानची टीम मोठी तयारी करून मैदानात उतरली असल्याचं बोललं जात आहे, परंतु यावेळी पाकिस्तानने केवळ मैदानावरच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सायकॉलॉजीकल वॉरफेअर प्रमाणे काम सुरू केल्याचेही निदर्शनास येत आहे. म्हणजे एक टीम मैदानावर खेळत आहे तर दुसरी टीम विशेषतः सोशल मीडियावर भारतासोबत गेम खेळत आहे. 

सायकॉलॉजीकल वॉरफेअर ही एखाद्या युद्धाच्या वेळी आखली जाणारी एक रणनीती आहे. ज्याद्वारे शत्रूच्या शक्तीस्थानाचे खच्चीकरण केले जाते. त्याची प्रतिमा खराब केली जाते. त्याचा (अप)प्रचार इतका करायचा की मग सामान्य माणसातही तीच चर्चा रंगते व त्यांच्याकडूनही शत्रूचे मोरल डाउन करण्यास अप्रत्यक्षपणे मदत होऊ लागते.   यंदाच्या टी20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने हेच हत्यार उपसले आहे, व त्याचा मुख्य लक्ष्य आहे भारतीय संघ आणि विराट कोहली. 

आयपीएल चे सामने झाले आणि टी20 वर्ल्ड कपची चर्चा सुरू होऊ लागताच सोशल मीडियात विराट कोहलीच्या संदर्भात बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.  त्याच्या फॉर्मसह कप्तान म्हणून क्रिकेट रसिकांकडून काही शंका उपस्थित केल्या जात होत्या. अगदी याच गोष्टीचा फायदा पाकिस्तानने घेतला. सुरुवातीपासून पाकिस्तानने विराट कोहलीला आपल्या निशाण्यावर ठेवला आहे. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी अकाउंटवरून विराटची ट्रोलिंग सुरू झाली होती. पनौती म्हणून हेटाळणी होत होती. त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला सुद्धा ट्रोल केले जात होते. सोशल मीडियात आपणही असे मिम्स, विनोद वगैरे बघितले असतील. भारतात क्रिकेट रसिकांच्या उलट सुलट प्रतिक्रियामधील विराट कोहलीच्या संदर्भातील मतं जुळवून घेत पाकिस्तानने त्याला जोर लावला व ट्विटर ट्रेंडिंग सुरू केले. सुरुवातीला हे लक्षात आले नाही, भारतीय क्रिकेट रसिकच आपल्या प्रतिक्रिया देत असावे असे वाटले, परंतु  आता अगदी स्पष्ट होऊ लागले आहे की पाकिस्तानचा मैदानाबाहेरही एक कावा सुरू आहे. याची तीन प्रमुख निरीक्षणं समोर येतात:

1. पाकिस्तानी क्रिकेट टीमचा सोशल मिडिया कॅम्पेनिंग व टार्गेट ऑडिअन्समध्ये भारताला कव्हर करण्यात येणे. पाकिस्तानी टीमची ताकद भारतीयांना (विशिष्ट वर्गाला) दाखवण्याचा हेतु काय होता?
(पाकिस्तानी खेळाडूंचे व्हिडीओ अचानकच फेसबुकवर आपल्याला दिसू लागले असतील, फेसबुक ते आपल्याला सजेस्ट करत होता.)

2. पाकिस्तान सोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमी ला ट्रोल करण्यात आले. इतके की त्याच्या आपल्याकडच्या निर्बुद्ध माध्यमात लगेच बातम्या झाल्या. यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं नंतर उघड झालंच आहे. (भारतात काश्मिरी आणि मुस्लिम असलेल्या खेळाडूला कसा त्रास दिला जातो, असं दाखवून भारताची बदनामी करायची होती.)

3. अफगाणिस्तान सोबत झालेल्या सामन्यात भारत जिंकल्यानंतर ही मॅच फिक्सिंग होती असा #matchfixing हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. त्यामधील टॉप अकाउंटची पडताळणी केली असता ते पाकिस्तानी असल्याचं स्पष्ट झालं. आज स्कॉटलंडविरुद्ध जिंकल्यावर हा ट्रेंड पुन्हा चालवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातही टॉपवर पाकिस्तानी मूळचे अकाउंट दिसत आहेत. या संदर्भात काही स्क्रीन शॉट्स खाली दाखवले आहेत. 




पाकिस्तानचा हा खटाटोप कश्यासाठी?

1. भारतात मुस्लिम किंवा काश्मिरी खेळाडूला त्रास दिला जातो असे जागतिक पातळीवर बिंबवायचे व भारताची बदनामी करणं.
2. भारतापेक्षा पाकिस्तानच अफगाणी लोकांचा हितचिंतक आहे, आपण एक आहोत आणि भारत आपला शत्रू आहे हे अफगाणी लोकांपर्यंत पोहचवणं.
3. या निमित्ताने भारतातील पाकिस्तानी टीमचे चाहते (पाकिस्तान प्रेमी), त्यांचे अकाउंट डिटेक्ट करणे.
4. भारतीय खेळाडूंना भारतीयच कसे ट्रोल करतात असे दाखवून भारतीय संघाचं खच्चीकरण करणं व मानसिकता बिघडवनं. 

पाकिस्तान हा कायमच रडीचा डाव खेळणारा देश आहे, तशी त्याची क्रिकेटच नाही तर इतर बाबतीतही ख्याती प्रसिध्द आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून यापेक्षा वेगळं काय अपेक्षित ठेवणार? परंतु तरीही पाकिस्तानचा मूळ उद्देदेश 'मालिका विजय' असा वाटत असला तरी ते पुर्णतः खरे नाही. भारताला ट्रोल करतानाच पाकिस्तानी अकौंट्स वरून अफगाणिस्तानी टीमवरसुद्धा आसूड ओढले आहेत. त्यांचा जळफळाट स्पष्ट दिसतो. भारत आणि अफगाणिस्तानी नागरिक यांचे मागील काही वर्षात खूप चांगले संबंध तयार झाले आहेत. भारताने मागील काही वर्षात अफगाणिस्तानसाठी खूप मदत केली आहे. 

तालिबानी आक्रमणात सुद्धा हजारो अफगाणी नागरिकांना भारताने सेवा, सुविधा व सुरक्षा दिली आहे. त्यामुळे अफगाणी नागरिक पाकिस्तानला फाट्यावर मारतात व भारताची स्तुती करतात. ही पाकिस्तानची दुखरी बाजू आहे. इतकी की पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना खोटेनाटे अपप्रचार करावे लागतात. भारत - अफगाणिस्तान सामना झाल्यावर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे "well paid India.... *played" असे खोटे ट्विट match fixing दाखवण्यासाठी पाकिस्तानी चाहत्यांनी पसरवले, हे त्याचंच उदाहरण. 

मला पडलेले काही प्रश्न - 

1. या सगळ्या प्रकरणात डोकं पाकिस्तानचं असलं तरी त्याला आम्ही भारतीयही बऱ्याच अंशी बळी पडलो आहोत. विराट कोहली कोणाला आवडो ना आवडो, पण जेव्हा प्रश्न राष्ट्राचा असतो तेव्हा आपल्या देशाचं नेतृत्व करणार्याच्या पाठिशीच आपण असावं, इतकं साधं तत्व देखील आम्हाला पाळता येत नाही? 

2. दिवसातल्या अर्ध्या बातम्या ट्विटरवरून घेणाऱ्या आणि फॅक्ट चेक करणाऱ्या माध्यमांना मोहम्मद शमी आणि विराट कोहलीला कोण ट्रोल करतंय याची शहानिशा सुद्धा करावीशी वाटू नये? 

3. भारतात राहून पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई होते हे जसे शक्य आहे, तसे ट्विटर सारख्या प्लेटफॉम्वर पाकिस्तानच्या समर्थनात व्यक्त होणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? फटाक्यांपेक्षा हे अधिक भयानक व गंभीर आहे. 

फक्त एकच सांगेन...
एक सामना मैदानावर सुरू आहे, दुसरा सोशल मीडियावर. या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचे काय हाल करायचे हे तुम्हीच ठरवा..!! 

- कल्पेश जोशी, औरंगाबाद
Kavesh37@yahoo.com 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान