बंगालमध्ये हिंसेची धग कायम... पुढे काय होणार?

-- कल्पेश जोशी प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उसळलेल्या राजकीय - जातीय हिंसाचाराची धग अजूनही कायम असून बंगाली हिंदू दहशतीच्या वातावरणात जगत आहे. या हिंसाचारात दीड महिन्यात आतापर्यंत 34 जणांच्या हत्या झाल्याचे सांगितले जात असून या मृतांमध्ये सर्वजण भाजपा, संघ, एबीव्हीपी कार्यकर्ता आणि सामान्य बंगाली हिंदू नागरिक आहेत ज्यांनी भाजपाला समर्थन केले होते. बंगाल मध्ये जे घडवले जात आहे, ते जाणीवपूर्वक सुनियोजित पद्धतीने होत असून एक विशिष्ट वर्ग युद्धे लक्ष्य केला जात आहे, त्यामुळे पूर्ण बंगालमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे. मागील पंधरा दिवसात घडलेल्या काही घटना पाहता परिस्थिती किती भयानक व लोकशाहीविरोधी झाली आहे, हे आपल्या लक्षात येईल. ◾ एका 60 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेवर तिच्या सहा वर्षाच्या नातवासमोर बलात्कार करण्यात आला तसेच, एका अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत न्याय मागितला आहे. भाजपसाठी काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे पीडितेने सांगितले. ◾ 5 जून रोजी भाटपाडा येथील भाजप कार्यकर्ता ज...