हे केवळ अभियान नाही!

सुमारे पाचशे वर्षांच्या अविरत संघर्षानंतर समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या निर्माण करण्यास आता सुरुवात झाली आहे. भारताची अस्मिता, स्वाभिमान आणि सामाजिक समरसतेचे अनुपम केंद्र म्हणून जग या मंदिराकडे पाहत आहे. सर्व समाज, राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या मंदिर निर्माण साठी प्रयत्न झाले आहेत... असे हे राष्ट्रमंदिर लवकरच भव्य दिव्य स्वरूपात उभे राहण्यासाठी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात 'निधी संकलन अभियान' सुरू होत आहे. राम मंदिर निर्माण म्हणजे आपण सर्वांसाठी एका मोठ्या ऐतिहासिक विजयाचा टप्पा आहे. संविधानिक रचनांचा उपयोग करून कोणाला पराभूत न करता आपल्याला हा विजय मिळाला आहे. या अभियानात सर्व समाजाच्या सहभागीतेचा आणि सामिलिकारणाचा भाव असेल. त्यामुळे सर्व संकुचित बेड्या तोडून सर्व मतभेदांच्या पलीकडे सर्व समाज जोडणारे हे व्यापक अभियान असणार आहे. हे अभियान केवळ एक मंदिर बांधायचं म्हणून नाही. प्रभू राम भारताची आस्था, अस्मिता आणि स्वाभिमान आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक रामभक्त आपल्याला दिसून ये...