पाच' तारखेची 'नऊ' मिनिटे कश्यासाठी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 तारखेचे केलेल्या आवाहनामागे हेतू काय आहे? हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. त्यामागे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. पण एक साधी सरळ गोष्ट आहे जी आपण समजून घेतली पाहिजे. विरोध करणारे किंवा प्रश्न उपस्थित करणारे ते लोक आहेत ज्यांच्या गावात, शहरात अजूनही कोरोनाची भीती पसरलेली नाही. परंतु, ज्या गावात, गल्लीत आणि कॉलनीत कोरोनाग्रस्त आढळले आहेत तेथील लोक प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्यामध्ये सामूहिकतेची भावना निर्माण होऊन एकटेपणाची भावना गळून पडावी यासाठी हा प्रयत्न आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण न होताही मानसिक कोरोनाची जणू लागण सुरू झाली आहे. लोक प्रत्येक गोष्ट संशयित नजरेने बघत आहेत. काहींना घरात पुरेसं अन्न नाही. डॉक्टर, नर्स, पोलीस, शासकीय कर्मचारी दररोज न चुकता आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याही मनात कोरोना विषयी दहशत आहे. घरून निघताना काळजीपोटी सूचना, सल्ले यांचा पाढा होत असतो. काहींना तर नोकरीवर पाणी सोडण्याचेही सल्ले आले असतील. परंतु एकाही व्यक्तीकडून याची सुरुवात झाली तर एक लाट निर्माण व्हायला वेळ लागत नाही. एकाचा धीर खचला की ...