आमदार फुटताय की फोडले जाताय?

तुमच्या राहत्या घरात भांडणं तुम्ही करायचे, घरात फाटाफूट झाली की मात्र दोष शेजारच्याला द्यायचा? का? तर, त्याला आनंद होतो म्हणून? काय म्हणावं याला..

काँग्रेसचं काही राज्यांसह देशात असंच काहीसं चाललंय. भांडणं आपल्या दरिद्री लक्षणांनी ओढवून घ्यायची, अन आमदार फुटू लागले की दोष भाजपला द्यायचा, कारण काय तर त्याला तेच हवंय म्हणून.? समोरच्याला लाख तुमच्यात फूट पडायची असेल, पण तुम्ही प्रेमाच्या गंगा वाहू दिल्यात तर ना. आपले हेवेदावे कमी होत नाही. ज्योतिरादित्य सिंधिया मोठा होऊन उद्या डोक्यावर मिरे वाटेल म्हणून त्याचा काटा काढायचा किंवा त्याला कायम आपल्या पेक्षा मागच्या स्थानावर मान द्यायचा हा मामु कमलनाथ चा डाव. सिंधीयला कळणार नाही असे आहे का? एकदा दोनदा सहन केलं अन ज्योतिरादित्य सिंधियाने केला स्वतःचा ओअक्ष निर्माण. 


काँग्रेस पक्ष उद्या संपला तर आपलं दुकान स्वतःच्या भरवश्यावर सुरू राहावं म्हणून हा दूरदृष्टी ठेऊन केलेला प्लॅन आहे. शिवाय पक्षांतर्गत अवमान व मामु कमलनाथ यांच्याकडून मिळणारी हीन वागणूकही यास कारणीभूत. 

सत्तेत आल्या आल्या संघाला संपविण्याची भाषा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार होणारा अवमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या कमलनाथ सरकारने जेसीबी ने उखडून टाकला, त्याबद्दल जन आक्रोश इतका वाढला की 24 तासाच्या आत काँग्रेस प्रणित मध्यप्रदेश सरकारला पुन्हा त्याच जागी शिवरायांचा पुतळा सन्मानाने स्थापन करावा लागला. या व अश्या कैक चुका काँग्रेस ने स्वतःहून ओढवून घेतल्या व स्वतःचा पप्पू करून घेतला यास जबाबदार काँग्रेस व त्यांचे नेते. 

काँग्रेस ची घराणेशाही इतकी बेफाम आहे की पक्ष बुडत असतानाही मिस्टर राहुल गांधी व सोनिया गांधींचा मग्रूरपणा उतरत नाही. दिल्ली जळत असताना प्रक्षोभक भाषणं देऊन देश पेटावा यासाठी गांधी परिवार लोकांना रस्त्यावर उतरून हक्क मिळवायची भाषा करतो. ह्या गोष्टींमुळे काँग्रेसच्या आतच दोनपेक्षा जास्त गट निर्माण झाले. त्यांची धुसफूस सारखी सुरू असते. पण काँग्रेसची बोंब एकच, जे काही होतयं ते भाजपमुळे, मोदी शाहमुळे. किती हसा करून घेणार काँग्रेसवाले स्वतःचा. राहुल गांधींना कुत्र्याशी खेळायला वेळ असतो व आपल्याच एका मुख्यमंत्र्याशी बोलायला वेळ नसतो. हाच वारंवार मिळणार अवमान सहन न झाल्यामुळे अरुणाचल प्रदेशात अख्खीची अख्खी काँग्रेस पार्टी भाजप मध्ये गेली आहे. भाजपला घरफोडे ठरविण्या अगोदर घरभेदी कोण आहेत,  याचा काँग्रेसी अभ्यासकांनी विचार केला पाहिजे.

कर्नाटकातली कुबडी सरकार तर गेली. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्येही त्याच कुबड्या. मध्यप्रदेश मध्ये भाजपला केवळ  8 आमदारांची गरज आहे. काँग्रेसचे कमलनाथ बसप आणि अपक्षांच्या कुबड्या घेऊन सत्तेत उभे आहे. तरीही भाषा कुस्त्या खेळायची करायची, हे काही व्यवहार्य नाही. स्वतःच्या चुकांमुळे, आमदार नाराज झाल्यामुळे व पक्षांतर्गत हेवेदावे वाढल्यामुळे काँग्रेसचे आमदार कमलनाथ कडून अनाथकमल कडे जातील, तर आश्चर्य नको. काँग्रेस असाच उद्योग चालू ठेवेल तर भांडण करायला ही कोणी शिल्लक राहणार नाही. उगाच, काहीही झालं की मोदीशाह यांना दोष देऊन तुमच्या घरातल्या कटकटी बाहेर समजणार नाहीत हे समजणं ही मूर्खपणा आहे. काँग्रेसला आज ना उद्या तो भोवणार. 

©️ कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान