दिल्लीकर पुरोगामी फेलच झाले!
#तिरपिटांग
संत्याभाऊ खूप दिवसांनी दिसला. मोठ्या मुश्किलने नोकरी लागली त्याला. पण, दुर्देव म्हणून व्यसनाच्या अधीन गेला बिचारा. तसं मग मी ही त्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट कमी करून टाकला. प्यायला लागला तसा जास्तच फेकला गेला हो. दगड झाला अक्षरशः. काहीही बरळत असतो. पण आज मात्र कोरा दिसत होता. पण हे काय, पठ्ठ्या चक्क दंगडांशी बोलत बसला होता.
वैचारिक डोस देणाऱ्या व दोन पैसे देऊन दारूच्या नादी लावणाऱ्या दोन पायाच्या अनेक विज्ञाननिष्ठ मित्रांनी त्याला दारूचं महत्व पटवून दिलेलं होतं. दारुसोबत मनुवाद, युरेशियन, मूलनिवासी वगैरे वगैरे उच्च कोटीच्या विषयवार त्यांची तासन्तास चर्चा चाले. आज त्यांनी त्याची साथ सोडली होती. बहुधा काही कामाचा राहिला नसावा. पण संत्या भाऊ मात्र आपल्या सवयीशी ठाम होता. बिचारा काल पर्यंत दोन पायाच्या दंगडांशी बोलत होता, आज बिन पायाच्या दंगडांशी. छान गप्पा रंगल्या होत्या हो. मी पण काही डिस्टरब नाही केलं बॉ त्याला. त्यांचं संभाषण ऐकू लागलो..
संत्या बोलत होता. "काल पर्वा दिल्लीत दंगल घडली. दंगल कायची, घडवून आणलेला हिंसाचार अन सरकार विरोधी युद्धच होते ते. अन सरकारले विरोध तरी होता कुठे? हा विरोध सरळ सरळ पी एम मोदींपासून सगळ्या हिंदूपर्यंत येऊन पोहोचतो. कुठे तरी धार्मिक दहशत पसरवण्याचा हा फाजील प्रयत्न होता. शुss.. शुss.. स्वतःला सावरत संत्याभाऊ खरं बोलल्या गेल्याच्या अविर्भावात तोंडावर बोट ठेऊन समोरील दगड गोट्यांना शांत करीत होता." पोलिसाला खबरीने गुपित सांगावं तस सांगत होता भाऊ.
तो पुन्हा पुढे हळू आवाजात बोलू लागला.
"पण या दंगलीत एक गंमत घडली. देशाच्या राजधानीत दंगल घडली, पण भिडे गुरुजी आणि एकबोटेंना काही दगड फेकताना कुणाला दिसले नाहीत हो. डोळ्याला दुर्बिणी लावून लावून शोधले. पण सर्वदूर आपले शांतिदुतच दिसत होते. कोणी 'जय श्री राम' किंवा 'जय भवानी' अशी घोषणा तरी द्यायची ? पण नाहीच कोणी. निदान भगवे झेंडे तरी दिसले पाहिजे नं. अरे, सांगता आलं असतं ना की भगवे झेंडे घेऊन लोकांनी दंगल घडवली. पण अं हं.. काहीच नाही." बराच वेळ झाला पण संत्या काही पुढं बोलला नाही. विचारमग्न झाला होता तो. त्याचं बोलणं ऐकून मीही विचारात पडलो होतो. कीव येत होती त्याची. पण त्याचं पुढचं संभाषण माझ्या डोक्यात सुरू झालं.
हीच दंगल महाराष्ट्रात झाली असती तर केव्हाच त्याचे आरोपी पोलिसांच्या अगोदर येथील अंतरज्ञानी पुरोगामी विचारवंतांनी शोधून काढले असते नाही?. महाराष्ट्रातील पुरोगामी मंडळाची खासीयतच ती. ती जाईल कशी? दिल्लीतील दंगल आरएसएस ने घडवली यावर प्रकाश टाकून हे सांगून टाकले हे एक प्रकारे बरं झालं. दुसऱ्या राज्यातल्या कोणी दीड शहाण्याने हा खुलासा सांगता तर उगीच आमच्या महाराष्ट्रीयन पुरोगामी विज्ञाननिष्ठ नेत्यांचा अवमान झाला असता. आमच्या इतके शहाणे आहे का कुणी? जाऊद्या असो..
काहीतरी पुडी सोडून द्यायची. मीडियात एकच राळ उठवून द्यायची. नंतर चौकशी होईल तेव्हा होईल, इतकं लोकांच्याही लक्षात राहत नाही आणि खरं खुरं समोर येतं तेव्हा मीडियाची त्याला जास्तीत जास्त एका कोपऱ्यात किंवा बॉटम पट्टीत लावून मोकळी होते. दिल्ली वाल्या पुरोगाम्यांनी महाराष्ट्रीयन पुरोगाम्यांकडून शिकलं पाहिजे. ते फेल झाले म्हणून काय झालं, सावरायला महाराष्ट्र काफी है बॉस.
#उपहासात्मक_लेख
©️कल्पेश जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा