पाच' तारखेची 'नऊ' मिनिटे कश्यासाठी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 तारखेचे केलेल्या आवाहनामागे हेतू काय आहे? हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. त्यामागे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. पण एक साधी सरळ गोष्ट आहे जी आपण समजून घेतली पाहिजे. विरोध करणारे किंवा प्रश्न उपस्थित करणारे ते लोक आहेत ज्यांच्या गावात, शहरात अजूनही कोरोनाची भीती पसरलेली नाही. परंतु, ज्या गावात, गल्लीत आणि कॉलनीत कोरोनाग्रस्त आढळले आहेत तेथील लोक प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्यामध्ये सामूहिकतेची भावना निर्माण होऊन एकटेपणाची भावना गळून पडावी यासाठी हा प्रयत्न आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण न होताही मानसिक कोरोनाची जणू लागण सुरू झाली आहे. लोक प्रत्येक गोष्ट संशयित नजरेने बघत आहेत. काहींना घरात पुरेसं अन्न नाही. डॉक्टर, नर्स, पोलीस, शासकीय कर्मचारी दररोज न चुकता आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याही मनात कोरोना विषयी दहशत आहे. घरून निघताना काळजीपोटी सूचना, सल्ले यांचा पाढा होत असतो. काहींना तर नोकरीवर पाणी सोडण्याचेही सल्ले आले असतील. परंतु एकाही व्यक्तीकडून याची सुरुवात झाली तर एक लाट निर्माण व्हायला वेळ लागत नाही. एकाचा धीर खचला की सारेजण त्याला बळी पडू लागतात. भारतात असे होण्यास अधिक वाव आहे. कारण तबलीगी जमातसारख्या अक्कलशुन्य लोकांच्या वर्तणुकीमुळे असे घडू शकते.
जे डॉक्टर नर्स अविरतपणे सेवा बजावत आहेत, त्यांच्या अंगावर थुंकण्याचे प्रकार या जमातीच्या लोकांकडून घडत आहे. नर्स व डॉक्टर समोर अश्लील चाळे केले जात आहेत. तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांवर शेकडोचा जमाव दगडफेक करून जीव घेण्याचा प्रयत्न करतो. अश्या परिस्थितीत जीवावर उदार होऊन कोण देणार सेवा? भारतात डॉक्टर आणि नर्समुळे आतापर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले गेले आहे. त्यामुळे त्यांनाच टार्गेट करून त्यांचे धैर्य तुटण्यासाठी जमात कडून प्रयत्न होत आहे. विविध व्हिडीओ व बतम्यावरून जास्तीतजास्त लोक मरावे यासाठी ही जमात काम करत असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
या जमात ला पाठिंबा देणारेही पुढे आले आहे. अत्यंत दुःखाने सांगावे लागते, त्यामध्ये केवळ मुस्लिमच आहेत. जमात प्रकरण समोर येण्याअगोदर अनेक मौलवी, इमाम व अन्य मुस्लिम धर्मीय व्यक्तींचे व्हिडीओ सोशल मीडियात वायरल होत आहे. कोरोनाचा मुसलमानास धोका नाही. केवळ काफरांनाच धोका आहे असे हास्यास्पद विधाने ही मंडळी करीत आहे. तबलीगी जमातचे वागणे व यां लोकांचे वागणे अगदी सारखेच आहे. मोदी सरकारने या बिनडोक जमातीचा विषय मार्गी लावला आहे. त्यामुळे 9 तारखेचे 9 मिनिटे अश्या विकृतींच्या विरोधात असणार आहेत, हे नक्की.
कोरोनाचे संकट एखाद्या युद्धापेक्षाही भीषण आहे. त्यामुळे सरकारला बऱ्याचदा कठोर पावलं उचलावी लागू शकतात. या घडीला राजकिय नुकसानापेक्षा राष्ट्रीय नुकसानाची चिंता व्हायला हवी, ती आपल्या सुदैवाने पंतप्रधान मोदीजी करत आहेत. सत्ता व पद टिकवण्यासाठी आणीबाणी लावणारे नेते आपल्या देशात होऊन गेले आहेत. मोदींच्या संस्कारात 'राष्ट्र प्रथम' हा विचार असल्याने भलेही उद्या त्यांच्या सत्तेला किंवा पदाला धोका निर्माण होऊ देत, परंतु राष्ट्राला हानी पोहचणार नाही याची ते पूर्ण दक्षता घेतील हा जनतेच्या मनातील विश्वास आहे. या विश्वासाला साथ देण्यासाठी 5 तारखेला 9 मिनिटं त्यांनी मागितली आहेत. आपण याला सरकारी चाचणीही म्हणू शकतो. जनता कर्फ्युला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता लोकमनात काय फरक पडलेला आहे, हेसुद्धा सरकारच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे पुढील रणनीती ठरवण्याचा हा एक भाग आहे.
कालपर्यंत सीएए व एनआरसी वरून सरकारला लक्ष्य करणारे व आझादीच्या घोषणांनी पोटशूळ करणारे कोरोना व्हायरस येताच गुडूप झाले. सामाजिक संस्था, सरकार, प्रशासन सेवा देत असताना आझादीके मतवाले कुठे होते? मोदी, भाजप आणि संघाला पैश्याची विचारणा करणाऱ्यांनी अजूनही एक दमडीची मदत केलेली नाही. देशातील दिग्गज कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक व उद्योजक एवढेच काय तर हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांचे दान दिले आहेत. देश संकटात असतानाही कोरोना सारखा ज्वलंत मुद्दा समोर असताना त्याच्या आडून राजकारण करण्याची संधी सोडतील ते विरोधक कसले? अपेक्षेप्रमाणे विरोधक बिळातून बाहेर आलेच. त्यामुळे हे आवाहन देश संकटात असताना राजकारण करू पाहणाऱ्यांना वचक बसविण्यासाठीही आहे. जनता कर्फ्युपेक्षा प्रचंड प्रतिसाद यावेळी मिळाल्यास लोकनाराजी ओढवून घेण्यास कोणी पक्ष व नेता हिम्मत करणार नाही. त्यामुळे हे आवाहन संकटकाळी राष्ट्रहित बाजूला सारून राजकारण करू पाहणाऱ्या तमाम पक्ष व पुढाऱ्यांसाठी जनतेचा इशारा असेल.
चला तर मग, 5 तारखेला, 9 वाजता 9 मिनिटं...
एकजूट होऊन अदृश्य कोरोना व दृश्य मानवी कोरोना दोघांना धडा शिकवू...
🌐 lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा