पडद्यामागील मेंदू "काही नाही. जास्त चिंता करत बसू नका. हे काय नेहमीचेच झाले आहे. आततायी अहिंसा व सहिष्णुतेच्या बेडीत अडकलेल्या लाचार भारताच्या नशिबी हेच घडत राहणार आहे." चहाच्या टपरीवर सकाळी सकाळी एक आजोबा पेपर वाचत हताशपणे बोलत होते. त्यांचे बोलणे ऐकुन काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. कारण त्यांनी ना सरकारला दोष दिला ना विरोधी पक्षाला. त्यांनी भारतीय सेनेला व गुप्तचर विभागालाही दोष दिला नाही. त्यांनी देशाच्या मानसिक वर्मावर बोट ठेवले. म्हणुन हे कटू सत्य आजुबाजुच्या सगळ्याच ऐकणा-यांनी चहाच्या घोटाबरोबर पचवुन घेतलं. पण, ही विचार करण्यासारखी बाब आहे, की आम्ही खरच किती अतिअहिंसावादी व अतिसहिष्णू झालो आहोत. पायाखाली किडे मुंगी चिरडून मेली तरी पाप समजणारे आणि थेंबभर रक्त पाहून चक्कर येणारे आम्ही अहिंसाप्रीय भारतीय सरेआम गळे चिरणा-या व बंदूकीच्या जोरावर माणसांच्या चिंध्या चिंध्या करणा-या आतंकवादी व नक्षलवाद्यांशी दोन हात करु शकणार आहोत क...