घटना एक, परिणाम अनेक

          घटना एक, परिणाम अनेक

   देश हळहळतोय खरा. राग व्यक्त होतोय खरा. पण राग व्यक्त होतोय कुणाविरुद्ध?
हाती बंदूक व दारुगोळा घेऊन येणा-या आतंकवाद्यांविरुद्ध?

     मग जरा थांबा. शत्रु केवळ हाती शस्त्र घेऊन आणि सिमा ओलांडून येणाराच असतो का?
कदाचित असेलही. पण मग देशाला हादरवुन सोडणारा हल्ला आपल्या जवानांवर झाला. सारा देश शोकसागरात बुडालाय. हलोक श्रद्धांजली अर्पित करताय. पाकिस्तानचा निषेध व्यक्त करताय. अन् अश्या परिस्थितीत काही चक्क 'पाकिस्तान जिंदाबाद' बोलतात?? ज्यांनी हल्ला करविला त्या जैश ए महंमद आतंकवादी संघटनेचं कौतुक करतात?? '५६ इंच छातीच्या तुलनेत ४४ भारी पडलेत' असे विधान एनडीटीव्हीची पत्रकार निधी सेठी ही बया करते. काँग्रेसचे नवज्योतसिंग सिध्दू आतंकवाद्यांचा देश नसतो म्हणत पाकिस्तानचा बचाव करतात. फारुक अब्दुल्ला या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचे विधान करतात. पुण्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत असताना कुमार उपेंद्र सिंह नामक तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला जातो. वसिम हिलाल नामक तरुण जैश ए महंमदचे आभार व्यक्त करतो. या सगळ्यांचा कळस तेव्हा गाठला जातो जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड 'पुलवामा हल्ला मुस्लिमविरोधी राजकारणाचा परिपाक' असल्याचं विधान करतात व आपल्या गलिच्छ राजकारणाचीवेक प्रकारे कबुली देऊन टाकतात. यावरुन आतंकवादी व त्यांचे पोशिंदे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं लक्षात येईल. म्हणुनच आतंकवाद्यांइतकेच देशाचा व देशहिताविरोधात अविचार प्रकट करणा-यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे होऊन गेले आहे.

पुलवाम घटनेनंतर दहशतवाद्यांच्या समर्थानात पोस्ट करणारा काश्मिरी तरुण


     पुलवामा हल्ल्यात दु:खी भारतीयांच्या संवेदनांवर हा घाला नाही का? देशातील अशांतता व दहशतवादास पाकिस्तान जितका जबाबदार तितकेच हे लोकही जबाबदार आहे की नाही? पाकिस्तानला संपवण्याची भाषा करताना या लोकांचं काय करावं? देशविरोधी मानसिकता ज्यांच्या नसानसात भिनली आहे व मानवाधिकार आणि मानवतेच्या नावाखाली अश्या लोकांना प्रत्येकवेळी विशिष्ट समाज व पाकिस्तानचा बचाव करावा लागतो. तो जाणिवपुर्वक होत असतो. मग देशाचे खरे शत्रु कोण असा सवाल उपस्थित होतो.

     काही दिवसांपुर्वी 'आतंकवादाला धर्म नसतो' असं कुणी म्हंटलं की हसू यायचं. आजही ते वाक्य तितकेच हास्यास्पद वाटते. पण हेच वाक्य 'आतंकवाद्यांचा समर्थन करणार्यांना धर्म नसतो' अस म्हंटलं तर अधिक योग्य ठरू शकेल. कारण, पुलवामा घटनेवर आनंद व्यक्त करणारे एखाद्या विशिष्ट धर्माचे नाहीत. परंतु, त्यापैकी धर्माने मुस्लिम असलेले 'कट्टर धार्मिक' आहेत तर, धर्माने हिंदू असलेले 'अधार्मिक व नास्तिक' मनोवृत्तीचे दिसून येतील. तसेच हिंदू धर्म जिहाद शिकवीत नाही. त्यामुळे या लोकांच्या वृत्तीला धर्माची जोड देणे योग्य ठरणार नाही.

    दोन वर्षापुर्वी जेएनयूमध्ये कन्हैया कुमारच्या डाव्या गँगने काय वेगळे केले होते? त्यांचा धर्म काय होता? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्या अफजल गुरुला फाशी दिली, त्याची पुण्यतिथी साजरी केली होती त्यांनी. तरीही हा देशद्रोह ठरत नाही व सगळे अजुनही मोकाट फिरतात. शस्त्राच्या बळावर दहशत निर्माण करणारे आतंकवादी जितके दोषी, तितकेच त्यांचं समर्थन करणारे व त्यांना पैसा पुरविणारेही व त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणारे तेवढेच दोषी म्हंटले पाहिजे असा सूर सोशल मीडियातून निघत आहे. त्यात वावगे वाटत नाही.
   पुलावमच्या घटनेनंतर एक बाजू अजून प्रकाशात आली. या हल्ल्यानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. यामध्ये मिडियात सर्वाधिक आकर्षण ठरले ते मुस्लीम समुदायाने केलेल्या निषेधाचे. अनेक ठिकाणी इदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने मुस्लीम समाजाने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. न्युजपेपरमध्ये व न्युज चॅनल्सवर बरेच व्हिडीओ समोर आले. याकडे सकारात्मक बदल म्हणुन पाहुया. देशावर संकट आले की सर्व जाती पंथाचे लोक भेदभाव सोडून एकत्र होतात हा संदेश यातून समोर आला. राजकिय पक्षांनीही राजकारण बाजूला सारत (काही अपवाद वगळता) मोदी सरकारला सहकार्य दर्शविले हे चांगले झाले.

    एका भिकार्याने चक्क आपल्या भिकेतून मिळवलेले लाखो रुपये सैनिकांच्या कुटुंबियांना समर्पित केले. उत्तर प्रदेशातील किरण जगवाल या शिक्षिकेने आपल्या बांगडया मोड देऊन आलेले एक लाख रुपये सैनिकांना समर्पित केले. देशभरात गावागावात अनेक जणांनी सैनिकांना आपल्या परीनं काही तरी मदत केल्याचं ऐकायला मिळत आहे.

     तसेच मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिर संस्थानतर्फे ५१ लाख रुपयाची मदत केली गेली. मंदिरांच्या देणग्यांवर वारंवार टिका झोडणा-यांना ही चांगली चपराक होती. 'फोडा व राज्य करा' अशी मानसिकता असलेल्या तमाम राजकीय नेत्यांचा व विदेशी शक्तींचा हा पराजय म्हंटला पाहिजे.

      घटनेच्या तिसऱ्या दिवशी नालासोपारा रेल्वे स्टेशनवरील सामान्य भारतीयांचा हजारोंच्या संख्येने जमलेला उत्स्फुर्त जमाव व त्यांच्या घोषणा पाहणा-याच्या अंगावर क्षणिक शहारा आणुन गेला. या घटनेच्या निमित्त्य आपापले राजकिय स्वार्थ साधू इच्छिणा-या राजकिय मंडळीवर जनतेचा अप्रत्यक्ष दबाव दिसुन आला. म्हणुनच कुणीही या घटनेचे राजकारण करण्याची हिंमत केलेली नाही. हा 'लोकशाहीचा विजय' म्हंटला पाहिजे. त्यामुळे पुलवामा घटना घडली, पण त्यातून अनेक परिणाम समोर आले. जे देशाचं प्रतिबिंब ठरू शकेल.

©️कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान