पडद्यामागील मेंदू
पडद्यामागील मेंदू
"काही नाही. जास्त चिंता करत बसू नका. हे काय नेहमीचेच झाले आहे. आततायी अहिंसा व सहिष्णुतेच्या बेडीत अडकलेल्या लाचार भारताच्या नशिबी हेच घडत राहणार आहे." चहाच्या टपरीवर सकाळी सकाळी एक आजोबा पेपर वाचत हताशपणे बोलत होते. त्यांचे बोलणे ऐकुन काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. कारण त्यांनी ना सरकारला दोष दिला ना विरोधी पक्षाला. त्यांनी भारतीय सेनेला व गुप्तचर विभागालाही दोष दिला नाही. त्यांनी देशाच्या मानसिक वर्मावर बोट ठेवले. म्हणुन हे कटू सत्य आजुबाजुच्या सगळ्याच ऐकणा-यांनी चहाच्या घोटाबरोबर पचवुन घेतलं.
पण, ही विचार करण्यासारखी बाब आहे, की आम्ही खरच किती अतिअहिंसावादी व अतिसहिष्णू झालो आहोत. पायाखाली किडे मुंगी चिरडून मेली तरी पाप समजणारे आणि थेंबभर रक्त पाहून चक्कर येणारे आम्ही अहिंसाप्रीय भारतीय सरेआम गळे चिरणा-या व बंदूकीच्या जोरावर माणसांच्या चिंध्या चिंध्या करणा-या आतंकवादी व नक्षलवाद्यांशी दोन हात करु शकणार आहोत का? आतंकवादी हल्ला झाला की कँडल मार्च काढून धन्यता मानणारे व आम्ही किती सदगुणी आहोत हे जगाला दाखवणारे हतबल व लाचार आम्हीच. असल्या सदगुणी पाढ्यांनी कदाचित न्युज पेपरचे पानं भरतिल. टिव्हीवरही झळकतिल. पण कुठपर्यंत?
त्यांनी यायचे. हल्ले करायचे. निरपराध्यांचे बळी घ्यायचे. वर असुरी आनंद व्यक्त करायचा. आणि आम्ही सामान्यांनी केवळ सोशल मिडियात निषेध व्यक्त करायचा. पुढा-यांनी राजकारण करायचे. मिडियाने शहिदांच्या नावे सहानुभुती मिळवायची. रडणारे, आक्रोश करणारे व उजाडलेल्यांचे घरदार दाखवायचे. यातुन साध्य काय होणार? लोक ती न्युज पाहतीलही. पण स्वत:च्या घरातला मुलगा किंवा मुलगी देशासाठी देतील? घरात बसून सांत्वन करणारे आणि काॅफीचा कप ओठाला लावत व कट्ट्यावर बसून सिगारेटचे झुरकांडे सोडत सरकारला उपदेश करणे व कँडल मार्च काढून खूप मोठा पराक्रम केल्यासारखे भासवुन घेणे सोपे असते. पण झालेल्या घटनेच्या प्रतिशोधासाठी पुन्हा त्या वीर मरण पत्करलेल्या हुतात्म्याच्याच वंशाने आर्मी जाॅईन करायची शपथ घ्यायची असते. हो ना? कारण त्याचा कोणीतरी शहिद झालेला असतो. ही आपलेपणाची भावना फक्त त्याच्या परिवारापुरती मर्यादीत राहून जाते. देशाला परिवार मानणारी मानसिकता आपल्याकडे नाही. म्हणुन आपण इस्त्राईलप्रमाणे एका जवानाच्या हौतात्म्याचा बदला दहा शत्रु यमसदनी पाठवुन घेऊ शकत नाही. सर्जिकल स्ट्राईकसारखे अपवादात्मक चोख प्रत्युत्तर त्यास दिले जाते. पण केवळ एका पराक्रमावर समाधानी होऊन वर्षानुवर्ष त्याचेच उदात्तीकरण करत बसणारी आपली मानसिक वीरबुद्धी. सदगुणांच्या (?) जोरावर संयुक्त राष्ट्राकडून कौतुक करुन घेण्यात आम्हाला फार रस असतो. पुर्वीपासून आहे. अगदी देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या १९४८ च्या पहिल्या युद्धापासून आहे. नाही तर पीओके नावाचे प्रकरणच आज शिल्लकच राहिले नसते.
पुलवामा येथिल १४ फेब्रुवारीच्या दिवशी आतंकवाद्यांच्या हल्ल्यात ४४ जवान हुतात्मे झाले.
देशातून राग व्यक्त होतोय. अर्थात जनतेला आतंकवाद्यांना ठार करुन बदला घेणे अपेक्षित आहे. हा राग देशाविरुद्ध हत्यार उपसणारा प्रत्यक्ष शत्रु दिसुन येतो म्हणुन स्वाभाविक आहे. परंतु, आतंकवाद्यांच्या मागे असणारे त्यांचे मास्टर माईंड व त्यांचे फंडींग करणारे चेहरे कधी सहजासहजी उघड होत नाही. ते उघड झाले तरी त्यावर अशी प्रतिक्रिया उमटत नाही आणि ख-या सुत्रधारांकडे दुर्लक्ष होते. त्यात दहशतवादाची व्याख्या स्पष्ट नाही. त्यामुळे मोदी सरकारने सत्तेत आल्यापासुन युनायटेड नेशन्सवर दहशतवादाची व्याख्या करण्यासाठी व दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर कठोर पाऊलं उचलण्यासाठी कायमच आग्रह धरला आहे. काल ही मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.
देशातून राग व्यक्त होतोय. अर्थात जनतेला आतंकवाद्यांना ठार करुन बदला घेणे अपेक्षित आहे. हा राग देशाविरुद्ध हत्यार उपसणारा प्रत्यक्ष शत्रु दिसुन येतो म्हणुन स्वाभाविक आहे. परंतु, आतंकवाद्यांच्या मागे असणारे त्यांचे मास्टर माईंड व त्यांचे फंडींग करणारे चेहरे कधी सहजासहजी उघड होत नाही. ते उघड झाले तरी त्यावर अशी प्रतिक्रिया उमटत नाही आणि ख-या सुत्रधारांकडे दुर्लक्ष होते. त्यात दहशतवादाची व्याख्या स्पष्ट नाही. त्यामुळे मोदी सरकारने सत्तेत आल्यापासुन युनायटेड नेशन्सवर दहशतवादाची व्याख्या करण्यासाठी व दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर कठोर पाऊलं उचलण्यासाठी कायमच आग्रह धरला आहे. काल ही मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.
नक्षलवाद्यांचं समर्थन करणारी शहरी नक्षलवाद नावाची छुपी यंत्रणा उघड झाली तशी आतंकवाद्यांचं समर्थन करणारी छुपी यंत्रणा देशभरातील मोठमोठ्या शहरांमध्ये व विद्यापीठांमध्ये सक्रिय असल्याचे लक्षात येईल. दन दिवसापुर्वी अलीगड मुस्लीम युनिवर्सिटीत काही युवकांनी देशविरोधी घोषणा दिल्या. नुसत्याच देशविरोधी नाही, तर पाकिस्तानचं समर्थन करणा-या घोषणा दिल्या. तसेच औरंगाबाद व मुंब्रा येथुन एटीएसने १२ युवकांना अटक केली, जे जम्मू कश्मिर मधिल आतंकवाद्यांच्या संपर्कात होते व त्यांना पैसा पुरवत होते. मग प्रश्न पडतो, या तरुणांजवळ पैसा कुठून येत होता? कोण त्यांना पैसा पुरवत होतं? या प्रश्नाचे उत्तर समोर येणे आवश्यक आहे. कारण देश फक्त पडद्यासमोरील आतंकवाद्यांवा पाहतो, पण पडद्यामागील मेंदू जगाला दिसत नाही. जे देशात सामान्यपणे शांतीदूत म्हणुन वावरत असतात. त्याच प्रकारे नक्षलवाद्यांकडे कुठुन शस्त्रे येतात? कुठुन दारुगोळा येतो? कुठुन पैसा येतो? या प्रश्नांची उत्तरे देशद्रोही कोण आहे ते ठरवणारी आहेत.
हाती शस्त्र घेणाराच केवळ देशाचा शत्रु आहे असे नाही, तर त्यांना पैसा पुरविणारा, त्यांचे समर्थन करणारा, अभिव्यक्ती स्वांतंत्र्याच्या नावाखाली नक्षलवादी व मानवाधिकाराच्या नावाखाली आतंकवाद्यांना सहकार्य करणा-या संघटना व राजकिय पक्ष, मृत आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ विद्यापीठांमध्ये कार्यक्रम घेणा-या व देशविरोधी घोषणा देणारी मंडळी, नक्षलसमर्थनार्थ लेख लिहणारे व तरुणांना वैचारिक नक्षलवादी बनविणा-या विद्रोही शक्ती, आतंकवाद्यांना आश्रय देऊन भारतीय जवानांवर दगडफेक करणारी मंडळीही देशद्रोहाच्या चौकटीत बसवली पाहिजे आणि या सर्वांप्रति अगदी तितकाच विरोध उमटला पाहिजे जितका हल्लेखोर आतंकवाद्यांविरोधात होत असतो. कारण, शस्त्र घेऊन चालून येणारी आतंकवादी केवळ रिमोट कंट्रोलवर चालणारी बाहुले आहेत. म्हणुन पडद्यामागील रिमोट कंट्रोल चालवणारे मेंदू ठेचण्याची ही वेळ आली आहे. त्यास गांभीर्याने घेतले पाहिजे. आततायी अहिंसा व सहिष्णुतेला आता तिलांजली देऊन ही सगळी देशविरोधी कृत्ये करणारी बांडगुळं उखाडून फेकणे अगत्याचे झाले आहे. आतंकवाद्यांना व नक्षलवाद्यांना सैनिकांकरवी तर मारले जातेच. पण त्यातून आतंकवाद किंवा नक्षलवाद संपु शकेल असे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे ही केवळ आयुधं नष्ट करुन चालणार नाही, तर आयुधं निर्माण करणारी वैचारिक व आर्थिक गोदामे नष्ट केली गेली पाहिजे. त्याचेच दूरगामी परिणाम होतील.
-कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com
lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा