पोस्ट्स

अखंड भारत: एक दिव्य स्वप्न

इमेज
अखंड भारत: एक दिव्य स्वप्न एका बालकाने आपल्या पित्यास विचारले, "बाबा, आपल्या भारत देशाचे पुर्वीचे नांव भारतवर्ष होते ना?" पित्याने नकारात्मक उत्तर दिले. आपला आजचा भारत देश ...

संविधान धोक्यात कसे?

इमेज
                                  लबाड लांडगं ढोंग करतंय!                                                                                                                © कल्पेश गजानन जोशी           येत्या २० जुनपासुन महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'संविधान वाचवा, देश वाचवा' हे अभियान राज्यभरात राबवले जाणार आहे. तसा हा प्रयोग काही नवा नाही. कारण २०१४ ला मोदी सरकार सत्तेत बसल्यापासुन 'संविधान' व 'लोकशाही' सारखी धोक्यात येत आहे. परंतु, आश्चर्य असे की हा धोका कोणत्या प्रकारच्या चष्म्यातून पहावा म्हणजे दिसेल, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. जगभरात भारताची प्रतिमा उंचावत आहे, संरक्षण क्षेत्रात देश नवभरा...

फुले मार्केटवरील संकट

                                ' फुले मार्केटवर समस्यांची टांगती तलवार कायम'       कापड मार्केट म्हणुन ओळख असलेल्या जळगांवच्या फुले मार्केटमधील समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्या आहेत. मार्केटमध्ये दिवसभरात हजारो ग्राहकांची रेलचेल असते. अश्या परिस्थितीत नागरीकांना दररोज वाहतुक कोंडी, कच-याच्या अव्यवस्थापनामुळे होणारी अस्वच्छता व पार्किंगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच रिक्षा चालकांची अरेरावी नागरिकांना सोसावी लागते. रिक्षाचालक मेनगेटसमोरच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे पादचारी व दुचाकी वाहन धारकांना वाहतुककोंडीचा त्रास होतो. हातगाडीवाले रस्त्याच्या कडेलाच आपल्या हातगाड्या उभ्या करतात. त्यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना रस्त्याने चालताना अडचणी येतात. मनपाने अनेकदा अश्या अतिक्रमण करणा-या व अनधिकृत हातगाडीवाल्यांविरोधात व अतिक्रमण हटविण्यासाठी मोहिमा राबवल्या. परंतु पुन्हा पुर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होते. अतिक्रमणाची समस्या इतकी गंभीर झाली आहे की काही गाळेधारकांन...

"दुष्काळ! की शिक्षा?"

इमेज
              "दुष्काळ! की शिक्षा?"     हे काळेकुट्ट ढग भरा भरा धाऊन येतात अन पुन्हा काही क्षणात दिसेनासे होतात. हे असं का होतं? की...त्याला काही सांगायचे तर नाही ना?. रोजरोजचा हा खेळ पाहून असं वाटतंय की त्याला काही सुचवायचे आहे...या भूतलावावरील मानवाला काही तरी त्याला सांगायचे आहे. ते सांगण्यासाठी त्याच्याकडे जिव्हा नाहीत तो अबोल आहे. आज पुन्हा तेच घडतंय... श्याम विचार करीत होता.   अगदी दोन घटका टळून गेल्या पण ना पावसाचा शिंतोडा पडला ना ऊन्हाचा सडा! आता तर चक्क तो गडगडतोय जणू वेड्यागत बडबडतोय.! आज बहुतेक काकुळतीला आला असणार तो! दोन मास उलटले तरी त्याला काय सुचवायचे आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करुन अखेर नाईलाजास्तव तो बरसण्याच्याच तयारीतच होता...     काय असेल त्या ढगांच्या मनात...? काय सांगायचं असेल त्याला?  विचार करत श्याम जास्तीत जास्त उंच अश्या टेकडीवर जाऊ लागला जेणे करुन त्या ढगाशी अतिशय जवळ जाऊन काहीतरी संपर्क साधता येईल, त्याच्याही मनाचा वेध घेता येईल. त्या डों...

निवडणुक मीमांसा: जळगांव

                                      निवडणुक मीमांसा      जळगांवात सध्या राजकिय चर्चांना उधाण आलंय. कारण आहे महानगरपालिकेच्या निवडणुका. १९ सप्टेबरला जळगांव महानगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे येत्या सप्टेबर महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार हे निश्चित. राज्य निवडणुक आयोगाने नोटिस दिल्यापासुनच निवडणुक प्रक्रियेला वेग आला होता. अनुसुचित जाती जमातीचे आरक्षण, महिला आरक्षण विचारात घेऊन प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यात आली. प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना मागवुन त्या निवडणुक आयोगासमोर सादर केल्या होत्या. आता प्रभाग निश्चिती झाली असता राजकिय खलबतं व नेत्यांच्या बैठका व भेटीगाठीच्या बातम्या झळकु लागल्या आहेत. पुढच्या वर्षी होणा-या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त होणार आहे. निवडणुका जरी केवळ जळगांव महापालिकेच्या असल्या तरी जळगांव शहर व ग्रामिणच्या सर्वपक्षीय नेत्यांची ही तारेवरची कसरत ठरणार आहे.    ...

मिशन किरीस्तान !

इमेज
        मिशन किरीस्तान ! ( भाग १)           आठ राज्यात हिंदूंना अल्पसंख्य घोषीत करण्याच्या बातम्या नुकत्याच चर्चेत आल्या आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या जुन महिन्यात होणा-या बैठकीत याचा विचार होणार आहे. मणिपुर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पंजाब व जम्मुकाश्मिर हीच ती आठ राज्ये आहेत. जिथे कधीकाळी बहुसंख्यक असणारा हिंदू आज अल्पसंख्यक झाला आहे. ही तर धोक्याची घंटा आहे! पण ती कुणाकुणास ऐकु येते, कोण कोण त्याने सतर्क होतो व कोण कोण दुर्लक्ष करुन कानात बोळे घालतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न.  मांजरीने डोळे मिटून दूध प्यायचे ठरविले, तरी तिच्यावर चालुन येणारे संकट काही टळत नसते हे प्रथम हिंदूंनी ध्यानी घ्यावे. पंजाब व मणिपुरमध्ये अनुक्रमे ३८% व ३१% इतक्या संख्येने हिंदू आहेत. तसा इतर आठ राज्यांच्या तुलनेने हा आकडा सर्वाधिक. बाकी राज्यात यापेक्षा दयनीय अवस्था आहे. लक्षद्वीपमध्ये २.५ टक्के, मिझोरममध्ये २.७५ टक्के तर नागालँडमध्ये ८.७५ टक्के इतकेच हिंदू शिल्लक राहिले आहेत. ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेतील असल्याम...